जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला परवानगी

नवी दिल्ली - अमेरिकेची कंपनी जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या कोरोना प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने आपात्कालीन वापराची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता भारताकडे कोरोनाविरोधात एकूण ५ लसी आहेत. याआधी कोव्हिशिल्ड, कोव्हक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या लसींना भारतात वापराची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यासंदर्भात ट्विटरवरून घोषणा केली आहे. ‘भारताने आपली व्हॅक्सिन बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड-१९ लसीला भारतात आपात्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारतात कोरोनाविरोधात ५ लसींना परवानगी आहे. यामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळेल,” असे मनसुख मांडवीय यांनी ट्विटरवर म्हटले आहे. भारतात परवानगी मिळालेली जॉन्सन अँण्ड जॉन्सन ही पहिलीच सिंगल डोस लस असून दोनच दिवसांपूर्वी कंपनीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या लसीचा एक डोस प्रभावशाली असून ही लस ८५ टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीचा आहे. तसेच साऊथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कोरोनावर आता भारतात ५ लसी देता येणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारताने शुक्रवारी रात्रीपर्यंत देशात ५० कोटी लसीचे डोस देऊन झाले आहेत. ५० कोटी लसींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करणारे ट्वीट केले आहे. ‘कोरोनाविरोधातल्या भारताच्या लढ्याला एक प्रबळ प्रेरणा मिळाली आहे. आपल्या लसीकरण मोहिमेने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मला आशा आहे की, यात उत्तरोत्तर भर पडत जाईल आणि मोफत लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या नागरिकांना लस दिली जाईल”, असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकी १ कोटींहून जास्त नागरिकांना लस दिली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget