महाराष्ट्रात आढळला झिकाचा पहिला रुग्ण

पुणे - कोरोनाच्या संकटातून जाणाऱ्या महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही झिकाची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ५० वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली आहे. या महिला रुग्णाची तब्येत चांगली असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली आहे. तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत सांगितले.बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस विषाणु आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष दिनांक ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. रुग्ण चिकनगुनिया बाधितदेखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.३१ जुलै रोजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे, सहाय्यक संचालक, हत्तीरोग डॉ. कमलापुरकर, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पथकाने सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी,पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेतली. त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने करण्याकरिता कार्यवाहीबाबत सूचना दिल्या आहेत.१९४० मध्ये झीका व्हायरस सगळ्यात आधी युगांडामध्ये आढळला होता. त्यानंतर हा खूप वेगाने पसरला. अफ्रिकेतील अनेक भागात पसरून अनेकांवर हल्ला केला. नंतर हा दक्षिण प्रशांत आणि आशियाच्या काही देशांमधून लॅटिन अमेरिकेपर्यंत पोहचला. ब्राझीलमध्ये जेव्हा हा भरपूर प्रमाणात पसरला. तेव्हा काही शास्त्रज्ञांनी अंदाजा लावला की, २०१४ च्या फुटबॉल वर्ल्ड कपदरम्यान आशिया आणि दक्षिण प्रशांतकडून हा आला असावा. पण यासंदर्भात अद्याप खात्री होऊ शकली नाही.हा व्हायरस एंडीज इजिप्टी नावाच्या डासांमुळे पसरतो. हे तेच डास आहेत, ज्यांच्यामुळे कावीळ, डेंगू आणि चिकुनगुनियासारखे विषाणुजन्य आजर होतात. झीका संक्रमित आईकडून आपल्या नवजात बाळात जातो. हा व्हायरस ब्लड ट्रांसफ्यूजन आणि यौन संबंधामधूनही पसरतो. झीकाचे नेमके लक्षण अद्याप समोर न आल्याने याला ओळखणे थोडे अवघड असते. पण असे सांगितले जाते की, डास चावल्यानंतर, ताप रैशेज, डोके दुखी आणि सांधेदुखी होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget