आमची राजवट अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नका; तालिबानचा अमेरिकेला इशारा

नवी दिल्ली - अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आमची राजवट अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशारा तालिबानने दिला आहे. तालिबानने अफगाणिस्तवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच तालिबान आणि अमेरिकेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी अमेरिकेला इशारा दिल्याचा दावा शनिवारी त्यांनी केला. तालिबानने ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला. दरम्यान, तालिबानने जेव्हा पहिल्यांदा अफगाणिस्तान ताब्यात घेतले होते, तेव्हा अमेरिकेच्या पहिल्या लष्करी कारवाईनंतर तालिबानना सत्ता सोडावी लागली होती, त्यामुळे अमेरिका पुन्हा तसाच प्रयत्न करू शकते, अशी भीती तालिबानला आहे.कतारची राजधानी दोहामध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर मुत्ताकीने अफगाणिस्तानची वृत्तसंस्था बख्तरशी बोलताना म्हटले की, “अफगाणिस्तानमधील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचेही चांगले होणार नाही, असे आम्ही अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले.” तर, एएफपीने अनुवादित केलेल्या रेकॉर्ड केलेल्या निवेदनात मुत्ताकी म्हणाले, “अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध असणे हे सर्वांसाठी चांगले असेल. अफगाणिस्तानमधील सध्याचे सरकार कमकुवत करण्यासाठी कोणी काहीही करू नये, अन्यथा त्यामुळे लोकांसाठी अनेक समस्या निर्माण होतील,” अशा शब्दात अप्रत्यक्षपणे तालिबानने अमेरिकेला इशारा दिला आहे.परराष्ट्र खात्याच्या उपविशेष प्रतिनिधी टॉम वेस्ट आणि यूएसएआयडीच्या सर्वोच्च मानवतावादी अधिकारी सारा चार्ल्स यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन टीमसोबत दोन दिवसांच्या चर्चेच्या पहिल्या दिवशी मुत्ताकींनी हे विधान केले आहे. “दोन्ही देशांचे एकमेकांशी चांगले संबंध असतील, असे आश्वासन अमेरिकेकडून दिले जात आहे. अफगाणिस्तान अतिशय कठीण काळातून जात असताना संयम बाळगणे आवश्यक आहे. संयम बाळगल्यास अफगाणिस्तान अधिक सामर्थ्याने या स्थितीतून बाहेर येईल,” असे मुत्ताकी यांनी म्हटले आहे.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget