October 2021

सातारा - जरंडेश्वर साखर कारखान्याला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह संचालक मंडळाच्या मान्यतेनेच कर्जपुरवठा करण्यात आला. आरबीआय आणि नाबार्डच्या नियमानुसारच सर्व प्रक्रिया पार पडली. जरंडेश्वरचे हप्तेही वेळेत बँकेला प्राप्त झाले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजेंचे सल्लागार त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. बँकेचे कामकाज अत्यंत उत्तमरित्या सुरू असून संपूर्ण भारतात ही बँक नावाजलेली आहे. त्यामुळे काहीही बोलून बँकेची बदनामी करणे थांबवावे. जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना संचालक मंडळाची मान्यता घेण्यात आली आहे. कारखान्याला दिलेले कर्ज हे नियमित परतफेड केले जात आहे. बँकेचे ऑडिट नाबार्डच्या माध्यमातून वेळोवेळी होत असते. बँकेत जर चुकीचे काही घडले असते तर बँकेचे कौतुक देशभर झाले नसते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी ग्रुप क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसीबाबत काही संचालक चुकीची व तथ्यहीन माहिती सांगून शेतकरी सभासदांची दिशाभूल करीत आहेत. बँक कायम शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून विविध योजना राबवत असून त्याचा लाभ अनेक सभासद व खातेदारांना होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोट्या व अपुऱ्या माहितीच्या आधारे काही संचालक जाणीवपूर्वक अपप्रचार करीत आहेत, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.विमा पॉलिसीचे धोरण खूप मोठे असल्याने विमा कंपन्यांशी चर्चा करणे गरजेचे होते. बँकेने राष्ट्रीयकृत विमा कंपनी कडून स्पर्धात्मक कोट घेतले. राष्ट्रीयकृत विमा कंपनीना अटी आणि शर्तींसह दरपत्रक, आजारांची यादी, शेतकऱ्यांची यादी देण्यात आली. बँक दरपत्रक मिळवण्यासाठी विमा कंपन्यांकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. पण, सध्याची कोरोना परिस्थिती आणि सुमारे पाच लाख व्यक्ती असणारी एवढी मोठी पॉलिसी असल्यामुळे विमा कंपन्या त्यावर अभ्यास करून कोटेशन देतो, असे वेळोवेळी सांगत होत्या. या पॉलिसीसाठी बँकेच्या संचालक मंडळाने पूर्वीचा अनुभव पहाता साधारणपणे १० ते १२ कोटी खर्च ग्राह्य धरला होता. तथापी सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीमुळे भारतातील सर्व विमा कंपन्यांनी आरोग्य विम्याचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. त्यामुळे प्रिमियम दर वाढला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अहमदाबाद - सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' संकुलात 'राष्ट्रीय एकता दिन' साजरा केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये सहभाही झाले. तसेच त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे समारंभाला संबोधित केले.सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून त्यांना नमन केले. शाह यांनी लिहिले की, 'सरदार पटेल यांचे जीवन आपल्याला सांगते की, एक व्यक्ती त्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती, लोखंडी नेतृत्व आणि अदम्य देशभक्तीने देशातील सर्व विविधतेचे एकात्मतेत रूपांतर कसे करू शकते आणि अखंड राष्ट्राचे रूप देऊ शकते. देशाच्या एकात्मतेसोबतच स्वतंत्र भारताचा प्रशासकीय पाया घालण्याचे कामही सरदार साहेबांनी केले आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले, 'सरदार साहेबांचे मातृभूमीसाठीचे समर्पण, निष्ठा, संघर्ष आणि बलिदान प्रत्येक भारतीयाला देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी स्वत:ला समर्पित करण्याची प्रेरणा देते. अखंड भारताच्या अशा या महान शिल्पकाराच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व देशवासियांना 'राष्ट्रीय एकता दिना'च्या हार्दिक शुभेच्छा.२०१८ मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचे अनावरण करण्यात आले. सरदार पटेल यांचा हा पुतळा १८२ मीटर उंच असून हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.शाह यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर परेडची सलामी घेतली. निमलष्करी दल आणि गुजरात पोलिस कर्मचारी,आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ, सीआरपीएफ आणि बीएसएफचे ७५ सायकलस्वार आणि त्रिपुरा, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर आणि गुजरातच्या पोलिस दलातील १०१ मोटरसायकलस्वारही या परेडमध्ये सहभागी झाले. तसेच ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील २३ पदक विजेतेही या स्पर्धेत सहभागी झाले. २०१४ मध्ये केंद्र सरकारने सरदार पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर हा 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. सरदार पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी नडियाद (गुजरात) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टरचे शिक्षण घेतले आणि परत येऊन अहमदाबादमध्ये वकिली करू लागले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी देशाचे पहिले उपपंतप्रधानपद भूषवले. सरदार पटेल हे भारतीय प्रजासत्ताकचे संस्थापक जनक असल्याचे म्हटले जाते, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावली आणि एकात्म, स्वतंत्र राष्ट्रामध्ये त्याचे एकीकरण करण्याचे मार्गदर्शन केले.

पणजी - प्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेसने राजकारणात पदार्पण केले आहे. क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो राजकीय क्षेत्रात दाखल झाला आहे. आपल्या या नव्या इनिंगसाठी त्याने तृणमूल काँग्रेसची (टीएमसी) निवड केली आहे.तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पेसने गोव्यामध्ये टीएमसीमध्ये शुक्रवारी प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्याचे पक्षात स्वागत केले.आपणास सांगण्यास आनंद होत आहे की, पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. मी अतिशय आनंदी आहे. तो माझा लहान भाऊ आहे. मी जेव्हा युवा मंत्री होते, तेव्हा तो अतिशय तरूण होता. तेव्हापासून मी त्याला ओळखते, असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. येत्या काळात गोव्यात विधानसभा निवडणुका होणार असून ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.

नवी मुंबई - एका महिलेला सुसाइड नोट लिहायला भाग पाडून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपीने महिलेची हत्या करून तिने आत्महत्या केल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत, त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या तोंडून हत्येचा घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

समाधान लांडवे असे अटक केलेल्या ३८ वर्षीय आरोपीचे नाव असून तो एका बँकेत नोकरीस आहे. तर शितल निकम असे हत्या झालेल्या ३६ वर्षीय महिलेचे नाव आहे. आरोपी लांडवे याने काही दिवसांपूर्वी मृत शितल निकम यांच्या पतीला वैयक्तिक ६.५ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. पण अचानक लॉकडाऊन जारी केल्याने निकम यांचे पती आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे त्यांना कर्जाचे हफ्ता भरता आले नाहीत. निकम यांचे पती कर्जाचे हफ्ते भरत नसल्याने लांडवे याच्यावर देखील दबाव वाढला होता.यामुळे २१ ऑक्टोबर रोजी आरोपी लांडवे हा शितल निकम यांना भेटायला गेला होता. यावेळी कर्जाचे हफ्ते देण्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी आरोपी लांडवे याने निकम यांना म्हटले की, 'एकतर मला पैसे दे, नाहीतर मरून जा.'  यावेळी निकम यांनी 'मी मरेन' असे लांडवे यांना सांगितले. यावर लांडवे याने 'मरण्यापूर्वी सुसाइड नोट लिही' असे सुचवले.' पण पुढे काय होणार याची जराशीही कल्पना नसणाऱ्या शीतल यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात सुसाइड नोट लिहिली.यानंतर आरोपीने साडीने गळा आवळून शीतल यांची हत्या केली. तसेच शीतल यांनी आत्महत्या केली असल्याचे भासवण्यासाठी आरोपीने शीतल यांचा मृतदेह पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला. पण पंख्याचा ब्लेड तुटल्याने त्याचा शीतल यांना लटकवता आले नाही. त्यामुळे घाबरलेल्या लांडवे याने शीतल यांचा मृतदेह बेडवर टाकून घटनास्थळावरून पळ काढला. सुसाइड नोटमुळे प्रथमदर्शनी आत्महत्या वाटणाऱ्या या घटनेत काहीतरी काळंबेर असल्याचा संशय रबाळे पोलिसांना होता.याप्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, आरोपी लांडवे आणि मृत निकम यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत, खडसावून चौकशी केली असता, आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या बहीण यास्मिन वानखेडे यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आंबोली पोलिसांनी यास्मिन यांचा जबाब नोंदवला असून दोन दिवसांत तक्रार दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.जर पोलिसांनी २ दिवसांत तक्रार नोंदवली नाही तर, आपण स्वतः एक वकील असून न्यायालयामार्फत केस दाखल करू, असे यास्मिन यांनी सांगितले.दरम्यान, समीर वानखेडेंच्या सुरक्षेमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने वाढ केली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. समीर वानखेडे, आपल्या आणि कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याचे समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. त्यानंतर समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

वैयक्तिक टीकेवर नवाब मलिक म्हणाले..समीर वानखेडे यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये केवळ २ ते ५ ग्राम ड्रग जप्तीच्या कारवाया केल्या. तसेच, वानखेडे यांनी एका प्रकरणात वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल केला. त्यात कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामध्ये चित्रपट जगतातील ३० लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून एकालाही अटक झाली नाही. त्यामुळे, अशा कारवाया खंडणीसाठी वापर करत असल्याने त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी एनसीबीचे उपमहासंचालक यांना करणार असल्याचे नवाब मलिक यावेळी म्हणाले.समीर वानखेडेच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका करत असल्याच्या आरोपावर मलिक म्हणाले की, मी त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले नाहीत. ते दलित नसून त्यांनी एका शेड्युल कास्ट मुलाचा अधिकार हिसकावला आहे. त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न केले आहे. जन्माच्या दाखल्यातही दाऊद समीर वानखेडे असा उल्लेख आहे. समीर वानखेडे यांनी एससी, एसटी कमिशनला खोटे आरोप होत असल्याने कारवाईची मागणी केली, पण तो अधिकार ते दलित नसल्याने नाही. त्यांचे सर्टिफिकेट बोगस असल्याने त्यांचीही चौकशी केली पाहिजे. मंत्री नवाब मलिक हे नियोजित बैठकीसाठी गोंदियाला जात असताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एनसीबीच्या कारवायांवर उपरोक्त टीका केली.

मुंबई  - मुंबई शहर पोलीस दलातील कार्यरत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त शुभेच्छापत्र, दिवाळी फराळ, मिठाई, आणि छोटीसी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. या दिवाळी शुभेच्छा खर्चासाठी मुंबई पोलीस कल्याण निधीचा वापर करण्यात येतो. ही योजना राज्यशासनाची नसून पूर्णतः पोलीस कल्याण निधीची योजना आहे. यंदा मुंबई पोलीसांकरिता कार्यरत असलेल्या ६ पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीसाठी आवश्यक साहित्यावर ७५० रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्याना शिष्यवृत्ती, प्रोत्साहन,विविध अधिकारी कर्मचारी सत्कार,आरोग्यविषयक सुविधा, व्यायामशाळा, वाचनालय तसेच पोलिसांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालय दिवाळी शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू स्वरूपात दरवर्षी देत होते.गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शुभेच्छा पत्र, मिठाई आणि भेटवस्तू वितरित करताना येणाऱ्या अडचणी टाळण्याच्या उददेशाने भेटवस्तूंऐवजी सदर रकमेचे थेट साहित्य खरेदी करण्याचा पर्याय सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे.‘या निर्णयामुळे पोलीस सबसिडीयरी कॅन्टीन मधून खरेदी केलेले साहित्यावर तीस टक्के सवलत मिळते आहे . याबरोबरच यावर्षी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पसंतीचे व आवश्यक असे दिवाळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यामधील ७५० रु किंमतीचे साहित्य देखील मोफत मिळणार आहे. मुंबई पोलीसांकरिता कार्यरत असलेल्या ६ पोलीस कॅन्टीन मधून सदर साहित्य खरेदी करावयाचे असून ही योजना दि. ३० ऑक्टोबर पासून कार्यान्वीत करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

मुंबई - जोगेश्वरी येथील सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केल्यानंतर आता शासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ४० हजार रुपयांची लाच घेताना सुजाता पाटील यांना रंगेहाथ पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुजाता पाटील यांना एसीबीकडून अटक करण्यात आली होती. अखेर आता प्रशासनाकडून सुजाता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.अटकेनंतर सुजाता पाटील यांची विशेष न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती. वकील नितीन सातपुते यांनी सुजाता पाटील यांची बाजू मांडत जोरदार युक्तीवाद केला होता. त्यानंतर न्यायालयाने सुजाता पाटील यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सुजाता पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी आपली बाजू मांडत हे प्रकरण फ्रॅब्रिकेटेड असल्याचे म्हटले होते.

जोगेश्‍वरी येथील एका तक्रारदाराने त्याचा गाळा एका महिलेला भाडेतत्त्वावर दिला होता. ५ ऑक्टोबर रोजी तो गाळा त्यांनी भाडेकरुकडून ताब्यात घेतला होता. मात्र, भाडेकरु महिलेसह इतरांनी गाळ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. याबाबत त्यांनी जोगेश्‍वरी पोलिसांत भाडेकरुविरुद्ध तक्रार केली होती. पण पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी एसीपी सुजाता पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली होती. गाळ्याचा ताबा घेतलेल्या महिलेकडून भविष्यात त्रास होऊ नये म्हणून सुजाता पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती, अशी माहिती समोर आली होती. त्यापैकी १० हजार रुपये त्याच दिवशी घेतले होते. उर्वरित रक्कमेसाठी सुजाता पाटील त्यांच्याकडे तगादा लावत होत्या. त्यामुळे तक्रारदाराने सुजाता पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्यानंतर सापळा रचत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली.

मुंबई - मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड झाली असून त्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी / कर्मचारी यांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर व महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठकीत पार पडली. बैठकीला उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्यासह महापालिका तसेच बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी / कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय घोषित करण्यात आला. 

१) महापालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचारी, प्राथमिक शिक्षकः रु. २०,०००/ २) माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारीः १०,०००/३) प्राथमिक शिक्षण सेवकः रु. ५६००/ ४) आरोग्य सेविकाः रु. ५३००५) विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवकः रु. २८००/

राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. “वीज कंपन्यांमध्ये वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना १२ हजार तर सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल,” अशी घोषणा डॉ. राऊत यांनी या बैठकीच्या समारोप प्रसंगी केली.सुरुवातीला वर्ग १ व २ च्या अधिकारी यांना वगळून १० हजार सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला. मात्र कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर व त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली.

कर्नाटक - कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा मुलगा व कन्नड सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेता पुनीत कुमार यांच्या निधनाने भारतीय सिने सृष्टीला धक्का बसला आहे. ही बातमी समजताच सँडलवूड फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही शोकलहर पाहायला मिळत आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू सह सर्वच भाषेतील दिग्गजांना पुनीतच्या निधनाचा धक्का बसला आहे. सुपरस्टार चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर सांगितले की पुनीतच्या निधनाने आपल्याला धक्का बसला आहे. त्यांनी लिहिले, धक्कादायक,आणि हृदयद्रावक! #PuneethRajkumar खूप लवकर गेला. शांती लाभो. कुटुंबाप्रती माझी तीव्र आणि अश्रूपूर्ण संवेदना. एकूणच कन्नड/भारतीय चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान. या दु:खद नुकसानाला तोंड देण्यासाठी सर्वांना ताकद मिळो!भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सहवाग यानेही शोक व्यक्त केला. त्याने लिहिले, #PuneethRajkumar यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:ख झाले. त्यांचे निधन भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होवो. ओम शांती.दाक्षिणात्य मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार मामुट्टी यांनीही आपली संवेदना व्यक्त करताना लिहिले, पुनीत आता नाही हे जाणून धक्का बसला. खूपच हृदयद्रावकल घटना. हे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान आहे. पुनीत यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांप्रती माझ्या मनापासून संवेदना.


मुंबई - बिग बॉस फेम अभिनेत्री रश्मी देसाईच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. रश्मी देसाई सध्या मालदीवमध्ये आहे आणि या ठिकाणी ती दर्जेदार वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली रश्मी देसाई तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.रश्मी देसाईच्या फोटोंबद्दल सांगायचे तर, या फोटोंमध्ये ती व्हाइट कलरची बिकिनी आणि शॉर्ट स्कर्ट घालून पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. रश्मी देसाईने इन्फिनिटी पूलमध्ये नाश्ता करण्यापूर्वीचे हे फोटो शेअर केले आहेत. रश्मी देसाईचा जाळीदार ड्रेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.काही वेळातच असंख्य लोकांनी रश्मी देसाईच्या फोटोंना लाईक आणि शेअर केले आहेत. सर्व सेलिब्रिटींनी कमेंट बॉक्समध्ये तिचे कौतुक केले आहे.भोजपुरी क्विन मोनालिसाने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, 'ओह.. उफ्फ.' त्याचवेळी अभिनेता नकुल मेहताने एन्जॉय करताना कमेंट केली - खा यार. नाश्ता थंड होईल.रश्मी देसाईच्या इतर सर्व चाहत्यांनीही तिचे कौतुक करताना लिहिले आहे की या जाळीदार ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसते.


वसई - पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने वसई-विरार महापालिकेला आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला खडसावले आहे.  प्रदूषण रोखण्यासाठी आजवर अहवाल का सादर केल नाही त्याचे कारण तसेच काय उपाययोजना केल्या आहेत त्याचा अहवाल ७ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश लवादाने पालिकेला दिले आहेत. महापालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे शहारातील पर्यावरणाचा ऱ्हास होत असून प्रदूषण वाढू लागले आहे. त्याचा घातक परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडे पर्यावरणवादी कार्यकर्ते चरण भट यांनी याचिका दाखल केली होती. शहरातील पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आणि प्रदूषणाचा वाढता स्तर याची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने नुकतीच शहराची पाहणी केली आणि हवेचे तसेच पाण्याचे नमुने गोळा केले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि पालिकेने अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली. त्यावर आधी देखील मुदत दिली होती, त्यावर काय केले असा सवाल लवादाने केला. यापूर्वी अहवाल सादर करण्यासाठी मुदत देऊनही पालिका आणि प्रदूषण मंडळांनी काही केले नाही. त्याबद्दल लवादाने तीव्र शब्दात नाराजी आणि संताप व्यक्त केला. पर्यावरण या विषयाकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचे हरित लवादाचे तज्ञ डॉ. अरूण कुमार वर्मा यांनी सांगितले. लवादाने पालिकेला प्रतिदीन साडेदहा लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याबद्दल काय केले याची विचारणा लवादाने केली. यासंदर्भात ७ डिसेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश हरित लवादाने दिले आहेत. यापूर्वी अहवाल सादर का केला नाही त्याबाबद प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही निर्देश लवादाने दिले आहेत. वसई विरार शहरातील  वायू आणि जलप्रदूषण वाढले आहे. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रकल्प राबविण्यात पालिकेला अपयश आलेले आहे. वसई विरार महापालिकेची गोखिवरे येथे कचरा भूमी आहे. २०१३ पासून या ठिकाणचा कचरा उचलण्यात आलेला नाही. पालिकेने कुठलाही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी १७ लाख टन कचरा जमा झालेला आहे.  नागरी वस्ती मधून लगतच्या जलस्रोतामध्ये विनाप्रक्रिया सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे ९० पेक्षा अधिक पाणवठ्यांचे नुकसान झाले आहे. महानगरपालिका क्षेत्रात १८४ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन इतक्या प्रमाणात सांडपाण्याची निर्मिती होत असताना जेमतेम १५ एमएलडी इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. शहरातील ७ मंजूर सांडपाणी प्रकल्पांपैकी केवळ एकच प्रकल्प सुरू आहे. महानगरपालिका क्षेत्रात वार्ड निहाय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याची गरज असताना महानगरपालिका स्वत: १०५ एमएलडी सांडपाणी पेल्हार नदीत विनाप्रक्रिया सोडत आहे. शहरात उभ्या असणाऱ्या बेकायदा बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्मिती होत असून शहरात विविध  ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या घातक घनकचऱ्यामुळे हवेतील प्रदूषण व पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले आहे. याबाबत वसईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते चरण भट यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती.


मीरा भाईंदर - मिरा रोडच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. राघवेंद्र मिश्रा असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना ४० हजारांचे किंवा पाच हजारांचे इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगितल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. यानंतर न विचारताच रुग्णालयातील डॉक्टरांनी पाच हजारांचे इंजेक्शन दिल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबियांनी शवविच्छेदन केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत रुग्णालय व्यवस्थापन व डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबातील सदस्यांनी यांनंतर घेतला.

भिवंडी - शुल्लक वादातून एका ४५ वर्षीय आरोपीने शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर चाकूने हल्ला करीत दोघांची हत्या केली. तर याच कुटुंबातील चौघा माय - लेकांवरही चाकूने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटनाही घडली आहे. ही घटना गैबीनगर मधील खान कंपाऊंड परिसरात असलेल्या खान चाळीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येसह गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक केली आहे.मोहंमद अन्सारुलहक मोहंमद लुकमान अन्सारी वय (४५ ) असे दुहेरी हत्याकांडात अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव असून कमरुजमा अन्सारी (वय ४२) आणि इम्तियाज मो. जुबेर खान (वय ३५) असे हत्या झालेल्या दोघांचे नावे आहेत. तर मृत झालेल्या अन्सारींची पत्नी हसीना (वय ३६) आरीबा वय १६) रेहान (वय १५) हफ़िफ़ा (वय ११) हे जखमी झाले आहेत. भिवंडीतील गैबीनगर भागातील खान कंपाउंड परिसरात हल्लेखोर व अन्सारी कुटूंब समोरच एका चाळीत राहतात. काही दिवसापूर्वी मृताची पत्नी हसीनाने हल्लेखोराला 'भाइयों का फुकटका खाता है. और लोगो को परेशान करता है' असा टोमणा मारला होता. याचाच राग मनात धरून (शुक्रवारी) हल्लेखोराने कमरुजमा अन्सारी यांच्या घराबाहेर उभा असताना त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोर चाकूने हल्ला करताना शेजारी राहणारा इम्तियाजने मध्यस्थीस आला. हे पाहून हल्लेखोराने त्याच्यावरही चाकूने वार केले. यावेळेस पत्नी हसीना व इतर तिघे मध्ये आले असता त्यांनाही जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दखल झाले. मात्र परिसरात तणावाचे वातावरण असल्याचे पाहून अधिक पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस हवालदार प्रसाद काकड, किरण जाधव , श्रीकांत पाटील, अमोल इंगळे, रवी पाटील या पोलीस पथकाने आरोपीला पोलीस ठाण्यात आणले. हल्लेखोर हा परिसरातील एका मशिदीसाठी देगणी जमा करण्याचे व त्याचा हिशेब ठेवण्याचे काम करत होता. तर घटनस्थळी पोलिसांनी पंचनामे केले.जखमींचे रुग्णालयात उपचार सुरु आहे. या दुहेरी हत्याकांडाचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.

ठाणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाही. एका रिक्षाचालकाने ठाणे येथील एका ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ भांडुप येथे खाडी परिसरातील झुडुपात नेऊन रिक्षाचालकाने या महिलेवर बलात्कार केला. महिलेच्या पोलीस तक्रारीनंतर रिक्षाचालक ब्रिज मोहन गिरी (४०) याला अटक करण्यात आली आहे.ठाण्यात राहणाऱ्या चाळीस वर्ष महिलेने काही दिवसांपूर्वी रिक्षामधून प्रवास करताना तिच्या नातेवाईकांशी मोबाईल वरून ती नोकरीच्या शोधात असल्याच्या संदर्भात संभाषण केले होते. नेमके हेच संभाषण या रिक्षाचालकाने ऐकले आणि त्याने तिला नोकरी देण्याचा आमिष देत तिचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर शनिवारी या रिक्षाचालकाने संबंधित महिलेला फोन करून तिला नोकरीला लावण्यासाठी एका इसमाची भेट घालायची असल्याचे आमिष दाखवले आणि तो त्या महिलेला भांडुप पूर्व द्रुतगती मार्गावर असलेल्या कांदळ वनात दुपारच्या वेळी घेऊन गेला.त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला आणि जर कोणाला याची कल्पना दिली. तर जिवे ठार मारण्याची धमकी देत त्याने या महिलेला पुन्हा ठाण्यात नेऊन सोडले. यावेळी त्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील हिसकावून घेतले आणि त्या ठिकाणाहून तो फरार झाला. पीडित महिलेने वागळे पोलीस स्टेशन गाठून याची माहिती दिली आणि अखेर वागळे पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करून विक्रोळी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग केला. त्यानंतर विक्रोळी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर वसईवरून रिक्षाचालक ब्रिज मोहन गिरी याला अटक केली. दरम्यान ब्रीजमोहनला विक्रोळी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली. तब्बल २६ दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाला. जामीन तर मिळाला मात्र, कोर्टाची ऑर्डर मिळाली नसल्याने आर्यनला कालची आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली.त्यानंतर आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.गुरुवारी संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या जामीनासाठी जामीनदार म्हणून सेशन कोर्टात पोहोचली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात दाखल झाले होते. मानेशिंदे यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. यावेळी जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली.कोर्टात जुही चावलाने आपले आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर केले. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. मात्र यावेळी जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडला. त्यामुळे जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर झाला.दरम्यान, मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू होता. अखेरीस आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला. जामीन अर्जामध्ये अनेक अटींची आर्यनला पालन करावे लागणार आहे.एकूण ५ पानांची ॲार्डर आहे. १ लाख रुपयांचा जातमुचलक्यावर प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा गुन्हा परत करू नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, देश सोडू नये,  मीडियाची, सोशल मीडियावर बोलू नये असे नियम घालण्यात आले आहे. त्याचबरोबर NCB ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी ११ ते  २ वेळात हजर राहावे लागणार आहे.


मुंबई - एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या भावनिक पत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती रेडकर यांचा या प्रकरणाशी संबंधच काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.क्रांती रेडकर यांच्यावर कुणी व्यक्तिगत टीका टिप्पणी केली असे माझ्या पाहण्यात नाही. ईडी, सीबीआय, एनसीबी हे बाहेरचे अधिकारी महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. ते मराठीच आहेत ना, ते काय अमराठी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी हा सवाल केला.दिल्लीतून केंद्रीय तपास यंत्रणांचे ज्या प्रकारे आक्रमण सुरू आहे, कारण नसताना अनेकांच्या मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहे. कालही देगलूरमध्ये निवडणूक सुरू असताना धाडी पडल्या. अशोक चव्हाण मराठी नाहीत का? अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथे सर्वच मराठी आहेत. प्रश्न सत्य आणि असत्याच्या लढाईचा आहे. खरे आणि खोट्याची लढाई आहे. पाहू आता काय होते ते, असेही म्हणाले. 

क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तीच आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आहे. सरकार हे ठाकरे सरकार आहे. शरद पवार आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथे कुणावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी समीर वानखेडेंबाबत बोलण्यास नकार दिला. गुन्हा महाराष्ट्रात घडला. त्याविषयी मी फार बोलणार नाही. कारण तो सरकारचा विषय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पती समीर वानखेडे यांच्यावर आरोप होऊ लागल्यानतंर क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्रं लिहिले होते. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटले नसते.. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचे किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेले आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती, असे क्रांतीने पत्रात म्हटले होते.
मुंबई - भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे कालपासून समीर वानखेडेंना भेटत आहेत. मी येत्या हिवाळी अधिवेशनात या नेत्यांची नावे जाहीर करणार आहे. त्यावेळी या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणे मुश्किल होईल, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे हे नेते कोण? असा सवाल केला जात आहे. यावेळी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खळबळजनक दावा केला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी जी परिस्थिती होती. ती परिस्थिती आता राहिली नाही. परिस्थिती बदलल्यानंतर कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड वानखेडेंना भेटत आहेत. काशिफ खानला अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे. त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहे. हे उघड होईल, येणारे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. विधानसभेत मी जे काही समोर आणणार या राज्यात ते नेते तोंड दाखवू शकणार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे.

अधिवेशनात माझे नाव घेऊन हल्ले होतील. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होणार आहे. मी विषय डायव्हर्ट करावा म्हणून प्रयत्न होईल. पण मी कुणाचे नाव घेऊन मी विषय डायव्हर्ट करणार नाही. पण हिवाळी अधिवेशनात मी मोठमोठे नावे जाहीर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.ड्रग्ज पार्टीतील दाढीवाला सेक्स रॅकेट, पोर्नोग्राफी, ड्रग्ज रॅकेट चालवतो. त्याला अटक का केली नाही? ज्याने पार्टी आयोजित केली होती. त्याला कसे सोडून दिले जाऊ शकते ? पार्टीचा आयोजकची पार्श्वभूमीच ड्रग्ज रॅकेटची असताना त्या अँगलने तपास का केला नाही? असा सवाल करतानाच पार्टीतील १३०० लोकांचा तपास का झाला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.मी काही लोकांची पोलखोल केली आहे. त्यामुळे माझे वडील भंगारवाला होते म्हणून मला डिवचले जात आहे. होय, माझे वडील भंगारवाला होते. मी भंगारवाला आहे. पण मी कुठलीही बँक लुटली नाही. सोन्याची तस्करी केली नाही. कुणालाही फसवले नाही. माझ्या घरी कधीही सीबीआयची रेड पडली नाही, असा शब्दात मलिक यांनी सुनावले.

मुंबई - भारतातील अनेक राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य एक सुजलाम सुफलाम राज्य म्हणून ओळखले जाते. त्या राज्यातील मुंबई पोलीस म्हटले आपोआप मान अभिमानाने उंचावली जाते.पोलिसांबद्दल समाजात अनेक गैरसमजही आहेत तितकाच अभिमानही आहे. पोलिस अधिकारी किंवा पोलिसात आहे म्हटले किंवा पोलिसांबद्दल लोकांचा कल बघण्याचा दृष्टिकोन भितीदायक किंवा नकारात्मक असतो. परंतु असे नसते. आपले कुटुंब सोडून अहोरात्र आपल्या कर्तव्यावर कर्तव्य बजावत आपल्या जनतेची प्रामाणिक सेवा करणारे हेच ते पोलिस असतात. महाराष्ट्र राज्य मधले संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. परिणामी या राज्यात नव्हे तर देशातही बाराही महिने सार्वत्रीक कार्यक्रम हिंदू-मुस्लिम-सिख-ईसाई आदी सर्व धर्मीयांचे सण-उत्सव ईद , गणपती ,नवरात्री,दिवाळी ख्रिसमस ,आदी सर्व कार्यक्रम सुरू असतात. गुन्हेगारी क्षेत्रावर नजर ठेवणे , चोऱ्या दरोडे यावर करडी नजर ठेवत तसेच महिलांच्या सुरक्षा बाबतचे अनेक विषयांवर नजर ठेवने त्याच बरोबर लोकसभा, विधानसभा ग्रामपंचायती व अन्य निवडणुका सह ,मोर्चे ,आंदोलने या सर्वांवर लक्ष ठेवण्याचे काम ते कार्यक्रम सुरक्षित पार पडण्याचे सर्व श्रेय आपल्या दक्ष पोलिसांना जाते. अशा धावपळीमध्ये देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांना स्वतःला घरात कामासाठी वेळ देता येत नसल्यामुळे कुटुंबाची व स्वतःच्या देखभालीसाठी काही महिला घरगुती कामासाठी ठेवण्याची वेळ येते. परंतु घरगुती किंवा ऑफिसातील कामाच्या कर्मचाऱ्यांना आजही काही मालक बरोबरीचा दर्जा देत नाही. आपण मालक आहोत या अविर्भावात वावरत असतात आणि नोकर हा कमी समजून त्याच्याशी दुजाभाव केला जातो. परंतु बांद्रा येथे कर्तव्यावर असलेल्या जमिना बागवान या पोलीस इन्स्पेक्टरने आपल्या घरातील कामासाठी ठेवलेल्या महिलेबरोबर आपला पोलीस गणवेश यामध्ये स्वतःचा सेल्फी काढून आपल्या मोबाईलवर डीपी ठेवला आहे. यातून त्यांचे विशाल हृदय माणसातली माणुसकी व घरातील काम करणारी व्यक्ती ही आपल्या स्वतःच्या घरातला  सदस्य आहे असा मान दिला. यातून मोठा एकोप्याचा व मालक कामगाराची दरी तर दूर झालीच त्याच बरोबर त्यांच्या या कृतीमुळे समाजापुढे वेगळा आदर्श नक्कीच निर्माण होईल.तसेच पोलिसांनी प्रति नागरिकांचे प्रेम नक्कीच वाढेल यात संशय नाही.


पुणे -  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याची घटना ताजी असतानाच अजितदादांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच धाड टाकली. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते अजित पवार यांचे मावस भाऊ आहेत. कदम हे सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली.विशेष म्हणजे कदम हे मुंबईत आहेत. घरी ईडीने धाड मारल्याचे कळताच कदम हे मुंबईहून पुण्याकडे जायला निघाले. दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते. तर कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. त्यानंतरही ईडीकडून धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२१ रोजी आयकर विभागाने दौंड साखर कारखान्यावर धाड मारली होती. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. आयकर विभागाच्या धाडीनंतरही दौंड कारखान्याचे संचालक कदम यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, दौंड साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्यात कोणतीही अनियमितता नसल्याचा खुलासा केला होता.


मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. २५ कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने ऑर्डर काढून ४ अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली आहे. एकीकडे नवाब मलिकांच्या आरोपांनी घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकारने लावलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात त्याने धक्कादायक आरोप केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रिलीज करण्यासाठी २५ कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते. तसे फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला. याच गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे. प्रभाकर साईल, ऍड सुधा द्विवेदी, ऍड कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी ४ पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून जाहीर केली गेली आहे. गेले अनेक दिवस नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी करणार?

१) मिलिंद खेतले सहायक पोलिस आयुक्त

२) अजय सावंत पोलिस निरीक्षक

३) श्रीकांत पारकर सहायक पोलिस निरीक्षक

४) प्रकाश गवळी पोलिस उप निरीक्षकउल्हासनगर - उल्हासनगर शहरात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर टीम कलानीच्या २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला. पंचम कलानी या तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी पंचम कलानी यांनी उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. टीम ओमी कलानीच्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उल्हासनगर महापालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. कलानी परिवाराच्या प्रवेशामुळे शहरात पक्षाला बळ मिळेल, असेही आव्हाड म्हणाले. कलानी गटाचे २२ आणि इतर १० अशा ३२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी मोठा हादरा मानला जात आहे. मागील निवडणुकीत हे २२ नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.पप्पू कलानी जेलच्या बाहेर आल्यानंतर उल्हासनगरातील राजकीय समीकरण  बदलताना दिसत आहे. चारच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरात जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. रात्री साडेतीन वाजेपर्यंत नेत्यांची चर्चा चालली होती.माजी आमदार पप्पू कलानी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. उल्हासनगरात निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप होताना दिसत आहे. दरम्यान, उल्हासनगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपच्या (टीम ओमी कलानीच्या) सात नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान केले होते. त्यामुळे भाजपला सर्व समित्या गमवाव्या लागल्या होत्या. टीम ओमी कलानीच्या ९ नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान करत शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना महापौर म्हणून निवडून आणले. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. हे नगरसेवक टीम ओमी कलानीचे असले, तरी ते भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले असल्याने तांत्रिकदृष्ट्या ते भाजपचे होते. त्यामुळे त्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करत भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी याचिका दाखल केली होती.


मुंबई - एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, पंच प्रभाकर साईल याने केलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर आता खारघरमधील एका जुन्या प्रकरणातील अजून एक पंच समोर आला. शेखर कांबळे याने एनसीबीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. खारघरमधील ८०/२०२१ या नायजेरियन ड्रग्स पेडलर प्रकरणात मला पंच करण्यात आले होते. त्यावेळी १० कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या. ती कारवाई बोगस होती, असा आरोप पंच शेखर कांबळे याने केला आहे.त्यावेळी मला पंचनामा वाचायला दिला नाही. जी कारवाई केली गेली ती बोगस होती. त्यात काही सापडले नव्हते. मात्र, ६० ग्राम एमडी सापडल्याचे दाखवण्यात आले होते. मी आणि माझा एक मित्र प्रचंड दहशतीत आहोत. काल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पेपरमध्ये या केसचा उल्लेख होता. ज्यात ६० ग्राम एमडी पकडल्याचे समजले, त्यामुळे मी घाबरलो आहे, असे शेखर कांबळे माध्यमाशी बोलताना म्हणाला.

मला काल अनिल माने यांचा रात्री फोन आला. पण मी तिथे गेलो नाही, मला आता भीती वाटते. कोर्टात केस जाईल तेव्हा न्यायाधीश जे विचारतील तेव्हा मी काय उत्तर देणार? कारण मी पंचनामा वाचलेला नाही. म्हणून मी आता समोर आलो आहे. समीर वानखेडे मला १९ तारखेपर्यंत फोन करायचे, खूप वेळा फोन करायचे. मी नायजेरीयन नागरिकांची माहिती द्यायचो. पण त्यांनी मला अंधारात ठेवले. मी पुढील सगळ्या चौकशीसाठी तयार आहे, असेही शेखर कांबळे याने सांगितले. समीर वानखेडे आणि शबाना यांचा निकाह लावणाऱ्या मौलानांनी खळबळजनक दावा केला आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही मुस्लिम असल्याचे सांगितल्यानेच आम्ही निकाह लावला, असे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी एका माध्यमाशी बोलताना म्हणाले.  .


निकाहावेळी समीर यांनी दाऊद असेच नाव घेतले होते. आम्ही मुलाला त्याचे पूर्ण नाव सांगायला सांगतो, तसेच तुमचा निकाह शबाना यांच्यासोबत एवढ्या महरवर करत आहोत, तुम्हाला हे मान्य आहे? तेव्हा मुलगा म्हणते मान्य आहे. त्यानंतर स्वाक्षरी केली जाते. महरच्या समोरही स्वाक्षरी केली जाते. निकाह लावणारा काझीही त्यावर स्वाक्षरी करतो. तिथे उपस्थित असलेले साक्षीदारही आपली स्वाक्षरी करतात, असे मौलाना म्हणाले.


मुंबई - एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. मलिक हे ड्रग्ज लॉबीचे प्रवक्ते असून त्यांच्या जावयाला अटक केल्यानेच ते थयथयाट करत असल्याचा दावा यास्मिन वानखेडे यांनी केला आहे.

यास्मिन वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. नवाब मलिक हे ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच आरोप करत आहेत. मलिक यांच्यामागे ड्रग्ज लॉबी असणार. त्यांना पैसे देऊन आरोप करायला लावत असतील. ड्रग्ज लॉबींनी त्यांना प्रवक्ते म्हणून नेमले असावे. त्यांच्या जवायाला अटक केली होती. त्यामुळेच ते आरोप करत असावेत, असा दावा यास्मिन वानखेडे यांनी केला आहे.

मलिक आदरणीय मंत्री आहेत. पण त्यांना हे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. मीडियाला बोलवून केवळ प्रसिद्धी घेऊ नका. तुमचा वेळही वाया घालवू नका, असे त्यांनी सांगितले. समीर वानखेडे यांचे बर्थ सर्टिफिकेट नेटवर मिळत नसल्याचे मलिक यांनी सांगितले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनाच बर्थ सर्टिफिकेट मिळत नाही. ते बर्थ सर्टिफिकेट का शोधत आहेत? त्यांची रिसर्च टीम आहे ना? मुंबईतील पोस्ट केलेला फोटो दुबईतील दाखवतात. मग त्यांनी शोधावे सर्टिफिकेट, असे सांगतानाच आमचे बर्थ सर्टिफिकेट शोधण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही कोण आहात? एखाद्या नोकरशहाचे सर्टिफिकेट काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचे सर्टिफिकेट कुणी काढले आहे का? असा सवालही त्यांनी केला.


 


  

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत

मुंबई - आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला असून, यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली असल्याचे सांगितले आहे. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने या कथित व्हिडीओत केला. या व्हिडीओत प्रभाकर साईल म्हणत आहे, ‘आम्ही लोवर परेलच्या दिशेने गेलो. तिथे ब्रिजखाली आमची गाडी जाऊन उभी राहिली. पाठिमागून इनोव्हा कार आली. अचानक त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडिज आली. मी जाऊन बघितले तर त्या गाडीत शाहरुख खानची मॅनेजर बसलेली होती. यानंतर के. पी. गोसावी, सॅम आणि पूजा दादलानी या तिघांमध्ये बैठक झाली. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे १५ मिनिटे निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिले असल्याचा दावाही प्रभाकरने केला आहे. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचे मी फोनवरील संभाषण ऐकले होते. २५ सांग, शेवटी १८ फायनल कर, कारण त्यातील ८ समीर वानखेडेंना जाणार आहेत. तसेच १० आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. मी एवढे त्यांचे फोनवरचे संभाषण ऐकले’,अशी माहिती प्रभाकर साईलने दिली. गोसावीने आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितले. एनसीबीने त्याला १० साध्या कागदांवर सही करून घेतल्याचेही त्याने म्हटले आहे. आपण गोसावी यांना ५० लाख रोख रक्कम भरलेल्या २ पिशव्या दिल्या. तसेच १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता गोसावीने फोन केला आणि २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितले, असेही प्रभाकर साईल याने सांगितले आहे. गोसावीने आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असे प्रभाकरने म्हटले आहे. क्रुझवरील धाडसत्राच्या रात्री आपण गोसावी सोबतच होतो. गोसावी आणि सॅम यांना एनसीबीच्या कार्यालयाबाहेर एकत्र पाहिल्याचा दावाही त्यांनी केला. गोसावी नाट्यमयरित्या गायब झाला आहे. त्याच्या जीवाला समीर वानखेडेकडून धोका असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.समोर आलेल्या या व्हिडीओबाबत चर्चांना उधाण आले आहे. या कथित व्हिडीओची खातरजमा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळेच याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 


मुंबई - गोराई भागातील हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्यव्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी पाच जणींची सुटका केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून १३ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम व पाच मोबाईल, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गोराई भागातील दोन हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायासावर छापा टाकण्यात आला. याठिकाणी दोन अल्पवयीन मुली तर तीन सज्ञान मुली आढळल्या. त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या ३२ वर्षीय महिला दलालासह हॉटेलचा केअर टेकर व व्यवस्थापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पाच मुलींची या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली.या प्रकरणी भा.दं.वि.चे कलम ३७० (३), ३४ भा.दं.वि.चे सह कलम ४ व ५, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ सह कलम १२,१६,१७,१८, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा,२०१२ (पोक्सो), बालन्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनयम २०१५ चे कलम ७५, ८१ व ८७ अन्वये गोराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त एस. विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भरत घोणे, सहायक पोलीस निरीक्षक पुनम यादव, अंमलदार चंद्रसेन गायकवाड, गिरीष सुर्वे, अजय कदम, विक्रांत खांडेकर, सोनाली लाडे व चालक उपेंद्र मोरे या पथकाने पार पाडली.


इंदौर - देशात आता कोरोना प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्याही नियंत्रणात असतानाच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत इंदौरमध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटची प्रकरणे समोर येत होती. मात्र आता जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात 'ए वाय ४'चे नवीन व्हेरिएंट आढळून आले आहे. हा डेल्टाचाच एक नवीन व्हेरिएंट असल्याचे बोलले जात आहे.इंदौरसह मध्य प्रदेशातून नवी दिल्लीतल्या NCDC लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या नमुन्याच्या चाचणी अहवालात नव्या व्हेरिएंटची ७ प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 'ए वाय ४' व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. इंदौरमध्ये सध्या दररोज एक किंवा दोन कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते.१६ ऑक्टोबरच्या अहवालात ७ नमुन्यांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यापैकी दोन जण न्यू पलासिया, एक दुबेची बाग आणि तीन महू येथील आहेत. यावर बोलताना एमजीएम ऑफ मेडिसिन, एमजीएम डॉ.व्ही.पी. पांडे म्हणाले की, कोरोना व्हायरसचे स्वरूप बदलत असते. या प्रकाराच्या संसर्गाविषयी काहीही बोलणे योग्य नाही, कारण स्पष्ट अभ्यास झालेला नाही. दरम्यान भारतात दिली जाणारी लस सर्व प्रकारांवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. पुढील ४/५ वर्षे, आपल्याला दरवर्षी लस घ्यावी लागणार आहे.

 श्याम लालवानी यांच्या संघटनेच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या मोफत लसी


मुंबई - कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणाऱ्यांना कोरोना योद्धा नाव दिले आहे..कोरोना व्हायरस ने धावत्या भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला जरी थांबवले असले तरी कोरोना योद्धा या संकटाची संघर्ष करत होते आणि आजही ते या संकटाचा सामना करत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ देशाचा आणि माणसांचा विचार त्यांनी केला. खरेतर कोरोना विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी समाजातील अनेक घटक एकत्र येऊन कार्य करीत आहे. त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक डॉक्टर हा विशेष कोरोना योद्धा आहे. डॉक्टरांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी स्वतःची व कुटुंबाची पर्वा केली नाही. ते दिवस रात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहेत कोरोना रुग्ण सापडलेला परिसर स्वच्छ निर्जंतुक करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांची होती ती जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे निभावली. या सर्व कोरोना योध्यांचे कार्य सदैव स्मरणात ठेवण्याची गरज आहे कारण आपण त्यांच्यामुळेच उद्या मोकळा श्वास घेणार आहोत. या कोरोनाच्या संकटात कोरोना योद्ध्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड आपण करू शकणार नाहीत.डिसेंबर २०१९ मध्ये प्रथम सापडलेला कोरोना या अति सूक्ष्म विषाणूने अल्प काळात जगभर थैमान घातले. घड्याळाच्या काट्यावर धावणारे जग अक्षरशः जागेवर थांबले. अशा घातक भयंकर जीवघेणी संसर्गजन्य कोरोना महामारी विरुद्ध लढण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात कोरोना योद्धे सज्ज झाले.याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अंधेरी पश्चिम भागातील श्याम लालवाणी आणि त्यांचे संघटक यांनी सुमारे दोन हजार लोकांना करोना काळात विनामूल्य लस दिली आणि घरो घरी जाऊन लसीबद्धल ज्या अफवा होत्या त्यांचे निवारण केले. प्रमुखतः वयस्कर लोकांना या लसीबाबत शंका होत्या त्यामुळे लास घेण्यास वयोवृद्द लोक जाण्यास घाबरत होते अश्या लोकांना श्याम ललवाणी आणि त्याचे संघटक यांनी अंधेरी, पार्ले स्थित लोकांच्या घरो घरी जाऊन त्यांचा गैरसमज दूर करून त्यांना लस दिल्या आहेत. शिवाय अंधेरी पार्ला परिसरात त्यांनी सॅनिटाईझ करून परिसर स्वछ करून करोना महामारीला दूर करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली यावर तर प्रत्येक नागरिकाची घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. कोरोना लढाईतील पोलीस,डॉक्टर,आरोग्य अधिकारी,महापालिका अधिकारी,सफाई कर्मचारी आणि काही संघटना विशेष करून श्याम लालवाणी यांच्यासारख्या योध्यांचा सन्मान केलाच पाहिजे अशा या योध्यांमुळेच आपण करोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखू शकलो. या योध्यांना नागरिक वार्ताचा सलाम.

अमरावती - कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने छिदवाडी येथील सेजल जाधव या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. लेकीच्या अशा अचानक निघून जाण्याने उध्वस्त झालेल्या जाधव कुटुंबाला महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आधार दिला. श्रीमती ठाकूर यांनी सेजलच्या भाऊ-बहिणीला शिक्षणासाठी दत्तक घेतले असून, जाधव कुटुंबाला तातडीची आर्थिक मदतही केली आहे.तिवसा तालुक्यातील छिदवाडी येथील सेजल जाधव या १७ वर्षीय विद्यार्थिनीने कुटुंबावरील कर्ज, नापिकी, हलाखीची परिस्थिती यामुळे तणावात येऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत कळताच मंत्री श्रीमती ठाकूर हेलावून गेल्या. त्यांनी तातडीने तत्काळ जाधव कुटुंबाची भेट घेतली. तसेच सेजलच्या भाऊ- बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. कुटुंबाला १० हजार रूपयांची तत्काळ आर्थिक मदतही दिली. सेजलच्या भावंडांच्या शिक्षणाच्या जबाबदारीसह तिच्या बहिणीच्या विवाहाची जबाबदारी मंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वीकारली आहे. एखाद्या विद्यार्थ्याने असा विचार करावा व स्वत:चे जीवन संपवावे. ही अत्यंत सुन्न करून टाकणारी ही घटना आहे. ही वेदना शब्दांत मांडता येत नाही. आत्महत्येसारखे घातक पाऊल कुणीही उचलू नये. आत्महत्या हा इलाज नाही. संकट आले तर हार मानू नका. एकदा का जीव गेला तर तो पुन्हा येणार नाही. विद्यार्थी व तरूणांनी डिप्रेशनमध्ये येऊ नये. हिंमत ठेवावी, असे कळकळीचे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले. जाधव कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहू. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाच्या वतीने मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. अशा घटना घडू नयेत म्हणून प्रभावी व सातत्यपूर्ण समुपदेशन यंत्रणा उभारण्यासाठीही प्रयत्न करू. या अनुषंगाने प्रशासनानेही आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नागपूर - देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. 'मी त्यावेळी म्हटले होते की काळा पैसा परत आला तर इंधनाचे दर कमी होतील. पण सरकारला आता अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आणि राष्ट्रहिताचे काम करावे लागत आहे, त्यामुळे कधी तरी स्वप्न पूर्ण होईल', असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. बाबा रामदेव नागपूरमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना बाबा रामदेव यांनी आपली भूमिका मांडली.काळा पैसा परत आल्यावर पेट्रोलचे दर ३० रुपये होईल असे तुम्ही म्हणाला होता, पण आता दर वाढत आहे त्यामुळे देशात काळापैसा वाढलाय का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता बाबा रामदेव म्हणाले की, मी ज्यावेळी काळापैशांविरोधात देशभरात आंदोलन केले होते. त्यावेळी मी काही पर्याय ठेवले होते. कर चुकवणारे असतील किंवा काळापैसा साठवला असेल तर त्यावेळी मी म्हणालो होतो की, जो क्रुड इंधनाचा दर आहे, त्यानुसार जर इंधन विकले आणि कर कमी केला तर ३० रुपयांमध्ये पेट्रोल विकणे शक्य होते. पण आता सरकारपुढे अनेक आर्थिक संकट आहे, देशहिताचे कार्य सुरू ठेवायचे आहे. सामाजिक कार्य सुरू ठेवायचे आहे. सरकार सुद्धा चालवायचे आहे, त्यामुळे कधी ना कधी तरी स्वप्न हे पूर्ण होईल.तसेच, बॉलिवूडमध्ये ज्या प्रकारे नशेबाजीचे विनाशकारी तंत्र सुरू आहे. ते भारताच्या तरुण पिढीसाठी घातक आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना आपण रोल मॉडेल मानतो. त्यामुळे अनेक तरुण त्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे बॉलिवूडमधील लोकांनाच अंमली पदार्थाचा कचरा साफ करायला हवा नाही तर ते त्यांच्यासाठीच आत्मघाती ठरेल, असा सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला.


ठाणे - राज्यभरात ड्रग्ज विरोधात धाडसत्र सुरु असून, ठाणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री विशेष मोहिम राबवत अंमली पदार्थ विक्री, अंमली पदार्थ सेवन करणारे गर्दुल्ले आणि मद्यपींवर कडक कारवाई केली. चार तासांच्या विशेष मोहिमेत पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकांनी शहरातील बस स्टॉप, पडक्या इमारती, घरे, बंद वाहने, गर्दुल्ले बसण्याची ठिकाणे, निर्जन स्थळे, गुन्हेगारी वस्त्या, झोपडपट्ट्या, संवेदनशील ठिकाणे, अंमली पदार्थ विक्रीची ठिकाणे आणि सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या बाजूचा परिसर अशा ठिकाणी तपासणी केली. एकाचवेळी झालेल्या या कारवाईमध्ये अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात तब्बल ९३ गुन्हे दाखल झाले असून १४० जणांना अटक करण्यात आली आहे. ठाणे परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये अंमली पदार्थांचा विळखा वाढत असून त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचे समोर आले आहे. ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या ठिकाणी अंमली पदार्थांचे केंद्र निर्माण होऊ लागले आहे. यातून महिला अत्याचाराच्या घटना आणि गंभीर गुन्ह्यांची शक्यता निर्माण होत असल्याने पोलीसांकडून व्यापक मोहीम राबवण्याचे निश्चित करण्यात आले होते.पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्या आदेशानुसार सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, गुन्हे शाखेचे सर्व घटक प्रभारी अधिकारी यांच्या माध्यमातून ही विशेष मोहिम राबवण्यात आली. यामध्ये ११८ पोलीस अधिकारी, ३३१ पोलीस अमलदार व इतर कुमक वापरण्यात आली. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागात ही मोहीम राबवण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी विक्री करणारे, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून असे ९८ गुन्हे दाखल करून १४० आरोपींनी अटक करण्यात आले. दारूबंदी कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल झाले असून १८ आरोपींनी अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या माध्यमातून भिवंडी, उल्हासनगर, विठ्ठलवाडी येथे गुंगीच्या पदार्थांची नशा करणाऱ्यांवर कारवाई करत आरोपींनी अटक करण्यात आले.

जळगाव - जळगाव जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे. त्यात कुठलाही सत्तेचा दुरुपयोग झाला नाही. उमेदवारांचे अर्ज बदलण्याचे भाजपाने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, त्यांच्या अनुभवी उमेदवारांना देखील उमेदवारी अर्ज व्यवस्थित भरता आले नसल्याची टीका राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर व डॉ. सतीष पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या उमेदवारांना लढण्याची इच्छा नसल्यानेच जाणिवपूर्वक अर्ज चुकविल्याचा आरोपही डॉ. पाटील यांनी यावेळी लगावला. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेबाबत भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील, गुलाबराव देवकर, डॉ. सतीष पाटील, बँकेच्या चेअरमन अ‍ॅड. रोहिणी खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत कुठल्याही प्रकाराचा सत्तेचा दुरुपयोग झालेला नाही. संपूर्ण प्रकियेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण झाले आहे. तसेच भाजपाने केलेले अर्ज बदलविण्याचा आरोप केविलवाण आहे. भाजप खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ हे अनुभवी उमेदवार असून देखील त्यांचे अर्ज चूकलेच कसे? त्यांना अर्ज का भरता आले नाहीत? असे प्रश्न उपस्थित करीत त्यांनीच जाणिवपूर्वक अर्ज चुकविल्याचा आरोप यावेळी माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी केला. तसेच रोहिणी खडसे यांच्याविरोधात रक्षा खडसे यांचा अर्ज भरून भाजपने आमच्या घरांमध्ये भांडणे लावण्याचे काम केल्याचेही सतीष पाटील यांनी सांगितले. मागील पाच वर्षांत जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल होते. या काळात बँक व शेतकरी हीताचे काम झाले आहे. बँकेत आलेल्या तपासयंत्रणांनी देखील या कामाचे कौतुक केल्याची माहीती गुलाबराव देवकर यांनी यावेळी दिली.सर्वपक्षीय पॅनलसाठी आमचीही तयारी होती. मात्र, या दरम्यान भाजप नेत्यांनी राज्यातील आमच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्रास देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्यासोबत जिल्ह्यात एकत्र कसे यायचे? याचा विचार करून काँग्रेस व आमच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, हा भाजपाचा आरोप निरर्थक असल्याचेही गुलाबराव देवकर म्हणाले. जिल्हा बँक निवडणुक राष्ट्रवादी, शिवसेना व कॉग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटपाची निश्चिती करून तशी घोषणा करून प्रचारास सुरुवात करणार असल्याची माहितीही देवकर यांनी दिली.

नवी दिल्ली -  बांगलादेशात अलीकडेच दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदूंविरुद्ध उफाळलेला हिंसाचार आणि मंदिरांवरील सामूहिक हल्ले यातील दुसरा प्रमुख संशयित असलेल्या तिशीतील एका तरुणाला बांगलादेशातील सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी अटक केली.वायव्येकडील रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ह्यात १७ ऑक्टोबरला झालेल्या गोंधळाचा सूत्रधार असलेला शैकत मंडल आणि त्याचा साथीदार या दोघांना ढाक्याच्या सीमेवरील गाझीपूर येथून शनिवारी अटक करण्यात आली, असे रॅपिड अ‍ॅक्शन बटालियनच्या (आरएबी) अधिकाऱ्यांनी सांगितले.मंडलने केलेल्या फेसबुक लाइव्हमुळे लोक भडकले आणि त्यातून हिंसाचाराची लाट उसळली, असे आरएबीचा एक अधिकारी म्हणाला. १७ ऑक्टोबरच्या मंडलच्या फेसबुक पोस्टमुळे पीरगंज येथे करण्यात आलेल्या हल्ल्यांत हिंदूंची किमाने ७० घरे व दुकाने पेटवून देण्यात आली होती.कुमिला येथे दुर्गापूजा मंडपात कुराणाची प्रत ठेवणारा प्रमुख संशयित इक्बाल हुसेन याला पोलिसांनी शुक्रवारी कॉक्स बाझार येथून अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंडल याला अटक झाली आहे. हुसेन याला सध्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदूंविरुद्ध हिंसाचार भडकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आतापर्यंत निरनिराळ्या भागांतून सुमारे ६०० लोकांना अटक केली आहे.

श्रीनगर - काश्मीरचा विशेष दर्जा २०१९ मध्ये रद्द करण्यात आल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी प्रथमच काश्मीर दौऱ्यावर आले. त्यांनी सांगितले की, अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या काळात काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद आणि दगडफेक यांसारख्या घटना कमी झाल्या आहेत.जम्मू-काश्मीर यूथ क्लबच्या सदस्यांना संबोधित करताना त्यांनी हा दावा केला. जे कोणी शांतताभंगाचा किंवा विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोरपणे कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  शहा म्हणाले की, दहशतवाद कमी झाला आहे, दगडफेकीचे प्रकारही दिसत नाहीत. मला तुम्हाला ग्वाही द्यायची आहे की, जे कोणी शांतताभंग करू  पाहतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणीही येथील विकासात अडथळा आणू शकत नाही. ही आमची बांधिलकी आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यास मंजुरी दिली, तो दिवस सोनेरी अक्षरांत लिहिला जाईल. त्यातून दहशतवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला. जम्मू-काश्मीरच्या युवकांनी या प्रदेशाच्या विकासात आपले योगदान देणे सुरू ठेवले पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे असेही शहा म्हणाले. शहा जम्मू-काश्मीरचा तीन दिवसीय दौऱ्यावर होते, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. पोलीस अधिकारी परवेझ अहमद यांची दहशतवाद्यांनी २२ जून रोजी हत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची शहा यांनी भेट घेतली. तसेच अहमद यांच्या पत्नीला सरकारी नोकरीत नियुक्तीबाबतची कागदपत्रे सुपूर्र्द केली. नवगाव येथे भेट दिल्यानंतर सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. दहशतवाद्यांकडून परराज्यातील नागरिकांच्या होणाऱ्या हत्यांच्या पाश्र्वाभूमीवर दहशतवाद्यांशी लढण्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. स्थानिक अधिकाऱ्यांनी बैठकीत शहा यांना सुरक्षा दलांनी आखलेल्या मोहिमेबाबत तपशील दिला.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या काश्मीर दौऱ्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणे किंवा वैद्यकीय महाविद्यालयांचे भूमिपूजन या वरवरच्या उपाययोजनांमुळे मूळ प्रश्न सुटणार नाही, असे मत पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. दिल्लीत जूनमध्ये जी सर्वपक्षीय बैठक झाली होती त्यामध्ये जी आश्वासने देण्यात आली त्याबाबत पावले टाकणे महत्त्वाचे आहे असे मुफ्ती यांनी स्पष्ट केले. जनतेला भेडसावणाऱ्या  मुद्द्यांचा विचार या दौऱ्यात व्हावा असे मेहबूबांनी समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे. अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर राज्यात गोंधळाची स्थिती आहे. शहा यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वाभूमीवर ७०० जणांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेकांना जम्मू-काश्मीरबाहेर नेण्यात आले, असा आरोप मेहबूबा यांनी केला. त्यामुळे तणावात भर पडेल असा त्यांनी इशारा दिला आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत प्रदूषणात कमालीची वाढ झाली. २०१८ पासून वायू प्रदूषणाविरोधात लढा देण्यासाठी एअर फिल्टरिंगसाठी तब्बल ७६ कोटी रुपये केंद्र सरकारने भारतभरात दिले. या निधीतला जास्त हिस्सा हा दिल्ली राज्यासाठी देण्यात आला होता. मात्र आजपर्यंत यातील किती रक्कम वापरली याबाबत दिल्ली सरकारने काहीही ठोस पुरावे दिलेले नाहीत. ऑक्टोबर २०२१ महिन्यातसुद्धा प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहे. दिल्लीमध्ये प्रदूषण सर्वात जास्त आहे आणि सरकार या संकटाविरोधात मार्ग काढण्यात अयशस्वी ठरत आहे. 

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते २०१८ मध्ये “वायू” या प्रकल्पाअंतर्गत बाह्य प्रदूषण नियंत्रण प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. मात्र अनेक तज्ज्ञांकडून या हवा शुद्धीकरण प्रकल्पाला नामंजुरी देण्यात आली आणि त्याला भव्य व्हॉक्यूम क्लीनर्सशी तुलना करण्यात आली.वायू प्रोजेक्ट हा निरी आणि आयआयटी मुंबईने तयार केला आहे आणि हे फिल्टर्स वायू प्रदूषणातील धोकादायक कार्बन मोनो ऑक्साईड पीएम २.५ आणि पीएम १० ला कार्बन डाय ऑक्साईडमध्ये रूपांतरीत करते, ज्याने ट्रॅफिक जंक्शनवरील प्रदूषण ४० ते ६० टक्क्यांनी कमी होईल. यासाठी ३६ कोटी दिले होते असे वृत्त आहे.यानंतर जानेवारी २०२० मध्ये पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी त्यांच्या फाऊंडेश द्वारे लाजपत नगर मार्केटमध्ये एक भव्य एअर प्युरिफायर लावले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये एक एअर प्युरिफायर लावले. हे प्युरिफाअर्स त्या भागात १००० स्क्वेअर मीटर परिसरात  १ लाख क्युबिक मीटर शुद्ध वायू देईल, असे त्यांनी सांगितले होते. यासारखे भव्य एअर प्युरिफायर्स दिल्लीच्या कॅनोट प्लेस आणि आनंद विहारमध्ये देखील बसवलेले आहेत. मात्र हे प्रक्लप वायू प्रदूषणाविरोधात किती प्रभावी आहेत, यासाठी संशोधक आणि तज्ज्ञांनी सवाल उपस्थित केले. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात हरयाणामध्ये शेतीचा कचरा जाळण्यामुळे दिल्लीत प्रदूषण वाढते, असे म्हटले जाते. पण दिल्लीत प्रदूषणाचं मुख्य कारणे हे वाढत असलेल्या गाड्या, वीज निर्मितीसारखे जड उद्द्योग, वीट भट्ट्यांसारखे लघु उद्द्योग, सतत चालत असलेले बांधकाम उद्द्योग, उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा इत्यादी आहेत. ऑक्टोबर २०२१ महिन्यात सुद्धा पीएमची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहेत. भारतभरात दिल्लीमध्ये प्रदूषण सर्वात जास्त आहे आणि सरकार या संकटाविरोधात मार्ग काढण्यात अयशस्वी आहे.

अमृतसर- काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी, काँग्रेसच्या नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. अरूसा आलम यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कॅप्टन अमरिंदर सिंग हे कोणत्याही मंत्र्यांची नियुक्ती करत नव्हते. एवढेच काय स्टेशन पोलीस अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्तीही आलम यांच्या संमतीशिवाय होत नसल्याचा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी केला.नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या, की अरुसा आलम यांचा मुलगा हा पैशांनी भरलेली सुटकेस घेऊन दुबईला पळून गेला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांचे वय पाहाता पुजेकडे वळायला हवे. त्यांनी उर्वरित आयुष्य हे अरुसा आलम यांच्यासोबत घालवावे.  नवज्योत कौर म्हणाल्या, की अकाली दलाचे सर्व नेते हे आलम यांना भेटायला जाताना हिऱ्यांचा सेट घेऊन जात होते. पंजाबमधून सर्व पैसे घेऊन आलम ही दुबईला पळून गेली आहे. कॅप्टन यांनीही आलम यांच्यापाठोपाठ जावे व आयुष्य आनंदाने व्यतीत करावे, असेही त्यांनी म्हटले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्षाची स्थापना केली आहे. त्याबाबत विचारले असता नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या, की त्यांच्या पक्षाचा आमच्यावर कसलाही परिणाम होणार नाही. कॅप्टन यांच्या नेतृत्वात नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मतदारसंघावर भेदभाव झाला आहे. मात्र, नवज्योत सिंग हे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाचा विकास करणार आहेत. नवज्योत सिंग सिद्धू हे पूर्व अमृतसरमधून निवडणूक लढविणार आहोत.अरुसा आलम या संरक्षणविषयक पत्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला व कॅप्टन यांचे खास संबंध होते. पंजाबच्या राजकीय तसेच सांस्कृतिक वर्तुळातील सर्वांना हे माहीत होते. आरुसा आलम यांनी २००६ मध्ये जालंधरमध्ये पंजाब प्रेस क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भेट घेतली होती.आरुसा यांचे वडील अकलीम अख्तर हे पाकिस्तानी राजकारणातील सुप्रसिद्ध चेहरे आहेत. आरुसा यांना दोन मुलेही आहेत. कॅप्टनने आपल्या 'द पीपल ऑफ द महाराजा' या पुस्तकात अरुसाचा उल्लेख मित्र असा केला आहे.

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. आता त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. राज ठाकरेंच्या आईंचाही कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबई - मुंबईतील करी रोड रेल्वे स्टेशन जवळील ६० मजली वन अविघ्न पार्क इमारतीला लागलेल्या आगीतनंतर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. वन अविघ्न पार्कमध्ये लागलेल्या आगीमध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. अग्निसुरक्षा यंत्रणा बहुमजली इमारतींमध्ये कार्यरत आहे की नाही याचा शोध महापालिका घेणार आहे. करी रोड परिसरातील ‘वन अविघ्न पार्क’ इमारतीच्या १९ व्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या घटनेमुळे मुंबईतील बहुमजली इमारती पालिकेच्या रडारवर आल्या आहेत.मुंबईतील बहुमजली इमारतींच्या पुन्हा अग्निप्रतिबंधक यंत्रणेची कसून तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अग्निप्रतिबंधक यंत्रणेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना कायदा २००६’अन्वये बहुमजली इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही यंत्रणा न उभारणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार खटला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबईतील बहुमजली इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा आढावा घेऊन निष्काळजी सोसायटय़ांची यादी तयार करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अविघ्न इमारतीच्या १९ व्या आणि २० व्या मजल्यावर लागलेल्या आगीला दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी काहीच मिनिटांमध्ये महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. आग विझवण्यावर आणि रहिवाशांच्या सुटकेवर जास्तीत जास्त भर दिला. याप्रकरणी जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करणार असून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच, कुणालाही अभय नाही. आगीची संपूर्ण चौकशी केली जाईल, चौकशीनंतर दोषींवर कारवाई करु, असे आश्वासन मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले.

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची वसुली प्रकरणाचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला या प्रकरणामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला तर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना देखील पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता राज्य सरकारकडून न्या.कैलाश चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगासमोर परमवीर सिंग यांनी वकीला द्वारे शपथपत्र सादर केले आहे.मी माझी तक्रार मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेली आहे. आता त्या संदर्भात मला कुठलेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत वा उलटतपासणीही करायची नाही असे शपथपत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी न्या.कैलाश चांदीवाल आयोगासमोर मुखत्यारमार्फत पॉवर ऑफ ॲटर्नी दिले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले होते असा आरोप करणारे पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २० मार्च २०२१ रोजी दिले होते. त्या पत्राची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चांदीवाल आयोग स्थापन केला. या आयोगासमोर सिंग यांनी पॉवर ऑफ ॲटर्नी दिलेले महेश पांचाल यांनी शुक्रवारी शपथपत्र सादर केले. परमबीर यांच्या वतीने या शपथपत्रात अशी भूमिका मांडण्यात आली आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिलेली होती तसेच सर्वोच्च न्यायालयासही त्याबाबत अवगत केलेले आहे. तब्येतीच्या कारणामुळे स्वत: आयोगासमोर हजर राहू शकत नाही असेही स्पष्ट करण्यात आले. आता त्या पत्रासंदर्भात त्यांना कोणतेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत तपासणी वा उलटतपासणीही करायची नाही. चांदीवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंग यांना हजर राहण्यासंदर्भात दोन वेळा जामीनपात्र वॉरन्ट काढला होता.परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार तर दिली पण ते स्वत: आयोगासमोर साक्षीसाठी तर येतच नाहीत शिवाय आता त्यांना साक्षी-पुरावे द्यायचेच नसल्याची भूमिका घेत आहेत याकडे देशमुख यांच्या वकिलांनी न्या.कैलाश चांदीवाल यांचे लक्ष वेधले. त्यावर आपलेही अशील अनिल देशमुख आजवर आयोगासमोर आलेले नाहीत याचे भान ठेवून बोला अशी समज न्या.चांदीवाल यांनी देशमुख यांच्या वकिलास दिली.


मुंबई - दिग्दर्शक आदित्य चोप्राने १९९५ साली ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ रिलीज केला होता. आता २६ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. पण यावेळी ही कथा एका संगीत नाटकाच्या स्वरूपात सादर केली जाईल म्हणजेच म्युझिकल ब्रॉडवे.चित्रपट निर्मात्याने याबद्दल बोलताना सांगितले की, मी ब्रॉडवे म्युझिकलबद्दल खूप चिंताग्रस्त आहे, पण तितकाच उत्साही देखील आहे.’ ते म्हणाले की, ‘मला वाटते की मी आजही २३ वर्षांचा आहे (जेव्हा मी डीडीएलजे दिग्दर्शित केला होता).’आदित्य चोप्रा म्हणाले की, ‘मी सिनेसृष्टीचा माणूस आहे, मी कधीही थिएटर केले नाही आणि मी माझ्या आयुष्यातील सर्वात विलक्षण महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. यशराज फिल्म्स दिग्दर्शित DDLJ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील शाहरुख आणि काजोलच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या ब्रॉडवे शोचे नाव आहे ‘कम फॉल इन लव: द डीडीएलजे म्युझिकल’ जो यशराज फिल्म्स निर्मित करत आहे.’

ब्रॉडवेवर संगीतकार विशाल आणि शेखर हे संगीतकार म्हणून काम करतील. या शोसाठी दिग्दर्शकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या टीमची निवड केली आहे. शोची कोरिओग्राफी टोनी, एमी विजेता रॉब अॅशफोर्ज असोसिएट कोरिओग्राफर श्रुती मर्चंट प्रॉडक्शन करणार आहे.‘कम फॉल इन लव्ह विथ द डीडीएलजे म्युझिकल’ 2022-2023 दरम्यान ब्रॉडवेवर प्रीमियर होईल, सप्टेंबर २०२२ मध्ये सॅन दिएगोच्या ओल्ड गोल्ड थिएटरमध्ये त्याचा वर्ल्ड प्रीमियर होईल.म्युझिकल ब्रॉडवे हा हिंदी सिनेमासारखा असून, वर्षानुवर्षे विभक्त झालेले दोन प्रेमी आहेत, असे निर्माता आदित्य चोप्रा यांचे मत आहे. जो त्याच्या ब्रॉडवे शो ‘कम फॉल इन: लव्ह द डीडीएलजे’ मध्ये पहिल्यांदा भेटणार आहेत. फार कमी लोकांना माहीत आहे की, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा पहिला इंग्रजीत बनवण्यात येणार होता, ज्यात टॉम क्रूझला नायक म्हणून घ्यायचे होते.

मुंबई - ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर त्यांच्या वक्तव्यांमुळे आरएसएस समर्थक ॲड. संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात कलम ४९९ (मानहानी),५०० (बदनामी अंतर्गत शिक्षा) फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जावेद अख्तरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.आरएसएसची प्रतिष्ठा खराब करणे, नुकसान हेतूने, हेतुपुरस्सर बदनामीकारक काल्पनिक विधाने केल्या प्रकरणी जावेद अख्तरांवर फौजदारी तक्रार दाखल केली आहे.जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल बस्तुस्थिती लक्षात येईल, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले होते.जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. तसेच, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील. जावेद अख्तर, ज्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता ताब्यात घेण्यास नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गावर टीका केली होती. ते म्हणाले की, राईट विंग जगात एक आहे. भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर अख्तर म्हणाले, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. भारतीय राज्यघटना त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामध्ये येत आहे, परंतु जर संधी दिली तर ते ही सीमा ओलांडतील.
nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget