दोन खंडणीखोर नेत्यांना आरे कॉलनीत वीस हजार घेताना रंगेहाथ अटक

मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दोन खंडणीखोर नेत्यांना पोलिसांनी पैसे घेताना अटक केली आहे. दुकानदाराकडे १ लाख ३५ हजार रुपयांची मागणी केल्यानंतर वीस हजार रुपये घेताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. मुंबईतील आरे कॉलनी परिसरात दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या.मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील आरे कॉलनीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दोन खंडणीखोर नेत्यांना पोलिसांनी पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे. सूर्यप्रकाश भदर्गे (उपाध्यक्ष मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) आणि रेखाताई मोरे (जिल्हा उपाध्यक्ष उत्तर-पश्चिम मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. या दोन्ही खंडणीखोर आरोपींनी आरे कॉलनीमध्ये एका रेशनिंगचा दुकानाचे शिफ्टिंग असल्यामुळे दुकानदाराकडून १ लाख ३५ हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र २०,००० रुपये घेताना आरे पोलिसांनी त्यांना रेड हँड अटक केली आहे.आरे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या दोन्ही खंडणीखोर नेत्यांनी आरे परिसरामधून मोठ्या संख्येने लोकांकडून खंडणी घेतल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींचे आणखी काही साथीदार आहेत का? याचा शोध आरे पोलीस घेत आहेत.



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget