वीज विधेयकाविरोधात ममतांचे मोदींना पत्र

कोलकाता - ‘जनविरोधी’ असे वीज (सुधारणा) विधेयक संसदेत मांडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून त्यांना या विधेयकाबाबत पुढे काही कार्यवाही न करण्याचे आवाहन केले. दूरसंचार सेवांच्या धर्तीवर ग्राहकांना निरनिराळ्या सेवा पुरवठादारांमधून आपल्या पसंतीचा सेवा पुरवठादार निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याची तरतूद वीज (सुधारणा) विधेयकात आहे. लोकसभा सचिवालयाने १२ जुलै रोजी जारी केलेल्या बुलेटिननुसार, सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनात जी १७ नवी विधेयके मांडण्याचा सरकारचा विचार आहे, त्यात या विधेयकाचा समावेश करण्यात आला आहे.या विधेयकामुळे सरकारी सार्वजनिक सेवा यंत्रणांची भूमिका दुय्यम होऊन ‘कंपूची भांडवलशाही’ (क्रोनी कॅपिटॅलिझम) वाढीला लागेल, असे ममतांचे म्हणणे आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget