सर्व सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी गोरेगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने जन आंदोलन

मुंबई - गोरेगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी म्हणून स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांच्या नेतृत्वात गोरेगाव रेल्वे स्थानक पश्चिम येथे जन आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थित जन समुदायास संबोधताना आमदार विद्या ठाकुर यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य मुंबईकरांचे आधीच हाल झाले आहेत व अजूनही सुरू आहेत.अशातच या तुघलकी सरकारने सामान्यांना लोकलप्रवास बंदी केल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.जोपर्यंत सरकार लोकलप्रवासाची मुभा देत नाही तोपर्यंत अशाप्रकारे जनआंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.यावेळी उपस्थित आमदार विद्या ठाकुर, महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर, मुंबई भाजपचे नेते दिलीप पटेल,नगरसेवक दीपक ठाकुर,संदीप पटेल,नगरसेविका श्रीकला पिल्ले,गोरेगाव भाजपचे अध्यक्ष विजय गायकवाड, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे,विक्रम राजपूत,अमेय मोरे,वॉर्ड अध्यक्ष अशोक गोयल,सन्मान गावकर,राम शिंदे,संदीप सिंह,रजनी सोनी,कवी आरसन,सुनील चव्हाण,महिला मोर्चा अध्यक्षा राधा गुप्ता,शीला अवस्थी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget