सिंघु सीमेवर हत्या ; आरोपी सरबजीत सिंहला सात दिवसांची पोलीस कोठडी

नवी दिल्ली - शुक्रवारी सकाळी सिंघु सीमेवर अत्यंत निर्घृणपणे एका व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी निहंग शीख सरबजीत याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी, न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी सकाळी हात पाय तोडलेल्या अवस्थेतील अवस्थेत एका व्यक्तीला रस्त्यावरच्या बॅरिकेडला बांधून ठेवल्याचे समोर आले होते. रक्तबंबाळ आणि अर्धनग्न अवस्थेत या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या व्यक्तीचे नाव लखबीर सिंह असल्याचे समोर आले होते. शीखांचा धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिबचा अपमान केल्याबद्दल त्याला शिक्षा देण्यात आल्याचे निहंग शीख म्हणत असल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून समोर आले होते. कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळाजवळच ही घटना घडली.हत्येतील मुख्य आरोपी निहंग शीख सरबजीत सिंह स्वत:हून शुक्रवारी सायंकाळी उशिरा लखबीरच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलिसांसमोर हजर झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. शनिवारी सोनीपत पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. यावेळी, न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget