भवानीपूरमधून ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय

कोलकाता - पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दणदणीत विजय झाला आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता स्थापन झाली. अशावेळी ममता बॅनर्जी यांच्यासाठी आमदार शोभनदेव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा फरकाने पराभव केला आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजार ८३२ मतांनी पराभव केला. 

भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली, एकूण २१ राऊंड झाले. त्यानंतर ५८ हजार ८३२ मतांनी ममता बॅनर्जी यांनी विजय मिवळला आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून हॅटट्रिक मिळवली आहे. ममता बॅनजी यांनी यापूर्वी दोन निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून दोनवेळा विजयी झाल्या होत्या. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. अशावेळी ६ महिन्याच्या आत त्यांना निवडणूक लढवणे गरजेचे होते. त्यामुळे भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून शोभनदेव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर पार पडलेल्या पोटनिवडणुकीत अखेर ममता बॅनर्जी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget