मार्ड संपाच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी केले रक्तदान

मुंबई - करोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा शनिवारी दुसरा दिवस होता. राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनादरम्यान रक्तदानही केले. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील १०० डॉक्टरांनी रक्तदान करून सरकारला पुन्हा एकदा त्यांच्या मागण्यांचे स्मरण करून दिले. मार्डचे ५५०० निवासी डॉक्टर संपावर असले तरीही सरकारकडून अद्याप कोणतेही लेखी आश्वासन दिले नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. करोना, करोना वगळता इतर अतिदक्षता विभाग, अपघात विभागातील रुग्णसेवा खंडित न करता हे आंदोलन सुरू ठेवण्यात आल्याचे मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून सांगण्यात आले. शनिवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने पालिका रुग्णालयात शुकशुकाट होता. अत्यावश्यक सोडून नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे पालिका रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून या संपाला सुरुवात झाली होती. काही रुग्णालयांमध्ये शुक्रवारी ओपीडी सुविधाही बंद असल्यामुळे रुग्णांना पुन्हा घरी जावे लागले होते. सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये शांतता होती. रुग्णालयातील ओपीडीतील कामकाज हे निवासी डॉक्टरांमार्फतच चालते. त्यामुळे ओपीडीवर परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली होती.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी चर्चेसाठी संघटनेच्या प्रतिनिधींना संपर्क केला होता. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत कोणत्याही प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित न केल्याचे मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी सांगितले. या मागण्यासंदर्भात जोपर्यंत सकारात्मक चर्चा होत नाही, तोपर्यंत संप सुरू ठेवणार असल्याची भूमिका मार्डने स्पष्ट केली. मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या कामबंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, अस्मी आणि आयएमए महाराष्ट्रच्या डॉक्टरांनीही पाठिंबा दिला आहे.कामबंद आंदोलन सुरू असतानाही राज्यात डॉक्टरांनी विविध उपक्रम राबवण्यात आले. मुंबई, नागपूर, अंबेजोगाई, यवतमाळ, नांदेड या शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी रक्तदान केले. तर राज्यातील इतर शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी स्वच्छता अभियानाचे आयोजित केल्याचे मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी सांगितले. स्थायी स्वरूपाची पदे असूनही कायमस्वरूपी पदे भरण्यात आलेली नाही. त्यामुळे या पदावर कार्यरत असणाऱ्यांना सर्व वैद्यकीय रजा आणि मातृत्व रजा, भत्ते, कुटुंबास मिळणारी आकस्मिक वैद्यकीय मदत मिळत नाही. तसेच करोना महामारीच्या कालावधीमध्ये काम करूनही वैद्यकीय सेवेमध्ये नोकरीची हमी दिली जात नसल्याने ४ ऑक्टोबरपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget