न्यायाधीशांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करणार

रांची - न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपण्यात आली आहे. यासंबंधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शिफारस केली आहे. धनबादमध्ये २८ जुलै रोजी सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान एका रिक्षेच्या धडकेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले. झारखंड पोलिसांनी या प्रकरणी त्वरीत कारवाई करत या घटनेत वापरण्यात आलेली रिक्षा आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून या प्रकरणी जलद तपास आणि दोषींना पकडण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या कुटुंबीयांनी एक दिवस आधी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली होती. सोरेन या घटनेबद्दल संवेदनाही व्यक्त केली होती. सरकार या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांसोबत आहे. तसेच चौकशीबाबत राज्य सरकार गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी वेगाने केली जाईल. कुटुंबीयांना न्याय देणे ही राज्याची प्राथमिकता आहे, असे मुख्यमंत्री सोरेने म्हणाले होते. धनबादमध्ये २८ जुलैच्या सकाळी न्यायाधीश उत्तम आनंद हे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. यावेळी एक रिक्षा त्यांच्या पाठीमागून वेगाने आली आणि त्यांना धडक देऊन निघून गेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली.रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत न्यायाधीश उत्तम आनंद हे गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना रस्तावरून जात असलेल्या एका व्यक्तीने त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या अनेक तासांनी त्यांची ओळख पटली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget