कन्हैया कुमारांसह जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये करणार पक्षप्रवेश

अहमदाबाद  - गुजरातच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैय्या कुमार आणि आरडीएमचे आमदार जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये २८ सप्टेंबरला प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.गुजरातच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. नुकतेच भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भुपेंद्र पटेल यांची नियुक्ती केली आहे. अशी आहे गुजरातमधील राजकीय स्थितीभुपेंद्र पटेल यांच्यासाठी पुढील १४महिने हे महत्वाचे असणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीला फक्त १४ महिने शिल्लक आहेत. निवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये होणार आहे. यात भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भूपेंद्र पटेल यांना पाटीदारातील दोन्ही कुळ म्हणजेच, कडवा आणि लेउवा पटेल यांची मुठ बांधावी लागेल. काही महत्वाची पावले उचलावी लागेल, जेणेकरून राज्यातील नागरिक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर, २०२२ मधील निवडूक ही भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याने ती आव्हानात्मक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे, त्यामुळे पुढील निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget