गडकरी यांच्या विकास कामाचे शरद पवारांकडून कौतुक

नगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल विधान केलं आहे. राज्यात विरोधी पक्षात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी केलेल्या विकासांच्या कामाचे शरद पवार यांनी कौतुक केले आहे. इतकेच नाही तर सत्तेचा वापर विकासाच्या कामांसाठी कसा करावा हे नितीन गडकरी यांच्याकडून शिकले पाहिजे अशा शब्दांत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवार बोलत होते. नगर जिल्ह्यातील ४ हजार ७५ कोटी रुपये खर्चाच्या ५२७ किमी. लांबीच्या २५ महामार्गांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शनिवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

“मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो कारण मला नितीन गडकरी अहमदनगरमध्ये गेल्या अनेक काळापासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडवणाऱ्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार असल्याचे मला सांगण्यात आले. तसेच मी उपस्थित राहावे अशी त्यांची इच्छा होती,” असे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “अनेकदा भुमीपूजन झाल्यानंतर काहीच काम होत नाही. पण जेव्हा नितीन गडकरींच्या हातात प्रकल्प असतो तेव्हा काही दिवसांतच काम सुरु झाल्याचे पहायला मिळते”. लोकप्रतिनिधी देशाच्या विकासासाठी कशा पद्धतीने काम करु शकतो याचे नितीन गडकरी उत्तम उदाहरण आहेत असेही यावेळी ते म्हणाले. “मला आठवतं नितीन गडकरी यांच्या रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतूक मंत्रायलयाची जबाबदारी येण्याआधी जवळपास पाच हजार किमी रस्त्याचे काम झाले होते. पण त्यांनी मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आतापर्यंत १२ हजार किमी काम झाले आहे,” अशी माहिती शरद पवारांनी दिली.यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत असल्याचे सांगितले. “देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावे लागते. गाडीने प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातले पीक बघायला मिळते. म्हणून मी शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो”, असे ते म्हणाले.दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी इतर राज्यांमध्ये त्यांना येत असलेल्या अनुभवाविषयी सांगितले. “देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात ‘ही गडकरी साहेबांची कृपा आहे’. त्यामुळे लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवले आहे”, असं शरद पवार म्हणाले. देशात यापुढे नवीन साखर कारखान्यांना परवानगी नको तसेच लवकरच संपूर्णपणे ‘इथेनॉल’वर चालणाऱ्या वाहनांचे धोरण स्वीकारले जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. तर साखर कारखान्यांनी इथेनॉलपासून ‘हायड्रोजन गॅस’च्या निर्मितीत उतरावे असा सल्ला शरद पवार यांनी या वेळी दिला.


 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget