एमईआयएलकडून खोल समुद्रात खनिज तेल उत्पादन करणाऱ्या स्वदेशी यंत्रणेची निर्मिती

अहमदाबाद - भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने अहमदाबादमध्ये समुद्रातून खनिज तेल उत्खननासाठी उपयोगात येणाऱ्या रिग्ज (Rigs) स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करुन निर्मिती केली. एमईआयएलच्या या नव्या यशामुळे भारताचे मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मोठा हातभार लागणार आहे. बुधवारी (२५ ऑगस्ट) अहमदाबादमध्ये एमईआयएलने पहिली स्वदेशी रिग्जचे तेल उत्पादक सरकारी कंपनी ओएनजीसीला (ONGC) हस्तांतरण केले. भारतासाठी तंत्रज्ञान स्वालंबनात ही मोठी उपलब्धता मानली जात आहे. अत्यंत खोल समुद्रात खनिज तेल उत्पादनात Rigs ची भूमिका महत्त्वाची असते. याचे तंत्रज्ञान अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचे असते. असे  असताना ही यंत्रणा उभी करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील मोजक्या देशांपैकी एक बनला आहे. यामुळे जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढणार आहे. एमईआयएलने ड्रिलमेकचे प्रमुख बोमारेड्डी यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा हस्तांतरीत केली. यावेळी ऑईल रिग्ड विभागाचे प्रमुख एन. कृष्णाकुमार, उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी हेही उपस्थित होते. एमईआयएलला ओएनजीसीकडून एकूण ४७ तेल उत्पादन करणाऱ्या रिग्जच्या निर्मितीचे काम मिळाले आहे. याची एकूण किंमत ६,००० कोटी रुपये आहे. याचाच भाग म्हणून एमईआयएलने पहिली रिग्ज ओएनजीसीकडे सुपुर्त केली. यासह एमईआयएल देशातील पहिली खासगी कंपनी बनली जिने खनिज तेल उत्पादन करणाऱ्या रिग्जची स्वदेशी तंत्रज्ञानावर निर्मिती केली.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget