भाजपासहित सर्वांची यादी देतो म्हणणाऱ्या उदयनराजेंचे पुन्हा ईडीला आव्हान

सातारा - राज्यात सध्या ईडीच्या कारवायांवरुन राजकारण रंगले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडीकडून चौकशी केली जात आहे. भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांकडून केला जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. दरम्यान भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईडीला आव्हान दिले आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ईडीने यावे पण कारवाई करणार असाल तरच या अन्यथा येऊ नका. नाहीतर परत यांचा, त्यांचा फोन आला म्हणून सांगतील. तसे असेल तर येऊ नका, येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. नाहीतर उद्या उगाच राजकारण झाले, द्वेषापोटी अशी आरडाओरड होऊ नये, असे आव्हानच उदयनराजेंनी दिले आहे. यावेळी त्यांनी ईडीने कारवाई करताना ती माध्यमांसमोरच झाली पाहिजे असे म्हटले आहे.उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना भाजपालाही घरचा आहेर दिला होता. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे काढायचे अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली होती. ईडी आपल्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो असेही ते यावेळी म्हणाले होते. जसे आपण पेरतो तसे उगवतो. आमच्या मागे ईडी नाही ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन, असे उदयनराजे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना ईडीच्या कारवाईमागे भाजपाचे षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारण्यात आले असता, “कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकाचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढतात बस झाले आता राजकारण असे ते म्हणाले. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget