गुलाब चक्रीवादळ संकट ; आंध्र प्रदेशसह ओडिशा किनारपट्टीला हाय अ‌लर्ट

ओडिशा - भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या काही भागात ‘गुलाब’ चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी ‘गुलाब’ चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. आयएमडीच्या वादळ चेतावणी विभागाने चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि उत्तर आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. 

आयएमडीने म्हटले आहे की, वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांमध्ये ७ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळात तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अत्यंत खराब हवामानाचा इशारा ऑरेंज अलर्टच्या स्वरूपात दिला जातो आणि या दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते.भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उमाशंकर दास यांनी सांगितले की, चक्रीवादळाच्या अंतर्गत आंध्र प्रदेश आणि ओडिशासाठी इशारा जारी करण्यात आला आहे. ओडिशा सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गजपति, गंजम, रायगडा, कोरापूट, मलकाजगिरी, नबरंगपूर आणि कंधमाल या सात जिल्ह्यांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार हे वादळ दक्षिण ओडिशा आणि शेजारील आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकू शकते.

बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बघायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget