मीच पूर्णवेळ अध्यक्ष ; सोनिया गांधीकडून पक्षातील असंतुष्ट नेत्यांची कानउघाडणी

नवी दिल्ली  - काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकारिणीची बैठक दिल्लीत झाली. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्षातील जी-२३ नेत्यांना, ‘पक्षाची पूर्णवेळ अध्यक्षा मीच आहे,’ असे सोनिया गांधी यांनी सुनावले आहे.काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी पक्षातील असंतुष्ट नेत्यांचा गट असलेल्या जी-२३ची कानउघाडणी केली. बैठकीच्या सुरुवातील उपस्थितांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी सांगितले की, काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याला पक्षाचे पुनरुज्जीवन हवे आहे पण या ऐक्यासाठी आणि पक्षाचे हित असणे आवश्यक आहे. मीच काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्षा आहे. मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे, माध्यमांच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही. दरम्यान,काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी पक्षामध्ये निर्णय कोण घेत आहे, हे समजत नसल्याचे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी हे वक्तव्य केले. सोनिया गांधी म्हणाल्या की, आम्ही कधीही लोकहिताच्या मुद्द्यांवर टिप्पणी करण्यास नकार दिलेला नाही. खुल्या वातावरणातील चर्चेला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. मात्र माध्यमाच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही. प्रामाणिक आणि निकोप वातावरणात चर्चा झाली पाहिजे. या बैठकीच्या बाहेर काय गेले पाहिजे, याचा निर्णय कार्यकारिणीने सामुदायिकपणे घ्यायला हवा, असा सल्लाही सोनिया गांधी यांनी दिला. या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीच्या तारखेची घोषणाही झाली आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी काही नेत्यांकडून होत आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget