रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल ; शिवसेनेत खळबळ

खेड - रामदास कदम हेच आघाडी सरकारमध्ये सूर्याजी पिसाळ असून शिवसेनेने बाजूला केल्याने स्वतःचे राजकीय अस्तित्व राखण्यासाठी ते महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला. भरणे येथे वैभव खेडेकर व संजय कदम यांनी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. पुरावा म्हणून रामदास कदम आणि शिवसैनिक प्रसाद कर्वे यांच्यातील पालकमंत्री अनिल परब यांच्या संदर्भातील संभाषण उघड केले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोली येथे परब यांच्या रिसॉर्टवर केलेल्या कारवाईचा संदर्भ देत रामदास कदम व प्रसाद कर्वे यांच्यामधील संभाषण हे धक्कादायक आहे.अनिल परब यांच्याविषयी असलेल्या ईर्षेमुळे व राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी रामदास कदम यांनी कर्वे यांच्यामार्फत माहिती पुरवली हे त्यांच्यात झालेले संभाषण ऐकल्यावर स्पष्ट होते. आपल्याच पक्षाच्या नेत्याविरोधात ते विरोधी पक्षाला माहिती पुरवतात. यातून रामदास कदम यांनाच शिवसेनेला धडा शिकवायचा आहे हेच स्पष्ट होत आहे, असे संजयक कदम म्हणाले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget