लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरण ; केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सोमवारी देशभरात ‘मौन व्रत’

नवी दिल्ली - लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरुन हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आपल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुखांना सोमवारी तीन तास मौन पाळण्यास सांगितले आहे. हे मौन आंदोलन सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान राजभवन किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयाबाहेर पाळले जाणार आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी लखीमपूर खेरीला पोहोचताच शुक्रवारी रात्रीपासून ‘मौन’ ठेवले होते. आशिष मिश्रा शनिवारी पोलिसांकडे चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांनी मौन आंदोलन मागे घेतले.काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रदेश काँग्रेस समित्यांना पाठवलेल्या पत्रानुसार, ११ ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने राजभवन किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयासमोर सर्व राज्य मुख्यालयात सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत पर्यंत ‘मूक आंदोलन’ केले जाईल. काँग्रेस आता लखीमपूर खेरी हिंसाचारावर देशव्यापी आंदोलन आयोजित करणार आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात मारले गेलेले पत्रकार रमण कश्यप यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी मौन व्रत सुरु केले होते आहेत. जिल्ह्यातील निघासन येथील दिवंगत पत्रकाराच्या घरी भेट दिल्यानंतर सिद्धू म्हणाले की, जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे मूक आंदोलन सुरू राहील.त्याचवेळी हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज सिद्धू यांचे मूक आंदोलन काँग्रेस आणि देशासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले आले. शनिवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत निदर्शने केली. यादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा दिल्ली पोलिसांशी मोठा संघर्ष झाला. तर दुसऱ्या संयुक्त किसान मोर्चाने विविध राज्यांतील शेतकरी १२ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे चार शेतकरी आणि एका पत्रकाराच्या मृत्यूच्या घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी येणार आहेत असे म्हटले आहे. किसान संघाने १८ ऑक्टोबर रोजी रेल्वे रुळांवर आंदोलन करत २८ ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये महापंचायत आयोजित करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोटारी घुसवून केलेल्या हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष ऊर्फ मोनू याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget