स्वातंत्र्यदिनी दहशतवादाचे सावट, दिल्लीत पोलिसांनी लावले दहशतवाद्यांचे पोस्टर

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची वेगवेगळ्या पातळ्यांवर जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीपासून ते काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ मोठ्या संख्येत सुरक्षादलांना तैनात करण्यात आले आहेत. १५ ऑगस्टच्या उत्साहावर दहशतवादाचे सावट दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांकडून लाल किल्ल्याजवळ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर चिपकावण्यात आले. या पोस्टरमध्ये सहा दहशतवाद्यांचे फोटो जाहीर करण्यात आले. यामध्ये, त्यांचे नाव आणि पत्ताही नमूद करण्यात आला आहे.या सहा व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती नागरिकांच्या नजरेसत पडल्यास तत्काळ पोलिसांना सूचित करण्याचे आवाहनही दिल्ली पोलिसांकडून करण्यात आले आहे.पोस्टरवर झळकणारे हे सहा दहशतवादी 'अल कायदा' या घातक संघटनेशी संबंधित असून भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणणे त्यांचा उद्देश असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget