श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून परप्रांतीय नागरिकांची हत्या

श्रीनगर - दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. दहशतवाद्यांनी शनिवारी श्रीनगरमधील ईदगाह भागात पाणीपुरीवाल्याची हत्या केली. अरविंद कुमार असे हत्या झालेल्या नागरिकाचे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेत उत्तर प्रदेशमधील सुताराची हत्या करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार अरविंद कुमार हे बिहारचे रहिवाशी होती. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर ईदगाह पार्कजवळ गोळीबार केला. जखमी नागरिकाला श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.दुसऱ्या घटनेत उत्तर प्रदेशच्या कारागिराचा मृत्यूअज्ञात हल्लेखोरांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे सुताराची हत्या केली आहे. हा सुतार उत्तर प्रदेशमधील रहिवाशी होता. तो पुलवामा जिल्ह्यातील लिट्टर भागामधील दुकानात काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजीर हे लिट्टरमधील मिलमध्ये सुतार म्हणून काम करत होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget