जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएची कारवाई, ४० हून अधिक ठिकाणी छापे

श्रीनगर - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना टेरर फंडिंग प्रकरणी अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एनआयएच्या पथकाने रविवारी सकाळी अनंतनाग जिल्ह्यात छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ४० ठिकाणी एनआयएचे छापे टाकले आहेत. यामध्ये पोलिसांव्यतिरिक्त सीआरपीएफचेही सहकार्य घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने रविवारी केंद्रशासित प्रदेश जम्मू -काश्मीरमधील ४० ठिकाणी छापे टाकले त्यात श्रीनगर, गंदरबल, अचबल, शोपिया, बांदीपोरा, रामबन, दोडा, किश्तवाड, राजौरी आणि इतर जिल्ह्यांचा समावेश आहे. एनआयएचे हे छापे दहशतवादाला पुरवण्यात आलेल्या निधीसह इतर नवीन प्रकरणांशी संबंधित आहे. संबंधित ठिकाणांची कसून तपासणी केली जात आहे.

एनआयएला छापेमारी दरम्यान कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, म्हणून जम्मू -काश्मीर राज्य पोलीस आणि सीआरपीएफचे सहकार्य घेण्यात आले. जमात-ए-इस्लामी संघटनेच्या सदस्यांच्या घरांवरही छापेमारी सुरू आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामी संघटनेवर बंदी घातली होती. एनआयएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या नौगाममध्ये राहणाऱ्या फल्ह-ए-आम ट्रस्टच्या सदस्यांच्या घरावरही छापे टाकले आहेत. जुलै महिन्यात एनआयएने काश्मीरमध्ये छापे टाकले होते. एनआयएच्या टीमने दक्षिण काश्मीरमधील अंतनाग जिल्ह्यात दोन ठिकाणी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली होती. यापूर्वी, गेल्या रविवारी छापेमारीदरम्यान, टीमने पाच जणांना चौकशीसाठी अटक केली होती.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget