अंदमान आणि निकोबार बेटांना देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवणार - अमित शाह

अंदमान - भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना इतिहासात पुरेसा आदर आणि सन्मान मिळाला नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसवर टीका केली. अंदमान आणि निकोबार बेटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर एका जनसभेला संबोधित करताना शाह म्हणाले, 'जेवढा सन्मान नेताजी आणि सरदार पटेल यांना इतिहासात मिळायला हवा होता, तेवढा त्यांना मिळाला नाही.'शाह म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनीच दोन्ही स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला आणि अंदमानमध्ये ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर प्रथमच ज्या ठिकाणी ध्वज फडकवला होता, त्या ठिकाणी ‘फ्लॅग पॉइंट’चे उद्घाटन केले. आम्ही स्वातंत्र्य संग्रामादरम्यान सरदार पटेल यांच्या योगदानाचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी केवडियामध्ये जगातील सर्वात उंच पुतळा उभारला. मजबूत भारत  बनवण्यामागील त्यांचे योगदान आम्ही कधीही विसरू शकत नाही. भविष्यात, अंदमान आणि निकोबार बेटांना देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवण्याची आमची योजना आहे. आम्ही नेताजींची जयंती परक्रम दिवस म्हणून साजरी करायला सुरुवात केली आहे आणि लवकरच आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये नेताजींचे भव्य स्मारक उभारू. मी या देशातील सर्व युवकांना विनंती करू इच्छितो की, एकदा आमच्या अंदमानला भेट देऊन आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या त्यागाला समजून घ्या, असे ते म्हणाले.दरम्यान, अंदमान आणि निकोबार बेटांवर २९९ कोटी रुपयांचे १४ विकास प्रकल्प आणि ६४३ कोटी रुपयांच्या १२ प्रकल्पांची पायाभरणी आधीच करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकार या बेटांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे, असेही गृहमंत्री शाह या कार्यक्रमात म्हणाले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget