कानपूरमध्ये ट्रिपल मर्डर ; दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

कानपूर - शहरातील फजलगंज भागात ट्रिपल मर्डर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका घरामध्ये तीन मृतदेह आढळून आले आहेत.  या तिन्ही मृतदेहांना दोरीच्या साह्याने एकत्र बांधून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी हा प्रकार चोरीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी हे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास करत आहेत, अशी माहिती डीसीपी संजीव त्यागी यांनी दिली आहे. फजलगंज येथे प्रेम किशोर यांचे किराणा दुकान आहे. त्यांची पत्नी गीता आणि मुलगा नैतिक यांच्यासह ते या परिसरात राहतात. या तिघांचीही हत्या करण्यात आली आहे आणि त्यांचे मृतदेह हे घरात एका दोरीच्या साह्याने बांधलेल्या अवस्थेत आढळले आहेत. अद्याप हे निष्पन्न झाले की त्यांची हत्या कशी झाली आहे. पोलीस तपास करत आहेत. तर फॉरेंसिक टीम देखील तपस करत आहे. पोलिसांनी हा प्रकार चोरीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शेजाऱ्यांशी या घटनेसंदर्भात पोलिसांनी  विचारपूस केली. घटनास्थळावर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून घटनेची पाहणी केली आहे. कानपूर शहरात २४ तासांत पाच हत्या झाला आहेत, यामुळे शहरात भीतीचे वातावरण असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुरूवारी सचेंडी परिसरात एका युवकाची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. तर शुक्रवारी बर्रा परिसरात सपा नेत्याची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. आणि पुन्हा ३ हत्या शहरात झाल्याने कानपूरकरांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांची धरपकड ही सुरूच आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हे फजलगंज पोलीस करत आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget