डेल्टा, डेल्टा प्लसनंतर आता इटा व्हेरिएंटचा धोका, कर्नाटकात सापडला रुग्ण

बंगळुरू - देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यातच भर डेल्टा, डेल्टा प्लस नंतर आता इटा कोरोना व्हेरिएंट आढळला आहे. कर्नाटकच्या मंगळुरूत एटा व्हेरिएंटचे पहिले प्रकरण समोर आले आहे.मंगळुरूतील एका व्यक्तीला एटा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. संक्रमित व्यक्ती चार महिन्यांपूर्वी दुबईहून दक्षिण कन्नडमधील मूदाबिद्रे येथे आली होती. चाचणी केल्यावर, संबधित व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. शरिरात आढळलेला कोरोनाचा नमुना आरोग्य विभागाने पुढील अभ्यासासाठी प्रयोग शाळेत पाठवला होता. आतापर्यंत या प्रकारावर बरेच अभ्यास झालेले नाहीत. २०२० मध्ये यूके आणि नायजेरियात या व्हेरिएंटची रुग्ण आढळली. नायजेरियात जास्त रुग्ण नोंदवली गेल्याची माहिती आहे. मात्र, भारतात दुसऱ्यांदा इटा व्हेरिएंटचा रुग्ण आढळ्याची माहिती आहे. यापूर्वी एप्रिल २०२० मध्ये राज्यात इटा व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे डॉ. व्ही. रवी यांनी सांगितले.दिलासादायक बाब म्हणजे या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचाही धोका नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. कारण हा व्हेरिएंट जुना आहे. जर हा धोकादायक असता तर आतापर्यंत याचे बरेच रुग्ण आढळून आले असते. तर अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचे कारण आहेत. कोरोनाचे स्ट्रेन सतत बदलत असल्याने जग अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. व्हायरस आपली अनुवांशिक रचना बदलत राहतो. जेव्हा रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधे दिली जातात. तेव्हा आपला बचाव करण्यासाठी विषाणू रुप बदलतो. विषाणूमध्ये होणारे बदल थांबवता येणार नाहीत. त्यामुळे यांच्यात होणारे बदल आणि उपाययोजना यावर लक्ष केंद्रीत करावे लागते. सुरुवातीच्या काळात चीनमधून हा विषाणू भारतात आला आहे आणि सध्या देशभरात या विषाणूचा प्रादुर्भाव आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget