डहाणू तालुक्यात पोटनिवडणुकीत पंचरंगी लढत

डहाणू - डहाणू तालुक्यात ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेच्या बोर्डी, कासा, सरावली, वणई या चार जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर पंचायत समितीच्या ओसरविरा, सरावली गणातील दोन जागांसाठी दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राजकीय ओबीसी आरक्षण रद्द केल्याने, पालघर जिल्ह्यात रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १५ जागा तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, बहुजन विकास आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे, अपक्ष असे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बोर्डी गटात तिरंगी, कासा सरावली गटात चौरंगी, तर वणई गटात सप्तरंगी सामना रंगणार आहे, तर पंचायत समितीच्या ओसरविरा, सरावली गणात पंचरंगी सामने होणार आहेत. यावेळी बहुसंख्य इतर मागासवर्गीय लोकसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या बोर्डी गटात, मागच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या, ज्योती प्रशांत पाटील यावेळी ही निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उन्नती सतेज राऊत आणि बहुजन विकास आघाडीच्या, निवेदिता श्याम बारी यांच्याबरोबर होणार आहे.कासा गटातून भाजपच्या कामिनी त्र्यंबक शिंदे, काँग्रेसच्या मनीषा यतीन नम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लतिका लहू बालशी, तर शिवसेनेच्या सुनीता किरण कामडी या उमेदवारांत लढत रंगणार आहे. सरावली गटातून माकपचे रडका रुपजी कलागडा, शिवसेनेचे कुणाल कान्हा माच्छी, काँग्रेसचे इमरान रोशनजमीर शेख, तर गत निवडणुकीत सरावली गटातून विजयी झालेले भाजपचे, सुनील दामोदर माच्छी यावेळी पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवीत आहेत.डहाणू पंचायत समितीच्या ओसरविरा गणातून काँग्रेसच्या संगीता अजय कोरडा, शिवसेनेच्या सुवर्णा बिपिन तल्हा, भाजपच्या सुवर्णा अशोक बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती विपुल राऊत, अपक्ष सुरेखा कैलास मलावकर असा पंचरंगी सामना होत आहे. सरावली गणातून काँग्रेसचे हरिश्चंद्र रमण काटेला भाजपचे अजय वाल्या गुजर, शिवसेनेच्या तेजल किरण बारी, माकपचे महेंद्र चैत्या मेऱ्या, अपक्ष हर्षद रामू माच्छी, असा पंचरंगी सामना रंगणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget