भाडेतत्त्वावर वाहने घेऊन विकली ; नवी मुंबई पोलिसांनी केले गजाआड

नवी मुंबई  - भाड्याने गाड्या घेतो, असे सांगून त्या गाड्यांची परस्पर विक्री करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. हा व्यक्ती गेल्या कित्येक दिवस पोलिसांना चकवा देत होता. त्याच्याकडून १ कोटी ३६ लाख ४५ हजारांची तब्बल ११ वाहने जप्त केली आहेत. संबंधित आरोपी स्वतःच्या गाड्या सांगून विक्री करीत होता. कोरोना काळात, ज्या लोकांनी हप्त्यावर गाड्या घेतल्या होत्या. अशा काही लोकांना शोधून, तुमची गाडी भाड्याने देतो तुम्हाला चांगले भाडे मिळेल, असे सांगत त्याच गाड्या स्वतःच्या सांगून परस्पर त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील एकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केले आहे. वैभव अंनता कोळी असे या आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या टोळीसह कित्येक गरजु लोकांना फसविले आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरुवातीला दोन-तीन महिने भाडे देऊन नंतर हा आरोपी गाशा गुंडाळत होता. गरजू लोकांना फसवून त्यांच्या गाड्या भाड्याने देतो, असे सांगत फसवून त्या गाड्यांची परस्पर विक्री करणारा आरोपी वैभव कोळी याच्या साऊद कलदने व आशिष मेनन या आणखी दोन साथीदारांचा नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget