नागपूर महापालिका निवडणुकांचा प्लॅन ठरला,नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक

नागपूर -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या भेटीवेळी भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. नागपूर महापालिकेची निवडणुकही आता तोंडावर आहे. त्यात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत विचारमंथन झाले आणि रणनितीही आखण्यात आल्याची माहिती आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. राज्यातील प्रमुख पक्षांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सगळी तयारी सुरु केली आहे. भाजपनेही आता विविध शहरातील कारभारी-नेते मंडळींवर विशेष जबाबदारी सोपविण्याचे ठरवले आहे. त्याच्याच रणनितीचा एक भाग म्हणून प्रमुख पदाधिकाऱ्यांसह फडणवीस-गडकरींमध्ये बैठक पार पडली. परंतु या बैठकीत नागपूर महापालिका या विषय अजेंड्यावर होता.

राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आहे. विचारांनी भिन्न असलेले तिन्ही पक्षात सध्या सत्तेत आहे. नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका पार पडल्या आहेत, निकालही लागलेत. त्यात भाजपने चांगली कामगिरी केलेली असली तरी सर्वोत्तम कामगिरी करणे जमले नाही. त्यात नागपूर पंचायत समिती. जि.प. निकालात काँग्रेसने खूपच चांगली कामगिरी केली. साहजिकच भाजपसमोरची डोकेदुखी वाढली.जिल्हा परिषदेच्या ८५ आणि पंचायत समितीच्या १४४ गणांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या प्रमुख भाजप नेत्यांचा गड असूनही काँग्रेसने नागपूरमध्ये जोरदार मुसंडी मारली. नागपूरमध्ये मंत्री सुनील केदार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे.जि.प आणि पंचायत समितीमध्ये अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांचे आव्हान भाजपला होते. आता याच निकालातून धडा घेत भाजप त्या दृष्टीने डावपेच आखत आहे. कोणत्या महापालिकेत काय  परिस्थिती आहे?, भाजपला कुठे अनुकुल वातावरण आहे?, कुठे आणखी जोर लावाला लागू शकतो?, कोणत्या महापालिकेची जबाबदारी कोणत्या नेत्यावर सोपवायची?, अशा अनेक विषयांवर गडकरी-फडमवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget