पार्थ पवार ड्रग्ज पार्टीत होते का? समीर वानखेडेची प्रतिक्रिया

मुंबई - मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. क्रुझवरील ड्रग्स पार्टीतून पकडलेल्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्या नातलगांचा समावेश होता. मात्र त्यांना सोडून देण्यात आले, असा आरोप मलिक यांनी केला. या पार्श्वभूमीवर एनसीबीकडूनही पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा पत्रकारांनी या ड्रग्स पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार होते का? असा सवाल विचारला. त्यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांकडून नावे  जाहीर करण्यास नकार देण्यात आला. पार्थ पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर एनसीबी अधिकारी म्हणाले की, जे नाव तुम्ही घेत आहात. सध्या तपास सुरु आहे आणि असे कुठलेही नाव घेणे योग्य होणार नाही. आम्ही एक जबाबदार एजन्सी आहोत आणि कुठलंही लूज कमेंट करत नाहीत. आम्ही पेपरवर जे आहे त्यावर बोलतो, जे पुरावे आहेत त्यावर बोलतो. बाकी नाही, असे एनसीबी अधिकारी समिर वानखेडे म्हणाले.

त्याचबरोबर सर्व ऑपरेशन हे वास्तविक वेगवेगळ्या आधारावर असते. त्यामुळे पुरावे गोळा करणं कठीण असते. एकूण नऊ साक्षीदार या प्रक्रियेत सहभागी झाले. त्यामध्ये मनिष भानुशाली आणि के पी गोसावी हे देखील होते. या सर्व साक्षीदारांना दोन तारखेच्या ऑपरेशन आधी एनसीबी ओळखत नव्हती. या ऑपरेशन दरम्यान ज्या लोकांना अटक करण्यात आले होते त्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूीमीवर त्यांना एनसीबी कार्यालयात आणले गेले, असेही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.आम्ही आमच्या माहिती आणि लोकांच्या माहितीच्या आधारावर काम करतो. आम्हाला अशाच प्रकारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही २ ऑक्टोबर रोजी क्रूझ वर कारवाई केली. आमच्या पद्धतीनुसार आम्हाला २ साक्षीदार नेमावे लागत असतात. यावेळी आम्हाला तात्काळ जायचे असते. यावेळी त्यांचा पूर्व इतिहास तपासणं शक्य नसतं. मनीष भानुशाली, गोसावी यांच्या बाबत एनसीबीला काही माहिती नव्हती. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. त्यात ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना आणण्यात आले. आम्ही १४ जणांना एनसीबी कार्यलयात आणले होते. कायद्यानुसार त्यांचे जबाब घेण्यात आले. त्यानंतर १४ पैकी ८ जणांना अटक केली आणि ६ जणांना सोडले. ज्या ८ जणांना अटक किलो त्यांना प्रथम एक दिवस त्या नंतर ४ दिवस आणि त्यानंतर १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. कोठडीत असताना आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आणखी ६ ठिकाणी आम्ही कारवाई केली आहे. हे एक मोठे नेटवर्क आहे. हे आपल्या तरुणांना बरबाद करत आहेत. आमची कारवाई सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी दिली.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget