भुसावळमध्ये घरात अवैध शस्त्रांचे घबाड,पोलिसांनी केली कारवाई

जळगाव - भुसावळ शहरातील इदगा परिसरात एका घरात तब्बल अकरा शस्त्र सापडली आहेत. यामध्ये चार चाकू, चार तलवारी, एक रायफल, दोन बंदुका पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. हा अवैध शस्त्रसाठा बाळगणारे दोन आरोपी फरार झाले आहेत. आरोपी शेख पप्पू, त्याचा मुलगा रिजवान पप्पू शेख असे फरार झालेल्या आरोपींची नावे असून भुसावळ पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेख पप्पू व त्याचा मुलगा रिजवान पप्पू शेख यांच्याजवळ अवैध शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. खबऱ्याने ही माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शेख पप्पू व त्याचा मुलगा रिजवान पप्पू शेख यांच्यावर कारवाई करण्याचे ठरवले. त्यानुसार पोलिसांनी एक गुप्त मोहीम हाती घेतली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने भुसावळ पोलिसांनी शहरातील इदगा या भागात एका घराची झडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांना अवैध शस्त्रे सापडली.ही सर्व शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपी शेख पप्पू व त्याचा मुलगा रिजवान पप्पू शेख हे दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांनी यांच्याच मालकीच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला होता. यामध्ये पोलिसांना चार चाकू, चार तलवार, एक रायफल, दोन बंदूक असा शस्त्रसाठा सापडला.दरम्यान, हा शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर फरार झालेल्या वरील दोन आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कायद्यातील कलम ३४२ प्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget