सिडकोकडून नवी मुंबईतील ४ भूखंड विक्रीकरीता उपलब्ध

नवी मुंबई - सिडको महामंडळाकडून नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या नोंदणीकृत संस्था महिला मंडळाकरिता नवी मुंबईतील ४ भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेतील एकूण ४ भूखंडांपैकी २ भूखंड हे नेरूळ नोडमध्ये तर उर्वरित २ भूखंड हे अनुक्रमे उलवे आणि १ भूखंड द्रोणागिरी नोडमध्ये उपलब्ध आहे. यामुळे महिला मंडळांकडून चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे प्रकल्पबाधित महिलांच्या सक्षमीकरणास मोठ्या प्रमाणावर हातभार लागणार आहे. सिडको महामंडळाकडून, नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरिता सातत्याने विकास प्रकल्पांबरोबरच सामाजिक उद्देशांकरिताही भूखंड भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात येतात. या योजने अंतर्गत सेक्टर-२३ (दारावे), नेरूळ, सेक्टर-६ (सारसोळे), नेरूळ, सेक्टर-२, उलवे आणि सेक्टर-५२, द्रोणागिरी नोडमधील प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४ भूखंड हे नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या नोंदणीकृत संस्थांना महिला मंडळांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर भूखंड हे ७२.३८ चौ.मी. ते १९९.६१ चौ.मी. दरम्यानच्या क्षेत्रफळाचे आहेत. या योजनेच्या योजना पुस्तिका १४ ऑक्टोबर पर्यंत, कार्यालयीन कामकाजांच्या वेळेत व दिवशी, व्यवस्थापक (पुनर्वसन) यांचे कार्यालय, सिडको लि., सीबीडी बेलापूर, रेल्वे स्थानक वाणिज्यिक संकुल, टॉवर क्र. ७, ७ वा मजला, नवी मुंबई या ठिकाणी विक्रीकरिता उपलब्ध असल्याचे डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी सांगितले.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget