एअर इंडियाचा नवा मालक बनला टाटा ग्रुप

नवी दिल्ली - अखेर एअर इंडियाचा लिलाव झाला आहे. टाटा ग्रुपने एअर इंडिया विकत घेतले आहे. त्यामुळे टाटा ग्रुप आता एअर इंडियाचा नवा मालक बनला आहे. लिलावात बोली लावून हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून एअर इंडियाचे खासगीकरण करून ती विकण्याचा विचार केंद्र सरकार करत होते. यापूर्वी केंद्र सरकारने एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा ग्रुप आणि स्पाइसजेट संस्थापकाच्या आर्थिक बोलींचे मूल्यांकन सुरू केले होते.

टाटा ग्रुपने ऑक्टोबर १९३२ मध्ये टाटा एअरलाईन्स नावाने एअर इंडियाची स्थापना केली. सरकारने१९५३ मध्ये विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले. टाटा आधीच सिंगापूर एअरलाइन्सच्या सहकार्याने विमानसेवेचा विस्तार करत आहेत. मात्र, सिंगापूर एअरलाइन्स खाजगीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास उत्सूक नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे. सरकार एअरलाईनमधील आपला १००% हिस्सा विकत आहे. यामध्ये एअर इंडियाचे १००% भाग असलेल्या एआय एक्सप्रेस लि. आणि एअर इंडिया SATS एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ५० टक्के भांडवल आहेत. दरम्यान, टाटा सन्सने राष्ट्रीय वाहक एअर इंडियासाठी बोली जिंकली असून टाटा सन्स सर्वाधिक बोली लावणारी कंपनी होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने या बोलीला मंजुरी दिल्याचे समजते आहे. मात्र, याची अधिकृत माहिती समोर आली नाही. टाटाने एअर लाईन्सच्या लिलावाची बोली जिंकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर लवकरच याची अधिकृत माहिती दिली जाईल, असे केंद्र सरकारमधील गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागातील सचिवांनी म्हटले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget