राज कुंद्राच नाही तर शिल्पा शेट्टीवरही लावले गंभीर आरोप; शर्लिन चोप्राने दाखल केला एफआयआर

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे गेल्या अनेक दिवसांपासून हेडलाईन्सचा एक भाग बनले आहेत. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. तो सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. राज कुंद्राची अटक आणि जामिनानंतर आता शर्लिन चोप्रा  हिने त्याच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. आता तिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

शर्लिनने राज आणि शिल्पावर फसवणूक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. शर्लिन चोप्राला राज कुंद्रा प्रकरणादरम्यान अनेक आरोपांना सामोरे जावे लागले होते. तिलाही चौकशीसाठी बोलावले गेले होते. ज्याबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितले आहे.शर्लिन चोप्रा हिने १४ ऑक्टोबर रोजी राज आणि शिल्पाविरोधात एफआयआर दाखल केला होता. तिने याबाबत मीडियाशी संवाद साधला आहे. ती म्हणाले की, मी राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक आणि धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. पत्रकार परिषदेत शर्लिन चोप्रा म्हणाली की, ‘त्यांनी मला अंडरवर्ल्डची धमकी दिली होती. तुम्ही हे नीट लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही माझा लैंगिक छळ केला आहे, तुम्ही मुलींना त्यांचे शरीर दाखवण्याचे पैसे का देत नाही? तुम्ही त्यांना फसवता. तो कलाकाराच्या घरी जातो आणि त्याला अंडरवर्ल्डची धमकी देतो. तो म्हणतोय लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घ्या, अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त होईल.’

शर्लिन चोप्रा हिने असेही सांगितले आहे की, १४ एप्रिल २०२१ रोजी तिने जुहू पोलीस स्टेशनला राज कुंद्राविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. १९ एप्रिल रोजी राजने जबरदस्तीने माझ्या घरात प्रवेश केला आणि मला केस मागे घेण्याची धमकी दिली. शर्लिन म्हणाली की, त्याने मला अंडरवर्ल्डची धमकी दिली आणि अनेक धमक्या दिल्या. मी एकटी भयभीत महिला आहे. मी एकटीच राहते, मला भीती वाटली. मात्र, आज मी धैर्याने परत आले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती-व्यावसायिक राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी सुमारे दोन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. आता तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे आणि त्याने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट देखील खाजगी केले आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget