७५ लशींसाठी शेकडो लोकांच्या रांगा ; विरार येथील पालिकेच्या नारिंगी लसीकरण केंद्रावरील प्रकार

वसई/विरार -  वसई-विरार शहरात लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. पालिकेला ५ दिवसांनंतर लशींचा साठा मिळाला आणि शुक्रवारी त्या १७ केंद्रांवर मिळतील असे जाहीर करण्यात आले. मात्र या लशी मिळविण्यासाठी नागरिकांनी चक्क गुरुवार रात्री ८ पासूनच रांगा लावल्याचे दिसून आले. केंद्रावर अवघ्या ७५ लशींसाठी पाचेशहून अधिक नागरिक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. लसीकरण केंद्रात वशिलेबाजी, गोंधळ आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.वसई विरार शहरात पालिकेच्या मोफत लशीसाठी सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: संघर्ष करावा लागत आहे. एकीकडे खासगी लसीकरण जोरात सुरू असताना दुसरीकडे मोफत नसल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. पालिकेने आपली ३६ लसीकरण केंद्रे बंद केली आहेत. ज्या लशी येतात त्या तुरळक असतात आणि त्या १७ केंद्रांवर वितरित करण्यात येतात. प्रत्यक्षात पालिका जेवढय़ा लशी केंद्रावर दाखवते त्यापेक्षा कमी लशी केंद्रावर असतात. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. लशी मिळविण्यासाठी नागरिक मध्यरात्री २ पासून लांगा लावत होते.गुरुवारी विरार पूर्व येथील नारंगी येथील पालिकेच्या लसीकरण केंद्रावर आदल्या रात्री ८ वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लागल्या होत्या. या केंद्रावर केवळ १५० लशीच्या मात्रा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील ७५ थेट आणि ७५ ऑनलाइन दिल्या जाणार होत्या. त्यामुळे केवळ ७५ लशींसाठी ५०० हून अधिक नागरिकांनी या केंद्राबाहेर रांगा लावल्याचे बघायला मिळाले. रांगा लावणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होतो. या केंद्रावर जेव्हापासून लशी येतात तेव्हापासून आम्ही रांगा लावतोय; पण लस संपल्याचे सांगत आम्हाला लशी दिल्या गेल्या नाहीत, असे रांगेतील  नागरिकाने सांगितले. लोक रात्रभर उभे राहत असले तरी सकाळी काहीच जणांना टोकन देऊन नंतर टोकन संपले, असे सांगितले जाते. यामुळे या केंद्रावर वशिलेबाजी चालत असल्याचा आरोप केला आहे. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget