पुष्पक एक्स्प्रेसमध्ये लुटमार करून तरुणीवर लैंगिक अत्याचार

कल्याण - लखनौहुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. हि घटना इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान घडली असून सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये अचानक प्रवेश केला आणि १० ते २० प्रवाशांना धाक दाखवून रोकड, मोबाईल आणि दागिने लुटल्याचा प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे या दरोडेखोरांनी २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला असून २ दरोडेखोर ताब्यात घेतले आहे. तर ६ अद्यापही फरार झाल्याचे सांगण्यात आले. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी व अर्षद शेख असे  या  आरोपींचे नाव आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहण्यास आहे. नशेच्या आहारी जाऊन त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसाची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विविध पथक कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे. याप्रकरणी मध्य रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी घटना घडल्यानंतर आम्ही घटनास्थळ न पाहता कल्याण जीआर मध्ये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेची तब्येत स्थिर आहे. आठ पैकी सात आरोपी घोटीचे राहणार आहे. तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनतर प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरोडेखोरांचा हातात फाइटर आणि बेल्ट होता. धक्कादायक बाब म्हणजे एका २० वर्षीय प्रवाशी तरुणीसोबत दरोडेखोरांनी छेडछाड करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र या दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. दोन दरोडेखोर कल्याण ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे उर्वरित आरोपींच्या पोलिस शोध घेत आहेत. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget