September 2021

मुंबई - शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अडसूळ चार दिवसांपासून गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र त्यांत्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवले आहे. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमधून शिफ्ट करण्यात आले आहे.आनंदराव अडसूळ यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर २७ सप्टेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. ईडीचे अधिकारी चौकशी करत असतानाच आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली. त्यांना लगोलग गोरेगावच्या लाईफलाईन केअरमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. गेल्या ४ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आयसीयूमध्ये ४ दिवस उपचार करुनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आता दुसऱ्या हॉस्पिटमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.आनंदराव अडसूळ यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये ईडीचे अधिकारी देखील आहे. ४ दिवस उपचारादरम्यान ईडीचे दोन अधिकारी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्येच होते. त्यांच्या तब्येतीची माहिती ते वारंवार डॉक्टरांकडून घेत होते. आताही दुसऱ्या हॉस्पिटमध्ये नेताना ईडीचे अधिकारी त्यांच्यासोबतच आहेत.

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत ९०० कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी २७ सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवले होते. २७ तारखेला सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ईडीने त्यांना ताब्यात घेतले.आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत ९०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या २ वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी ५ जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्र सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये १३-१४ शाखा आहेत. या बँकेत ९०० खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्याने दिली. आता खातेदारांना केवळ १ हजार एवढी रक्कम मिळत आहे, असेही रवी राणा म्हणाले होते.आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार,१९९६ पासून पाच वेळा खासदार होते,गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून पराभव झाला होता. 

मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दोन खंडणीखोर नेत्यांना पोलिसांनी पैसे घेताना अटक केली आहे. दुकानदाराकडे १ लाख ३५ हजार रुपयांची मागणी केल्यानंतर वीस हजार रुपये घेताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. मुंबईतील आरे कॉलनी परिसरात दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या.मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील आरे कॉलनीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दोन खंडणीखोर नेत्यांना पोलिसांनी पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे. सूर्यप्रकाश भदर्गे (उपाध्यक्ष मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) आणि रेखाताई मोरे (जिल्हा उपाध्यक्ष उत्तर-पश्चिम मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. या दोन्ही खंडणीखोर आरोपींनी आरे कॉलनीमध्ये एका रेशनिंगचा दुकानाचे शिफ्टिंग असल्यामुळे दुकानदाराकडून १ लाख ३५ हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र २०,००० रुपये घेताना आरे पोलिसांनी त्यांना रेड हँड अटक केली आहे.आरे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या दोन्ही खंडणीखोर नेत्यांनी आरे परिसरामधून मोठ्या संख्येने लोकांकडून खंडणी घेतल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींचे आणखी काही साथीदार आहेत का? याचा शोध आरे पोलीस घेत आहेत.मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सत्ताधारी शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाकडून अशाच प्रकारच्या केल्या जाणाऱ्या विधानांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच करून ठेवली आहे, असा खोचक टोला लगावतानाच राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामध्ये संजय राऊत यांनी विरोधकांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या विधानांमुळे राज्यात मनोरंजनासाठी सिनेमा-नाट्यगृहांची खरच गरज आहे का? असा खोचक सवाल देखील केला आहे.संजय राऊत या लेखात म्हणतात, करोनाचा कहर आणि लॉकडाउनचे निर्बंध कायम असले, तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लोक राजकीय बातम्यांमधून स्वत:चे मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली तर महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असे वाटते. सर्वत्रच विनोद आणि रहस्यमय असे मनोरंजन सुरू आहे.

पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यावर देखील टोला लगावण्यात आला आहे. ज्यांनी कोव्हिशिल्डचे डोस घेतले, त्यांनाच आंतरराष्ट्रीय प्रवासाची परवानगी आहे. अनेक विद्यार्थी, उद्योजक मंडळींचे वांदे झाले अनेकांना युरोप-अमेरिकेच्या विमानतळावरूनच त्यांच्या देशात प्रवेश करू दिला नाही. आपल्या पंतप्रधानांनी कोवॅक्सिनचे दोन डोस घेतले आहेत. तरी ते खास विमानाने अमेरिकेत पोहोचले. नियम फक्त सामान्यांना, मोठ्यांना नाही का? असे विचारलं तर भाजपाचे लोक म्हणतील छे छे, मोदी है तो मुमकिन है! मोदींना कोण अडवणार? हेसुद्धा एक मनोरंजन आहे, असे संजय राऊतांनी या लेखात म्हटले आहे. संजय राऊतांनी आपल्या लेखात भाजपा नेते किरीट सोमय्या यांना खोचक टोले लगावले आहेत. सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्रा केली आहे. किरीट सोमय्या रोज सकाळी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोप करतात. त्यांचे हे आरोप बिनबुडाचे ठरतात. महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे, असे म्हणत राऊतांनी मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता पाटील, मृणाल गोरे, केशवराव धोंडगे, गोपीनाथ मुंडे यांची उदाहरणं दिली. आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे हास्यजत्रा म्हणून पाहिले जात नव्हते! असा टोलाही लगावला आहे.

अहमदनगर - नगरपालिका निवडणुकाच्या तोंडावर कर्जत-जामखेड मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने भाजपला तसाच धक्का आता राहुरीतही दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राहुरी नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक शहाजी जाधव यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय मतदारसंघातील ग्रामीण भागातील धनगरवाडीचे सरपंच, सदस्य, तसेच इतर ठिकाणच्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यमंत्री तनपुरे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शिकवणीप्रमाणे राष्ट्रवादीत येणाऱ्या प्रत्येकाचा योग्य तो सन्मान राखला जाईल. पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे. भाजप नेते शिवाजी कर्डिले पूर्वी या मतदारसंघातून आमदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला. आता पुढील निवडणुकीसाठी कर्डिले यांनी तयारी सुरू केली आहे. राहुरीत अपयश आल्याने त्यांच्यापुढे विधान परिषेदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविणे तसेच पुढील निवडणुकीला राहुरी ऐवजी नगर तालुक्यालगतच्या श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढविणे असे पर्याय असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी पक्ष सोडून विरोधी गोटात सामील होणे लक्षवेधी ठरत आहे. कर्जतमध्येही भाजपचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत आणि त्या आधी भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तेथेही भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना या कार्यकर्त्यांनी धक्का दिला आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघात येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही पक्षांतरे सुरू झाली आहेत. कर्जत-जामखेड आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा नेते प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. हा विजय मिळविताना त्यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव केला असून त्यानंतरही मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. आता भाजपच्या कार्यकर्त्यांना खेचून स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याची तयारी त्यांनी सुरू केल्याचे दिसून येते.

जालना - ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नेहमी राहिली आहे. केंद्रसरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी लोकसंख्येला धक्का बसला आहे. इम्पिरिकल डाटा देण्यास केंद्रसरकारने नकार दिला आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णयामुळे ओबीसींच्या जागा सुरक्षित झाल्या हे आपल्या सरकारचे श्रेय आहे, असे सांगतानाच भाजपनेच ओबीसी व मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू झाली आहे. जालना शहर व ग्रामीण पदाधिकार्‍यांशी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याठिकाणी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. कमिट्यांचे मेळावे घेणे. आरक्षणाविषयी आपले धोरण काय आहे हे समजून सांगणे, राज्यसरकारच्या धोरणाबाबत माहिती देणे अशी शिबीरे आता पुढे घेतली जाणार आहे, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली. शरद पवार यांना या जिल्हयाकडून फार मोठया अपेक्षा आहेत. सत्ता येते-जाते त्यामुळे सत्ता टिकायची असेल तर संघटन फार महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. बदनापूर विधानसभा मतदारसंघात २०२४ ला राष्ट्रवादीचेच घड्याळ आणायचे याची खूणगाठ बांधा, असे त्यांनी केले. नवचैतन्य आणायचे असेल तर बुथ कमिट्यांचे मेळावे घ्या. पैसा हाच अंतिम विजय राजकारणात असतो असे नाही, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील हातवन बृहत ल.पा प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्याचे व गलाटी मध्यम प्रकल्पातील गाळ काढून प्रकल्पाची साठवण क्षमता वाढवण्याबाबत उपाययोजना करण्याचे तसेच जिल्ह्यातील अकार्यान्वित असलेल्या योजनांमधील अडचणी दूर करून कार्यान्वित करण्याबाबत प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जालना हा मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा असून इथल्या लोकप्रतिनिधींनी जे प्रश्न मांडले त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्राची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ओडिशा - भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या काही भागात ‘गुलाब’ चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी ‘गुलाब’ चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. आयएमडीच्या वादळ चेतावणी विभागाने चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि उत्तर आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. 

आयएमडीने म्हटले आहे की, वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांमध्ये ७ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळात तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अत्यंत खराब हवामानाचा इशारा ऑरेंज अलर्टच्या स्वरूपात दिला जातो आणि या दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते.भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उमाशंकर दास यांनी सांगितले की, चक्रीवादळाच्या अंतर्गत आंध्र प्रदेश आणि ओडिशासाठी इशारा जारी करण्यात आला आहे. ओडिशा सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गजपति, गंजम, रायगडा, कोरापूट, मलकाजगिरी, नबरंगपूर आणि कंधमाल या सात जिल्ह्यांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार हे वादळ दक्षिण ओडिशा आणि शेजारील आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकू शकते.

बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बघायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.अहमदाबाद  - गुजरातच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैय्या कुमार आणि आरडीएमचे आमदार जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये २८ सप्टेंबरला प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.गुजरातच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. नुकतेच भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भुपेंद्र पटेल यांची नियुक्ती केली आहे. अशी आहे गुजरातमधील राजकीय स्थितीभुपेंद्र पटेल यांच्यासाठी पुढील १४महिने हे महत्वाचे असणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीला फक्त १४ महिने शिल्लक आहेत. निवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये होणार आहे. यात भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भूपेंद्र पटेल यांना पाटीदारातील दोन्ही कुळ म्हणजेच, कडवा आणि लेउवा पटेल यांची मुठ बांधावी लागेल. काही महत्वाची पावले उचलावी लागेल, जेणेकरून राज्यातील नागरिक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर, २०२२ मधील निवडूक ही भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याने ती आव्हानात्मक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे, त्यामुळे पुढील निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.


नवी दिल्ली - अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी हॅरिस यांनी जगभरातील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले. यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकावर टीका केली आहे.काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमला हॅरिस यांचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, की जे लोकशाहीला हुकुमशाहीत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हे ऐकून आवडले नसेल. मोदीजी संकेत समजून घ्या, अशी फोटो कॅप्शनही राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये दिली आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी मोदी सरकार हे लोकशाहीविरोधी असल्याची टीका केली होती. भारत देश आता 'लोकशाही राष्ट्र' राहिला नसल्याचे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी ११ मार्च २०२१ यांनी केले होते. स्वीडनमधील व्ही-डेम या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाचा दाखला देत राहुल यांनी असे म्हटले होते. या अहवालात भारताचा समावेश निवडणूक लोकशाही सूचीमध्ये न करता, 'निवडणूक हुकूमशाही' या सूचीमध्ये केला आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या देशात आता निवडणूक लोकशाही न राहता, निवडणूक हुकूमशाही आली आहे. गेल्या दशकभरात जगातील उदारमतवादी लोकशाही असलेल्या राष्ट्रांची संख्या ४१ वरुन ३२वर गेली आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना कमला हॅरिस म्हणाल्या, की जगभरात लोकशाही धोक्यात आहे. लोकशाहीला वाचविण्याची गरज आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारताने साथ देण्याची गरज आहे. अमेरिका आणि भारत एकत्रित मिळून लढण्याची गरज आहे. जर भारताकडून सहकार्य मिळाले तर त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. हॅरिस यांच्याबरोबरील द्विपक्षीय बैठक अत्यंत महत्त्वाची ठरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याचे सूत्राने सांगितले. अत्यंत जिव्हाळ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी त्यांच्या आजोबांच्या पत्रांच्या प्रती दिल्या आहेत. हॅरिस यांचे आजोबा पी. व्ही. गोपालन हे केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ आणि आदरणीय अधिकारी होती. त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या होत्या, असे सरकारमधील सूत्राने सांगितले. जगातील सर्वात जुन्या शहरापैकी वाराणसी हे शहर आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. या शहरामधील गुलाब मीनाकारी हा बुद्धिबळाचा सेटही त्यांना देण्यात आला आहे.

मुंबई - दोन आठवड्यांसाठी चित्रपटगृहांमध्ये आपली जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतचा ‘थलायवी’  चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर धडक मारण्यासाठी सज्ज झाला आहे. कंगना रनौतचा हा चित्रपट २५ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. एएल विजय दिग्दर्शित या चित्रपटाची कथा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता (जे. जयललिता) यांच्या जीवनावर आधारित आहे.सध्या, ‘थलायवी’ या चित्रपटाची हिंदी आवृत्ती नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. दोन आठवड्यांनंतर, हा तामिळ आणि तेलुगु भाषेतील चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. आम्ही तुम्हाला सांगू की, हिंदी आवृत्तीचे अधिकार चित्रपटगृहांना फक्त दोन आठवड्यांसाठी देण्यात आले होते. त्याचबरोबर, तामिळ आणि तेलुगू आवृत्त्यांचे अधिकार चार आठवड्यांसाठी देण्यात आले आहेत, त्यामुळे ‘थलायवी’ तेलगू आणि तामिळ भाषेत नेटफ्लिक्सवर दोन आठवड्यांनंतर रिलीज होईल. खुद्द अभिनेत्री कंगना रनौतने ही माहिती तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कंगना रनौतने तिच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, ‘थलायवी’ आजपासून नेटफ्लिक्सवर जगभरात प्रवाहित होत आहे. नक्की बघा. त्याचवेळी कंगना रनौतने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती जयललितांप्रमाणेच लोकांच्या गर्दीमधून चालत आहे आणि लोक हात जोडून तिचे स्वागत करत आहेत.

मुंबई - बिग बॉस १३ चा पहिला उपविजेता असीम रियाजचा भाऊ उमर रियाज लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शोच्या १५ व्या सीझनमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या उमरने त्याच्या ट्विटर हँडलवर बिग बॉसच्या घरात सामील झाल्याची बातमी शेअर केली आहे. उमरने बिग बॉस १३ फॅमिली स्पेशल एपिसोडमध्ये विशेष उपस्थिती लावली होती. उमर व्यतिरिक्त, निर्मात्यांनी बिग बॉस १५ स्पर्धक म्हणून बिग बॉस ओटीटी फायनलिस्ट शमिता शेट्टी, निशांत भट आणि प्रतीक सहजपाल यांची नावे निश्चित केली आहेत. मित्रांनो मी बिग बॉस १५ चा स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करणार आहे याची खात्री झाली आहे. तुम्ही वेळोवेळी मला पाठिंबा दिलात त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला आशा आहे की या प्रवासात तुम्ही मला साथ द्याल असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. असीमसह अनेक सोशल मीडिया युजर्सनी उमरला शुभेच्छा दिल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण कुंद्रा शोमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 'तुझसे है राबता' या मालिकेतील अभिनेता रीम शेख देखील रिअॅलिटी शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय अर्जुन बिजलानी देखील सहभागींपैकी एक असू शकतो. रिया चक्रवर्ती, सान्या इराणी, माहिका शर्मा, मानव गोहली, टीना दत्ता, बरखा सेनगुप्ता यांच्यासह इतरही शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

मुंबई - राज्यातील सर्व मंदिरे येत्या ७ ऑक्टोबरपासून खुली करण्यात येणार आहेत. दीड वर्षापासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. दरम्यान, घटनस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत.कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केल्यानंतर राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र आता दुसऱ्या लाटेचा दाह ओसरू लागला असून नव्या बाधितांची संख्या देखील घटल्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात यावीत यासाठी भाजपने आंदोलन छेडले होते. मनसे देखील या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरली होती. मात्र या दोन्ही पक्षांनी मंदिरे उघडण्याबाबत दिलेल्या अल्टिमेटमनंतर ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.


मुंबई - ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना २८ तारखेला त्यांना हजर राहून जबाब नोंदविण्यासंदर्भातील समन्स पाठवण्यात आले आहे. पहिल्या समन्सला परब यांनी गैरहजर राहत मुदतवाढ मागून घेतली होती. आता दुसरे समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ईडीकडे मंत्री परब यांच्याविरुद्ध सध्या तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये मुंबई पोलिसांचे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून त्यांच्याबद्दल केलेला उल्लेख, त्याचप्रमाणे परिवहन विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्याने दिलेली तक्रार आणि दापोली येथील मालमत्ता व अवैध परवाने, बांधकामाबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारींचा समावेश आहे. ईडीने त्यांना नोटीस बजावून ३१ ऑगस्टला ११ वाजता कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, परब यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे कळवीत गैरहजर राहिले होते. आता मंगळवारी २८ तारखेला सकाळी ११ वाजता परब यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे, असे ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये नमूद केले आहे. मात्र परब गैरहजर राहिल्यास ईडीकडून काय कारवाई होणार, हे पाहावे लागणार आहे. किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी मंत्री परब यांनी १४ सप्टेंबर रोजी वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले होते. तसेच ७२ तासांत माफी सांगितले होते. मात्र मुदत कालावधी उलटून गेल्यानंतर अनिल परब यांनी सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे.


ठाणे - तलावांचे शहर म्हणून प्रसिध्द असलेले ठाणे खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकारी व कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले. गेले अनेक दिवस ठाण्यातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. याचा फटका सर्व नागरिकांना होत आहे.ठाण्याहून भिवंडी व नाशिककडे जाणारे महामार्ग यावर प्रवास करणार्‍या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शुक्रवारी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व भागाचा आणि वाहतूक समस्येचा आढावा घेतला. आणि उपाययोजनेसाठी आदेशही दिले.या दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा, एमएमआरडीए, एम एसआरडीसी, मुंबई मेट्रो अशा काम करणाऱ्या एजन्सीच्या अधिकारी व कंत्राटदारांना चांगलेच फैलावर घेतले. ठाण्यातील आनंदनगर टोल नाकायेथून भिवंडी पडघा इथपर्यंत रस्त्यांची पाहणी केली. आणि वाहतूक कोंडी का होते, खड्डे कुठे पडले आहेत, मेट्रोच्या कामांमुळे किती अडथळा निर्माण होतो आहे व अवजड वाहनांची दिवस वाहतूक किती त्रासदायक होत आहे या सर्व बाबींची माहिती घेतली. निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करा. व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले. संबंधित अधिकारी व कंत्राटदार ठोस काम करत नसल्याने लोकांचा संताप आम्हाला सहन करावा लागतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खड्डे मी बुजवायचे का व कामाचा दर्जा मी चेक करायचा का असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.

बोईसर - पालघर जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी पंधरा जागांवर १२५ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केला. तर सोमवारअखेर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या विविध १४ जागांसाठी ९२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक ओबीसी आरक्षणामुळे पालघर जिल्हा परिषदेसह विविध पंचायत समितीतील रिक्त पदांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

जिल्हा परिषदेतील १५, तर जिल्ह्यातील ८ पंचायत समितीमधील १४ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी ५ ऑक्टोबरला मतदान आणि ६ ऑक्टोबरला मतमोजणी केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा आदिवासी जिल्हा असताना नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील एकूण २९ सदस्यांची पदे रद्द झाली होती. त्यानंतर पुन्हा या जागांवर सर्वसाधारण आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार पोटनिवडणुका घेण्याचे न्यायालयाने सांगितल्यानंतर जिल्ह्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

जिल्हा न्यायाधीशांनी अपील मान्य करून निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख २७ सप्टेंबर ठेवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अपील नाही, अशा ठिकाणी २७ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकेल. ज्या ठिकाणी प्रकरण अपिलात आहे, तिथे बुधवार २९ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन उमेदवारी मागे घेता येईल. याच दिवशी नेमके किती उमेदवार रिंगणात उभे राहणार हे नक्की समजणार आहे.सोमवार २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्यांना निशाणी वाटप केली जाईल. ज्या ठिकाणी अपील प्रलंबित आहे, अशा ठिकाणी २९ सप्टेंबर रोजी दुपारी ही प्रक्रिया पार पाडली जाईल. मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील, तर बुधवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी केली जाणार आहे. शुक्रवारी ८ ऑक्टोबर रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत.

जिल्ह्यातील २९ जागांपैकी पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीचे नऊ अशा ११ जागांवर निवडणूक होणार असून डहाणू तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार, तर पंचायत समितीच्या दोन जागांवर लढत होणार आहे. वाडा येथे जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक पाच जागांसाठी पोटनिवडणूक होत असून पंचायत समितीची एक जागेवर लढत होणार आहे. या मोखाडा येथे जिल्हा परिषदेच्या दोन तसेच विक्रमगड व तलासरी येथे जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एक जागांची लढत होणार आहे, तर वसई तालुक्यात पंचायत समितीच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे.सदस्यत्व रद्द झालेल्या सभासदांमध्ये शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद, तर आठ पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सात जिल्हा परिषद सदस्य व एक पंचायत समिती सदस्य, भाजपचे चार जिल्हा परिषद व एक पंचायत समिती सदस्य, तर कम्युनिस्ट पक्षाचा एक जिल्हा परिषद सदस्याचे सदस्यत्व रद्दबातल ठरले आहे. या खेरीज या पोटनिवडणुकीत मनसेचे दोन पंचायत समिती सदस्यांचे, तर एका जागेवर बहुजन विकास आघाडीच्या सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

या निवडणुकीसाठी तालुकानिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून तलासरी तालुक्याकरिता उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, डहाणू तालुक्याकरिता सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, विक्रमगड तालुक्याकरिता उपविभागीय अधिकारी प्रियंका पाटील, मोखाडा तालुक्याकरिता सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंग, वाडा तालुक्याकरिता उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, पालघर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर, तर वसई तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.


वसई - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. मागील आठ महिन्यांत वसई वाहतूक विभागाने ७१ हजार वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. सव्वादोन कोटी रुपयांहून अधिकचा दंड आकारण्यात आला आहे.वसई विरार शहरात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालावा यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने कारवाई केली जात आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची देखील संख्या वाढू लागली आहे. वाहतुकीच्या समस्यादेखील मोठय़ा प्रमाणात निर्माण होऊ लागल्या आहेत. नियमांचे पालन होत नसल्याने अशा प्रकारच्या समस्येला सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीची समस्या नियंत्रणात यावी यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असतात. मात्र काही वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालविणे, विनाहेल्मेट प्रवास, मद्यपान करून वाहन चालविणे, चुकीच्या लेनमधून गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, बेकायदा प्रवासी वाहतूक, वाहने नो पार्किंग झोनमध्ये लावणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, विनापरवाना वाहन चालविणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन वाहनचालक करीत असतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने काही वेळा अपघात घडतात यात विशेषत: तरुणांचा समावेश असतो. अशा वाहनचालकांना आवर घालण्यासाठी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत वाहतूक पोलिसांनी ७१ हजार ९०६ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. या वाहनचालकांना २ कोटी ४३ लाख १६ हजार १०० एवढा दंड आकारण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.


मुंबई - राज्यसभा पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसने घेतलेल्या पवित्र्यावरुन महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपसमोर लोटांगण घातल्याची भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा बिनविरोध निवडणुकीच्या बदल्यात, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेसने रजनी पाटील तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. मात्र एखाद्याच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी ही परंपरा आहे अशी काँग्रेसची भावना आहे. त्यामुळेच त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. राज्यात होणाऱ्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळेच राष्ट्रवादी-शिवसेना नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीवर विश्वास उरला नाही का? ज्यामुळे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन विनंत्या कराव्या लागल्या? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करायची असेल तर त्या बदल्यात भाजपचे निलंबित १२ आमदारांवरील कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. या साठमारीच्या राजकारणामुळे आणि काँग्रेस नेत्यांच्या आजच्या लोटांगण प्रयत्नामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. दरम्यान, काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार रजनी पाटील यांच्या विरोधातील भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपने अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल. संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील, असे नाना पटोले म्हणाले.


बारामती - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत. जिल्हा बँका चालवण्याचा अधिकार केंद्राने काढून घेतला आहे. अध्यक्ष व संचालक निवडीमध्येदेखील केंद्राचा हस्तक्षेप वाढला असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत,' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामती येथे शनिवारी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, 'पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आम्ही उत्तम प्रकारे चालवली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या पाच बँकामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश होतो. मात्र, सहकारी बँकांमधील अर्थव्यवस्थाच स्वत:च्या ताब्यात यावी, असा केंद्राचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये वकिलांमार्फत कायदेशीर सल्ला घेऊन सहकार विभागाच्या वतीने पुढे न्यायालयात कशा पद्धतीने जाता येईल. राज्य सरकारची सल्लामसलत सुरू आहे. त्यानुसार लवकरच सहकारी बँकामधील केंद्राचा हस्तक्षेप वाढल्याने न्यायालयात जाणार आहोत. यावेळी त्यांनी बारामती शहर व तालुक्यात सुरू असणार्‍या विविध विकासकामांची तसेच प्रकल्पांची माहिती दिली. या दरम्यान मेडद येथे नव्याने बाजार समितीचे पेट्रोल पंप होत आहे. हा पेट्रोल पंप खरेदी-विक्री संघाकडे चालवण्यासाठी देण्यात आला आहे. या पेट्रोल पंपाच्या कामाचे काय झाले, काम किती झाले आहे, अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमादरम्यान केली. या वेळी एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी राहिल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी 'सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या जवळ बसतात. काहीही कारणे सांगता का? त्यांना भेटा, त्यांना अडचणी सांगा. माझ्या गतीने काम करा,' असा सज्जड दम पवार यांनी सबंधीतांना दिला.


सोलापूर - संजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले, असं वक्तव्य करत महाविकास आघाडी सरकार स्थापनेचे संपूर्ण श्रेय काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांना दिले. ठाकरे सरकारचे शिल्पकार शरद पवार यांना मानले जाते. पण मंत्री विश्वजीत कदम यांनी मात्र संजय राऊत यांना सरकारच्या निर्मितीचे श्रेय दिले. मंत्री विश्वजीत कदम सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी सरकार निर्मितीच्या प्रक्रियेवर बोलताना त्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली. संजय राऊतांच्या अंगात आले म्हणून बरे झाले. त्यांच्या अंगात आल्यानेच महाराष्ट्राच्या इतिहासात जे झाले नाही ते घडले, असे विश्वजीत कदम म्हणाले.ते पुढे म्हणाले, 'मी माझ्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मला मतदान केले तरी मी विरोधी पक्षाचा आमदार होणार असे मतदारांना सांगत होतो. कारण त्यावेळेस वातावरण असते होते. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली होती आणि केंद्रात भाजपचे सरकार आले होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोन महिन्यानंतर संजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकास आघाडीचे सरकार बनले.'युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला भरपूर प्रेम दिले. विरोधी पक्षात असताना सांगली-कोल्हापुरात महापूर आला. झोकून देऊन जनतेसाठी काम केले. त्याचे फळ म्हणून विधानसभेला मी १ लाख ६३ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो. 

जयपूर - पोलीस गुप्तचर विभागाने हेरगिरीच्या आरोपाखाली रेल्वे टपाल सेवा जयपूरच्या एका कर्मचाऱ्याला सुमारे ८ दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर टपाल खात्याने त्या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. जयपूरस्थित रेल्वे टपाल सेवेतील एमटीएस कर्मचारी भरत बावरी याला १० सप्टेंबर रोजी गुप्तचर विभागाने अटक केली होती. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या भरत बावरीने भारतीय लष्कराची महत्त्वाची गुप्त कागदपत्रे पाकिस्तानी गुप्तचर एजन्सीच्या महिला एजंटला व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली होती. अटकेनंतर सुमारे ८ दिवसांनी भरत बावरीला टपाल विभागातील विभागातून निलंबित करण्यात आले आहे.

राजस्थान गुप्तचर विभागाचे महानिदेशक उमेश मिश्रा यांच्या मते जयपूरस्थित रेल्वे पोस्टल सर्व्हिसचे एमटीएस कर्मचारी भरत बावरी हे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या महिला एजंटच्या हनीट्रॅपमध्ये अडकले होते. त्या महिलेने बावरी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून व्हॉट्सअॅपद्वारे भारतीय लष्कराच्या सामरिक महत्त्वाचे गोपनीय कागदपत्रांचे फोटो व्हॉट्सअॅपद्वारे मिळवले. हे फोटो पाठवल्या प्रकरणी बावरी यांना अटक करण्यात आली. लष्कर आणि राजस्थानच्या गुप्तचर संघटनेने संयुक्तरित्याही कारवाई केली. त्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.चौकशीमध्ये भरत बावरी हा मुळचा जोधपूर जिल्ह्यातील खेडापा गावचा रहिवासी आहे. तीन वर्षापूर्वीच तो एमटीएस परीक्षेच्या माध्यमातून रेल्वेच्या पोस्टल विभागात जयपूरच्या कार्यालयात सेवेत रुजू झाला होता. इथे तो आवक जावक विभागात पत्रांच्या छाननीचे काम करत होता. मागील ४ ते ५ महिन्यापूर्वी त्याच्या फेसबूकच्या मॅसेंजरवर महिलेचा संदेश आला होता. त्यानंतर काही दिवसांनतर ते दोघे व्हाट्सएप पर व्हिडिओ कॉलवरून संभाषण करू लागले. त्या महिलेने तिचे नाव छदम असे सांगत ती पोर्ट ब्लेयरमध्ये नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून एमबीबीएसची तयारी करत असल्याचे तिने सांगितले होते. हनीट्रॅप करणाऱ्या महिलेने जयपूरमधील एका नातेवाईकाचे लष्कारातील दुसऱ्या विभागात बदली करयाचे असल्याचे सांगत बावरीकडून लष्करासंबंधात येणाऱ्या कागदपत्रांची माहिती मागवण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने आरोपी बावरीला जयपूरला येऊन भेटण्याचे आणि फिरायला जायचे, त्याच्या सोबत राहायचे आश्वासन देऊन त्याला स्वत:चे काही फोटो पाठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी चांगलाच तिच्या जाळ्यात फसल्याचे लक्षात आल्यानंतर तिने महत्वाची माहिती मागवायला सुरुवात केली आणि बावरीने देखील तिला लष्कराच्या गोपनिय दस्तावेजांचे, पत्रांचे फोटो व्हाटसअॅप करायला सुरुवात केली.आरोपीच्या फोनची तपासणी करून तथ्य तपासल्यानंतर आरोपी विरोधात शासकीय गोपनिय माहिती अधिनियम १९२३ च्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या चौकशीमध्ये   स्पष्ट झाले आहे, की तो त्या महिलेच्या मागणीवरून स्वत:च्या नावे एक सिम आणि मोबाईलाचा ओटीपी देखील शेअर केला होता. ज्याचा वापर लष्कारातील अन्य जवानांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी करता येईल.

चंदीगड - पंजाबचे मावळते मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे शनिवारी सायंकाळी ४.३० वाजल्याच्या सुमारास राजीनामा सोपवला. यानंतर मीडियाशी बोलताना 'पक्षात अपमानजनक वागणूक देण्यात आल्याची भावना' कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केली. 'आज सकाळीच माझा निर्णय झाला होता. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून संवाद साधून माझा हा निर्णय त्यांना कळवला होता. मला अपमानजनक वागणूक देण्यात आली. माझ्या नेतृत्वावर शंका उपस्थित करण्यात आली. दोन महिन्यांत तीन वेळा संवाद न साधता नेतृत्वाकडून थेट विधिमंडळ दलाची बैठक बोलावण्यात आली. आता मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांच्यावर सोपवावी', असे वक्तव्य मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना कले.'राजीनाम्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाचा होता. त्याप्रमाणे मी राजीनामा सोपवला. मी अद्यापही काँग्रेस पक्षात आहे. साडे नऊ वर्ष मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. समर्थकांशी चर्चा केल्यानंतरच पुढचा निर्णय घेईल. माझ्यासमोर अनेक मार्ग खुले आहेत', असेही अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे.


कोलकाता - पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. भाजपचे माजी खासदार, गायक तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमुलचे महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि तृणमुलचे राज्यसभा खासदार डिरेक ओ ब्रायन यांनी बाबुल सुप्रियो यांचे पक्षात स्वागत केले आहे. त्यांनी तृणमुलमध्ये प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार तथा गायक बाबूल सुप्रियो यांनी १ ऑगस्ट २०२१ रोजी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. आई-वडील, पत्नी, मित्र यांचा सल्ला घेतल्यानंतर राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. बाबूल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास हा भाजपला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा देत असल्याचे सांगत मन मोकळे केले होते. २०१४ सालापासून नरेंद्र मोदी सरकारमध्ये निरनिराळ्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. ते दोन वेळा आसनसोलचे खासदार राहिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते तृणमूलचे अरूप विश्वास यांच्याकडून पराभूत झाले होते. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या विस्तारात त्यांना वगळण्यात आले. यावेळी भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्यांनी फेसबूक पोस्ट लिहून आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या. 

नवी दिल्ली - इसिसची विलायत हिंद नावाने भारतामध्ये शाखा कार्यरत आहे. या दहशतवादी संघटनेने स्वात-अल-हिंद नावाने मासिक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये इसिसने आपल्याच दहशतवादाच्या कामगिरीचे बोल गात धक्कादायक दावे केले आहेत.काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या अब्दुर रहमान अल लोगरी या दहशतवाद्याला नवी दिल्लीत पाच वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती. २५ वर्षांचा असताना अब्दुर रहमान हा दिल्लीत आला होता. त्याने दिल्ली-फरीदाबादमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेशही घेतला होता. तेव्हा हा दहशतवादी काश्मीरमधील बदला घेण्याच्या मोहिमेवर होता, असे इसिसने म्हटले आहे. त्याला भारतीय पोलिसांनी अटक करून अफगाणिस्तानच्या ताब्यात दिले होते. दहशतवाद्याने १६ ऑगस्ट २०२१ रोजी काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सहभाग घेतला होता. ही घटना तालिबानने काबुल ताब्यात घेतल्यानंतर ११ दिवसांनी घडली होती. अमेरिकेच्या सैनिक तुकडींपासून अवघ्या ५ मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. त्याच्या आत्मघातकी हल्ल्यात २५० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये १३ नौसैनिक तर १२ हून अधिक तालिबानी सैनिकांचा मृत्यू झाला होता.

अब्दुर रहमान अल-लोगरीला दिल्लीमध्ये सप्टेंबर २०१७ ला अटक केली होती. त्याच्यावर १८ महिने रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेने पाळत ठेवली होती. एवढेच नव्हे तर त्याला दिल्लीमधील लजपत नगरमध्ये अपार्टमेंट भाड्याने मिळवून देण्यास मदत केली होती. यामधून त्याने अब्दुर रहमान अल-लोगरीचा विश्वास संपादन केला होता. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या कस्टडीमध्ये त्याला ठेवण्यात आले. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर १४ व १५ ऑगस्टला तुरुंगातील कैद्यांची मुक्तता केली. त्यामध्ये या दहशतवाद्याचाही समावेश होता.


मुंबई - बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. शिल्पाने एका सकारात्मक विचारासोबत आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकातील एक पेज शेअर करत आपल्या भविष्यकाळाकडे इशारा केला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. शिल्पाच्या पतीला जुलैमध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनेक व्यक्तींनी समोर येत धक्कादायक खुलासे केल्यामुळे हे प्रकरण फारच गंभीर बनले आहे. तसेच पोलिसांनीही आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. या सर्व तणावाच्या वातावरणामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी एका पुस्तकाचे पान शेअर केले आहे.हे पान शेअर करत त्यामध्ये म्हटले आहे, 'कोणताही व्यक्ती परत मागे जाऊ शकत नाही. मात्र एक नवी सुरुवात नक्कीच करू शकतो. आत्तापासून सुरुवात करून त्याचा शेवट उत्तम करू शकतो. माणूस आपला मोठ्या प्रमाणात वेळ आपल्या चूका आणि चुकीच्या निर्णयांचा विचार करत वाया घालवतो. खूप तर्कवितर्क लावल्यांनंतर आपल्या लक्षात येत कि आपण चुकीचे निर्णय घेतले होते. आपण समजूतदार असतो, आपण धैर्यवान असतो तर हे सर्व घडले नसते. मात्र कितीही विचार केला तरी आपल्याला मागच्या गोष्टी बदलता येणारच नाही. मात्र इथून पुढे आपण योग्य निर्णय घेत पुढे जाऊ शकतो. चांगल्या लोकांच्यासोबत आपण पुढे जाऊ शकतो'. पुढे म्हटले आहे, 'आपण स्वतः सोबत चांगले राहू शकतो. वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकतो. आपल्याला हवं तसे आयुष्य आपण घडवू शकतो. आपल्याला आयुष्यात चांगले आयुष्य घडवण्यासाठी इथून पुढे अनेक संधी येऊ शकतात'. तसेच यामध्ये शेवटी लिहिले आहे,' मी भूतकाळात काय केले  यावरून माझी पारख होऊ नये. तर मी भविष्यकाळात उत्तम आयुष्याची रचना करू शकते'. शिल्पा शेट्टीची हि पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवत म्हटले होते, 'मी माझ्या कामात अतिशय व्यग्र होते. मला माहिती नव्हते राज कुंद्रा काय करत होते'.

मुंबई - अफगाण रेस्क्यू संकटावर चित्रपट "गरुड" हा चित्रपट बनववला जाणार असल्याची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. अलिकडेच अफगाणीस्तानवर स्थानिक तालिबान गटाने हल्ला करुन देशाच्या सत्तेवर कब्जा केला. गेल्या २० वर्षापासून अमेरिकन सैन्याच्या मदतीने सुरू असलेली अफगाणमधील लोकशाही रुजवण्याची प्रक्रिया यामुळे धुळीस मिळाली. तालिबान्यांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सामान्य नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. अफगणाच्या विमानतळावर जीव वाचवण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी आणि त्यानंतर उद्भवलेली परस्थिती याच्या बातम्या जगभर झळकल्या. याच संकटातून नागरिकांची सुटका करण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहीमेवर आधारित ''गरुड'' हा चित्रपट बनणार आहे. अफगाण रेस्क्यू संकटावर चित्रपट "गरुड" हा चित्रपट बनववला जाणार असल्याची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे. 'अटॅक' या जॉन अब्राहमसोबतच्या चित्रपटानंतर निर्माता अजय कपूर 'गरुड'ची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे संगीतकार रवी बसरुर असतील.'गरुड' चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 

मुंबई - दिल्ली सहा दहशतवाद्यांना अटक केल्यापासून मुंबईसह सर्व प्रमुख शहरातील सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. मुंबईत एटीएस व गुन्हे शाखेने  एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याचवेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई लोकलवर विषारी गॅसच्या साहाय्याने हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्याचे समजते .

गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर मुंबई लोकल स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही संशयास्पद आढळल्यास कसून तपासणी केली जात आहे. रेल्वे स्थानकांवरील मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांनी मुंबई लोकलला लक्ष्य करण्याचा कट रचला होता. त्यासाठी मुंबई लोकलची रेकी देखील करण्यात आली होती. त्यामुळे खळबळ उडाली असतानाच मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा व एटीएसच्या संयुक्त पथकाने आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. झाकीर असे त्याचे नाव असून त्याला जोगेश्वरीतून ताब्यात घेण्यात आले आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या जान मोहम्मद अली शेख याचे मुंबई कनेक्शन उघड झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. गर्दीची ठिकाणे हे दहशतवाद्यांचे प्रमुख लक्ष्य असते हे यापूर्वीच्या हल्ल्यातून स्पष्ट झालं आहे. मुंबई लोकल हे दहशतवाद्यांचा सॉफ्ट टार्गेट आहे. यापूर्वीही मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवून हल्ले करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात असाच हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्लान आहे. लोकल ट्रेनमध्ये विषारी गॅस हल्ला करून किंवा गर्दीच्या स्थानकांवर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचा कट रचण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवी मुंबई - स्थानिक, अनुनभवी, कार्यकर्त्यांच्या खाद्यांवर सिडकोसारख्या हजारो कोटी वार्षिक ताळेबंद असलेल्या महामंडळाची जबाबदारी देण्यापेक्षा ती नगरविकास विभागाच्या कॅबिनेट मंत्र्यांवर देण्यात यावी या सिडको प्रशासनाच्या अलिखित प्रस्तावाची दखल राज्य शासनाने घेतल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुरुवारी केलेल्या वक्तव्यावरून हे स्पष्ट दिसून येत आहे. सिडको स्थापनेनंतर प्रारंभीच्या काळात या महामंडळाच्या अध्यक्षपदावर उच्चशिक्षित, अनुभवी, प्रशासनाची जाण असलेल्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मागील काही वर्षांत या पदावर नियुक्ती करताना केवळ पक्षातील प्रमुख नेत्यांच्या मर्जीतील इतकाच निकष लावण्यात आला होता. त्यामुळे सनदी अधिकारी व या अध्यक्षांचे खटके उडत असल्याची चर्चा आहे. वित्त तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सिडकोत एक आढावा बैठक घेतली. ही बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. हे तीन पक्षांचे सरकार असल्याने तीन पक्षांच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन महामंडळावरील अध्यक्ष व संचालकांच्या नियुक्त्या कराव्या लागत आहेत. दोन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये महामंडळांची वाटणी करणे सोपे होते, मात्र या सरकारमध्ये महाविकास आघाडीबरोबरच अपक्ष, प्रहारसारख्या संघटनांनादेखील स्थान द्यावे लागत आहे. त्यामुळे सिडकोच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी पवार यांनी सिडकोचा अध्यक्ष हा त्या विभागाचा मंत्री असावा असे मत मांडले आहे. त्यासाठी एमएमआरडीए, म्हाडा आणि एसटी महामंडळाचे उदाहरण देण्यात आले आहे. या महामंडळांचे अध्यक्ष हे त्या विभागाचे मंत्री असल्याची बाब पवार यांनी यावेळी मांडली. त्यामुळे सिडकोचे अध्यक्षपद हे यानंतर नगरविकासमंत्र्यांकडे असावे असे संकेत देण्यात आले आहेत. सिडकोचे अध्यक्षपद कोणत्याही पक्षातील एखाद्या स्थानिक नेत्याला न देता ते त्या विभागाच्या मंत्र्याकडे ठेवण्यात यावे अशी पेरणी गेली एक वर्षभर सिडकोमधून केली जात होती. त्याचप्रमाणे सिडकोचे अनेक प्रश्न हे नगरविकास विभाग व मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित असल्याने त्यांच्याकडील बैठकांसाठी वेळ घ्यावी लागत असल्याने प्रश्नांचे अनेक वर्षे घोगडे भिजत राहात असल्याचे दिसून आले आहे. सिडकोतील उच्च अधिकाऱ्यांनी ही बाब मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने उमुख्यमंत्र्यांनी गुरुवारच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी हे संकेत दिले. 


ठाणे - घरी येऊन आईला धमकी दिल्याच्या रागातून एका सराईत गुंडाची त्याच्याच ५ मित्रांनी दिवसाढवळ्या भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहदारीच्या रस्त्यावर घडली आहे. तर विठ्ठलवाडी आणि हिललाईन पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत हत्येप्रकरणी पाच आरोपींना गजाआड केले आहे. आकाश शिंदे उर्फ चिंट्या, अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, यश रुपवते, अवि थोरात अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून सर्व आरोपी सराईत गुंड असल्याचे समोर आले आहे. तर सुशांत उर्फ गुड्या गायकवाड असे हत्या झालेल्या सराईत गुंडाचे नाव आहे, असे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांनी सांगितले. मृतक सुशांत उर्फ गुड्या गायकवाड हा पूर्वी उल्हासनगरमधील सुभाष टेकडी परिसरात राहत होता. या परिसरात त्याची दहशत होती. त्यानंतर तो माणेरे गाव येथे राहण्यास गेला. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मृत गुड्या हा न्यु इंग्लिश शाळेजवळ दोन मित्रांसोबत चहा पीत उभा होता. त्यावेळी त्याच्या मागावर असलेल्या पाच जणांच्या टोळक्याशी त्याचा वाद झाला. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे तो बंगलो भागातील रोडवरून जीव वाचविण्यासाठी पळाला. मात्र पाच जणांच्या टोळीने त्याच्यावर धारदार शस्रांनी हल्ला केला आणि शस्त्र तिथेच टाकून पळ काढला. पंधरा ते वीस मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गुड्याला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा डोक्यावर आणि हातावर गंभीर दुखापती असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे, हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र, विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तोपर्यंत विठ्ठलवाडी आणि हिललाईन पोलिसांची पथके रवाना झाली होती. विठ्ठलवाडी पोलिसांनी आकाश शिंदे उर्फ चिंट्या, अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, यश रुपवते या आरोपींना तर हिललाईन पोलिसांनी अवि थोरात या आरोपीला अटक केली, असे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांनी सांगितले.


मुंबई - मुंबईच्या बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना घडली. या उड्डाणपूलाचे काम सुरु असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली. हा अपघात झाला तेव्हा पूलावर तब्बल २० ते २५ मजूर काम करत होते. त्यावेळी या पूलाचा एक गर्डर निखळून खाली पडायला सुरुवात झाली. पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले. हे सर्वजण थेट बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले आहेत. या मजूरांच्या दुखापतीचे स्वरुपत कितपत गंभीर आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेची बातमी मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरु केले. त्यांनी जखमींना नाल्यातून बाहेर काढून  नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. कोणीही पूलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती नाही. हा उड्डाणपूल कसा पडला, याचे कारणही अद्याप समजलेले नाही. मात्र, यावरुन आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे.


मुंबई - सिनेअभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने अचानक धाडी टाकल्या आहेत. यावरुन सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत, असा दावा अग्रलेखातून संजय राऊत यांनी केला. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच झोतात आला. गोरगरीबांचा मसीहा, मुंबईतून परराज्यांत जाणारे मजूर वगैरे लोकांचा आधारस्तंभ म्हणून त्याचा बोलबाला सुरु झाला. बसेस, ट्रेन्स, विमाने बुक करून सोनू सूद मुंबईत अडकलेल्या लोकांना परराज्यांतील त्यांच्या घरी पाठवीत होता. तेव्हा ”जे सोनूला जमते ते महाविकास आघाडी सरकारला का जमत नाही?” असले  प्रश्न विचारण्यात आले. दुसरे म्हणजे सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्यांत भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. सोनू कोरोना काळात मजुरांना मदत करीत होता. सोनूने देशातील १६ शहरांत ऑक्सिजन प्लॅण्ट लावले, स्कॉलरशिपची योजना सुरू केली. त्या माध्यमांतून त्याचा बोलबाला झाला. या कार्यक्रमांना भाजपचे लोकही उपस्थित राहत. महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी सोनूस राजभवनावर बोलावून खास चहापान केले. तोपर्यंत सोनू हा भाजपाला आपला, म्हणजे भाजपचा अंतरात्मा वाटत होता. सोनू महाशय जे महान समाजकार्य करीत आहेत त्यामागे फक्त भाजपचीच प्रेरणा, परंपरा आहे, असे ठासून सांगितले जात होते, पण सोनूच्या समाजकार्याशी पंजाब, दिल्लीसारख्या सरकारांनी हात मिळविण्याचा प्रयत्न करताच सोनू सूद म्हणजे करबुडवा असे ठरविण्यात आले.आयकर विभागाने सोनूला पिळून काढल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जे भाजपशी संबंधित नाहीत अशांचा तपास यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त करायचा हे एक धोरण ठरले आहे. त्यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मंत्री सुटले नाहीत तसे सोनू सूदसारखे कलाकार व सामाजिक कार्य करणारेही सुटले नाहीत.


मुंबई - दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी एकूण सहा संशय़ित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यांची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. अटक केलेल्या संशयितांमध्ये मुंबईत राहणाऱ्या एकाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे नाव समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख असून त्याला राजास्थानच्या कोटामधून अटक करण्यात आली. तो सायन वेस्टमधल्या एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. देशात सध्या सणांसुधीचे दिवस आहेत. या पार्श्वभमीवर देशात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. हा कट दिल्ली पोलीस तसेच एटीसने उधळून लावला. पोलिसांनी एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी एक जण मुंबईतील सायन परीसरात वास्तव्यास होता. जान मोहम्मद शेख असे त्याचे नाव आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून अटक केली. शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जात होता. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख हा दाऊदचा भाऊ अनिस याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. दहशतवादी हल्ल्याचा कट उघट झाल्यानंतर यामध्ये मुंबईतील जान मोहम्मद शेख सामील असल्याचे समोर आले. ही बाब समजताच सायन परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस जान शेखच्या घरी पोहोचले. तसेच पोलिसांनी घराची तपासणी करुन त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. सध्या जान शेखचे कुटुंबीय धारावी पोलीस ठाण्यात असून त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे धारावी पोलीस ठाण्यासमोर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे संशयित ISI च्या देखरेखीखाली भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी अटक केलेले आरोपी शस्त्रास्त्रे तसेच दारुगोळा जमवत होते. मात्र, या घातपातची माहिती दिल्ली पोलीस विशेष कक्षाला तसेच एटीएसला समजली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या एटीएससोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छापेमारी केली. तसेच येथे तीन संशयित आरोपींना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दारुगोळा तसेच शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत.अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती समोर आली आहे. सध्या देशात  गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी मंगळवारी सोमय्यांविरोधात १०० कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकला आहे. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पावली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना ७२ तासात उत्तर देण्यास सांगतिले आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर आरोप करतानाच काही पुरावेही सक्तवसुली संचालनालय व आयकर विभागाला दिले होते. दरम्यान परब यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या सांगलीतील संपत्तीची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी यांनी ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांवर १२७ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. सोमय्यांचे आरोप आणि सत्य परिस्थिती यासंदर्भातली माहिती पवारांनी मुश्रीफांकडून घेतल्याचे कळते. दरम्यान, मुश्रीफ यांनीही सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करणार असल्याचे कालच सांगितले आहे.

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याबाबतचे २७०० पानांचे पुरावे सोमय्या यांनी मुंबईत आयकर विभागाला दिले आहेत. ठाकरे सरकारच्या डर्टी ११ची नावे मी जाहीर केली होती. यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे, असं सोमय्या यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनीही यापूर्वी सोमय्या यांच्यावर १००१ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यासमोर आता केलेले आरोप सिद्ध करण्याचे आव्हान असणार आहे.


मुंबई - बापा हो गयी मुझसे गलती से मिस्टेक या गाण्याची सध्या चर्चा साडीच्या सर्व स्थरातून होत आहे. १० वर्षाच्या मधुरा कुलकर्णी ने एक मजेशीर गाणे गायले आहे जे यू ट्यूब वर धमाल करत आहे. सध्याच्या लॉकडाउन च्या काळात सर्व लहान मुलांचा होत असलेला वैताग तिने गणपती बाप्पाकडे मंडला आहे. गाण्यातून बाप्पांकडे शाळा लवकर सुरु करण्याची विनंती केली आहे. तिच्याकडून झालेली 'भलतीच' मिस्टेक काय आहे हे उत्सुकता निर्माण करणारे आहे. मधुरा ही इयत्ता ६ वित सेंट लुईस शाळेत शिकत असलेली मुलगी सध्या लॉक डाऊन काळात गणपतीचे आगमन तिने गणपती बप्पाला साकडे घालून बाप्पा आता  शाळा लवकर सुरू करा या साठी 'वुई किड्स रेडिओ' मुलांनी मुलांच्या चालवण्यात येणाऱ्या रेडिओ वर गायले हे गाणे HTTPS.//youtube.be/BgR.-1ioQuAA  वर असून ३ दिवसात या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे,. त्या मुळे मधुरा व व्हि किड्स रेडिओचे चालक श्री शंतनू जोशी यांचे सर्व स्तरावरून खूप कौतूक होत आहे त्यांनी सर्वांनी  हे गाणे एकूण गाण्यासाठी त्यांचे मुलांचे रेडीओ ला सबक्राइब व लाईक करण्याचे  आवाहन केले आहे.

मुंबई - साकीनाका बलात्कार प्रकरणी संबंधितावर अट्रोसिटीचा दाखल केल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. दरम्यान, पिडीतेच्या कुटुंबाला राज्य शासनामार्फत वीस लाखाची आर्थिक मदत देणार असल्याचे नगराळे म्हणाले. साकीनाका बलात्कार प्रकरणाचा पोलीस तपास कशाप्रकारे सुरू आहे? याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. दोन दिवसांपूर्वी साकीनाका बलात्कार प्रकरणाबाबत सोशल मीडियावर चुकीचा संदेश पसरवला जातो आहे. याबाबत खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे आयुक्त नगराळे यांनी स्पष्ट केले. पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एसीएसटी अ‍ॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. त्याअनुषंगाने तपास सुरू आहे. घटनास्थळावर पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला, त्यानंतर आरोपी कसा पळून गेला, या सगळ्याची पुराव्यासकट माहिती मिळाली आहे. आरोपीकडे असणारे प्रमुख हत्यारही आपण जप्त केले आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सर्व घटनेची माहिती दिली असून आरोपीला अटक केली असून २१ तारखेपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तसेच या संवेदनशील गुन्ह्यासाठी स्पेशल वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत, असे आयुक्त नगराळे यांनी स्पष्ट केले. नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे वॉईस चेअरमन यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार, मुख्य सचिव, अपर उपसचिव आणि इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर या विषावर चर्चा झाली. पोलिसांच्या तपासावर कौतुक करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना २० लाखांची दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत देता येईल तेवढी मदत केली जाईल, असेही आयुक्त नगराळे यांनी सांगितले.

मुंबई -  स्त्रीची,माता-भगिनीं  टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली सूचना मान्य करत पोलिसांना विशेष निर्देश दिले आहेत. यामध्ये इथून पुढे परप्रांतियांची नोंद ठेवण्याचे महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेला दिले आहेत. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पोलिसांना अतिशय महत्त्वाच्या सूचना दिल्या. राज्यात कुठून परप्रांतीय येतात, कुठे जातात, कुठे राहतात, याची कसलीही नोंद नाही. ती नोंद राहिली पाहिजे, परप्रांतीयांच्या बाबतीची माहिती ही स्थानिक पोलीस स्टेशनकडे पर्यायाने राज्य सरकारकडे असली पाहिजे, असे वारंवार राज ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून सांगत असतात. राज ठाकरेंची हीच सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली आहे. 

 गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे. इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.निती आयोगाच्या उद्या (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी. शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल. महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये. 

परप्रांतीयांची कुठलीही नोंद नसल्याने ते कुठूनही येतात, कुठेही राहतात, मर्जीप्रमाणे जगतात.. अनेक गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असतो, हे अनेक वेळा समोर आलेलं आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी अनेक वेळा आपल्या जाहीर भाषणांमधून केला आहे. आता साकीनाक्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन राज ठाकरेंनी केलेली सूचना मान्य केली आहे.

पुणे - लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ लोककलावंत गायक शांताबाई फेम संजय लोंढे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. येत्या १६ तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर कलाकारांचे इनकमिंग सुरु होणार असल्याची चर्चा आहे.शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार कलाकारांकरिता काम करण्याची इच्छा संजय लोंढे यांनी बोलून दाखवली आहे. संजय लोंढे यांचे शांताबाई हे गीत खूपच लोकप्रिय झाले. काही दिवसांत ते तुफान लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांना गाण्याच्या, कार्यक्रमाच्या अनेक सुपाऱ्या मिळाल्या. पण दरम्यानच्या काळत त्यांची लोकप्रियता कमी झाली किंबहुना ती घटली आता पुन्हा एकदा संजय लोंढे प्रसिद्धच्या झोतात आले आहेत. सुरेखा पुणेकरांबरोबर एकूण १२ कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे.


मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मात्र, त्यांनी या दोन्ही नेत्यांची नाव गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. किरीट सोमय्या यांनी मराठीवृत्तवाहिनीवर संवाद साधताना हा दावा केला आहे. माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात २४ हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पाने आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला सूट दिलेली आहे. सोमवारी हे नाव उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करता. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असे फडणवीसांनी मला सांगितले आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले.यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही घेरले. उत्तर आणि प्रत्युत्तर द्यायला हा काय मुशायरा नाही. ठाकरे सरकार आणि आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली. त्यामुळे घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा उद्देश आहे. एखादा कुठला तरी निकाल आला की काही मंत्र्यांना चार दिन की चांदनी असे वाटते. पाच- पंधरा दिवस त्यांना शेरोशायरी करू द्या, असा टोमणा सोमय्या यांनी मारला.ज्या कारणामुळे सुप्रीम कोर्टाने तुरुंगात डांबले ती केस प्रकरण अजूनही सुरूच आहे. छगन भुजबळ यांना एवढेच सांगायचे की उड्या मारू नका. १२० कोटी रुपये रोख दिले गेले आहेत, महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे नव्हते तर कुठल्या नवनाथ घोटाळाचे होते का ते सांगा, असा सवाल त्यांनी केला आहे.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सेटिंगबाजांचे सरकार आहे. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते. आताही राहतात हा बंगला कोणाचा आहे? मी म्हणालो ना, चार दिन की चांदनी आहे. त्याचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या. गेली पाच वर्ष जे त्यांनी सहन केले त्यामुळे ते आनंद व्यक्त करत असतील. मला शेरोशायरीत जायचे नाही कारण ही लूट आहे. भुजबळांचे १२० कोटींची चोरी आम्ही पकडून दिली, असे सांगतानाच शेरोशायरी नाही, १२० कोटी कुठून आले ते सांगा? राजमहलमध्ये राहता तो राजमहल कुणाचा ते सांगा?, असा सवालही त्यांनी केला आहे. 

मुंबई -  भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमय्यांना थेट मोदी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल ४० CISF जवानांच्या सुरक्षेचे कवच असेल. सोमय्यांना झेड दर्जाची (Z security) सुरक्षा असेल. महत्त्वाचे म्हणजे किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांविरुद्ध वात पेटवली आहे. त्यानंतर सोमय्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या.या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली.  सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचे सुरक्षेचे कडे असेल.सोमय्यांच्या घराच्या बाजूलाच बॅरेक बनवून सुरक्षा रक्षकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.भारत सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा पुरवल्या जातात. यामध्ये X, Y, Z, Z प्लस, अशाप्रकारच्या सुरक्षा कवचांचा समावेश आहे. झेड दर्जाच्या सुरक्षा कवचामध्ये २२ सैनिक असतात. यामध्ये चार किंवा पाच NSG कमांडोंचा समावेश असतो. शिवाय एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचादेखील समावेश असतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मविआ सरकारमधील ११ नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावरुन त्यांच्या नावाची यादीच जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत ११ जणांची नावे आहेत. ठाकरे यांचे इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असा इशारा भाजपने दिला. आम्ही ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही घोटाळे केले असतील तर चौकशी करा. अनिल परब प्रकरण आता सुरु आहे, भावना गवळी पुढच्या आठवड्यात आणि जितेंद्र आव्हाड तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्हीही बॅग भरा, असा थेट इशाराच सोमय्या यांनी दिला आहे.

मुंबई - कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये केलेली शिथिलता आणि मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी गर्दी, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून गणेशोत्सवात सर्व नागरिकांनी शिस्तीचे पालन करत अत्‍यंत साध्‍या पद्धतीने सण साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. नेमून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे, अन्यथा साथरोग कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे.मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या दीड वर्षात मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. केरळ आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढू लागल्याने केंद्र सरकारने सणांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध लादण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने सर्व सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन नागरिकांना केले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे.

१) -घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्तींचा समूह असावा. शक्‍यतोवर या व्यक्तींनी ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत. श्री गणेशाची मूर्ती ही घरगुती उत्‍सवासाठी २ फूटांपेक्षा जास्‍त उंचीची नसावी.

२) - सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या आगमनाच्‍यावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील ते मास्क वापरतील आणि सामाजिक अंतर पाळतील. तसेच शक्‍यतो सदर १० व्यक्तींनी ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत. श्री गणेशाची मूर्ती ही सार्वजनिक उत्‍सवासाठी ४ फूटापेक्षा जास्‍त उंचीची नसावी. आगमनासाठी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.

३) - घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे, कुटुंबीयांचे कोविड-१९ साथरोगापासून रक्षण करणे शक्य होईल.

४) - भाविकांना प्रत्‍यक्षदर्शन / मुखदर्शन घेण्‍यास सक्‍त मनाई आहे. गणेशोत्‍सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्‍यमे इत्‍यादीद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी.

५) - सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार / फुले इत्यादीचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल याची दक्षता घ्‍यावी.

६) - घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.

७) - गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे.

८) - घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्यक्तींनी ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.

९) - घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेवू नयेत.

१०) - विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्‍क / शिल्‍ड इत्यादी स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.

११) - शक्यतोवर लहान मुलांनी व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

१२) - सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्‍यांनी मास्‍क वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच सदर १० व्यक्तींनी शक्‍यतो ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत. तसेच, कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.

१३) - सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेवू नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही, अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेवून जावे. विसर्जनादरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेवू देण्‍यास / पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे.

१४) - गणेशोत्‍सवादरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

१५) - मुंबई शहरात एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांच्याकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

१६) - नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महानगरपालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱया भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.

१७) - महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत.मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

१८) - विसर्जनादरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर , मास्‍क, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी संबंधीत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

१९) - प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.

२०) - घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.

२१) - बृहन्‍मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ व भादवि १८६० कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.

नवी दिल्ली - काबूलमध्ये हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक, विशेषत: महिलांनी काबूलमध्ये निदर्शने केली. याचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर प्रदर्शित झाला आहे. यात 'फ्रिडम, फ्रिडम' अशा घोषणा देताना महिला दिसून आल्या.निदर्शकांनी पाकिस्तानने देश सोडून जावे, असे सागणारे फलक हाती धरत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. लोकांचा प्रचंड समूह, ज्यात महिला आणि पुरुषांचा देखील समावेश होता, काबूल येथील पाकिस्तानच्या दुतावाससमोर जमा झाला होता. तालिबानने प्रेस स्वतंत्रतेचे आश्वासन दिल्यानंतरही पत्रकारांना निषेधाचे चित्रीकरण करण्यापासून रोखण्यात आले, असे टोलोचे वृत्त आहे. विरोध करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबानने हवेत गोळीबार केला. घाबरलेले नागरिक घटनास्थळावरून पळ काढत असल्याचे व्हिडिओत दिसून आले. विशेष म्हणजे, नॅशनल रेझिस्टन्स ऑफ अफगाणिस्तान ज्याला नॉरदर्ण अलायन्स देखील म्हणतात, याचा नेता अहमद मसूद याने  राष्ट्रीय उठावाची हाक दिली होती, त्यानंतर हा निषेध झाला. एका भावनिक ऑडिओ संदेशात मसूद याने, तुम्ही कुठेही असाल, अंदर किंवा बाहेर, आपल्या देशाचा सन्मान, स्वातंत्र आणि समृद्धी यांसाठी राष्ट्रीय उठाव सुरू करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो, असे सांगितले होते. मसूद आणि उर्वरित प्रतिकार शक्ती या पंजशीर खोऱ्यात जे प्रतिकारासाठी प्रख्यात आहे तेथे भूमिगत झाले आहेत.पाकिस्तान तालिबानशी समन्वय साधून आहे, अशी अफवा असताना अफगाणिस्तानातील नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात संतापाची लाटही उसळली आहे. विशेष म्हणजे, रविवारी तालिबान आणि पाकिस्तानच्या आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्यात बैठक झाल्याची पुष्टीही तालिबानने केली आहे. तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असताना हमीद आणि तालिबान नेता मुल्ला अब्दुल गणी बरादर यांच्यात ही बैठक झाली आहे.

मुंबई - बेळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. या विजयाचा जल्लोष महाराष्ट्रात देखील भाजपचे कार्यकर्ते साजरा करत आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा घणाघात राऊत यांनी केला आहे. बेळगाव महाराष्ट्रात यावा या मागणीसाठी शेकडो मराठी बांधवांचा बळी गेला. महाराष्ट्रातील ६९ लोकांचा बळी गेला. बाळासाहेब ठाकरे तुरुंगात गेले. आणि तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत तुम्हाला, असे म्हणत राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. सातारा, सांगली कोल्हापुरातून फोन येत आहेत. तुम्ही पेढे वाटता. ठीक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल मात्र मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला आहे. जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणसं माफ करणार नाहीत, असे राऊत म्हणाले.बेळगावमध्ये मराठी माणसाची सत्ता स्थापन होईल, अशी आम्हाला खात्री होती. पराजय हे दुर्दैवी जरी असले, तरी यामागे किती कारस्थान झाले असेल, याची कल्पना करवत नाही. कर्नाटक सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून आणण्यासाठी कट केला असल्याचे राऊत यांनी सांगितले.गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे देखील बेळगावातील मराठी संघटनांच्या पाठिशी कसे राहिले, त्याचे देखील राऊत यांनी उदाहरण दिले. जर तुमचा भगवा तिथे खरच असेल, तर कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा उतरवला तेव्हा तुमच्या तोंडात बोळके का कोंबले होते? असा सवाल भाजपला विचारला आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget