आयईडीच्या प्रकरण; एनआयएने जम्मू काश्मीरमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

श्रीनगर - राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू आणि काश्मीरमध्ये १५ ठिकाणी छापे मारले आहेत. लष्कर-ए-मुस्तफा आणि बाथिंजी आयईडी रिक्व्हरी प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएने छाप्यादरम्यानत काही डिजीटल डिव्हाईस जप्त केली आहेत.एनआयएने लष्कर-ए-मुस्तफा प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. इरफान अहमद दर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. एनआयएने छाप्यादरम्यान काही डिजीटल डिव्हाईस जप्त केली आहेत. त्यामध्ये मोबाईल फोन, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप आणि बुकलेट जप्त केली आहेत.लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायुतुल्लाह मलिक याच्याकडून सुरक्षा दलाने ७ किलो आयईडी जम्मूमधून जप्त केले आहे. त्यानंतर एनआयएच्या विविध पथकांनी पुलावामा, शोपियान, श्रीनगर, अनंतनाग, जम्मू आणि बनिहाल या ठिकाणी छापे मारले आहेत. भारतीय लष्कारने जम्मू आणि काश्मीरमध्ये एक शक्तीशाली आयईडी निकामी केल्याने मोठा घातपात टळला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ राजौरी जिल्ह्यात ही कारवाई करण्यात सैन्याला यश आले आहे. राजौरी जिल्ह्यातील राजौरी-पुंछ महामार्गावर शनिवारी सकाळी आयईडी सापडल्यानंतर सीमा भागात दहशत पसरली. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून लगेचच परिसर रिकामी करत बॉम्ब स्फोटक निकामी केले. तीन तासासाठी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. बथुनीजवळ महामार्गावर एक बेवारस वस्तू पडल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सैन्याचे संयुक्त पथक घटनास्थळी पोहोचले. बॉम्बशोधक पथकाने स्फोटक निकामी केल्याने मोठा अपघात टळला. कोणतीही इजा किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या नागबेरन-तरसर जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान शनिवारी सकाळी चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. दहशतवाद्यांकडून एक AK आणि M4 जप्त केली आहे. परिसरात इतर दोन ते तीन दशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली आहे.ठार केलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget