'महाराष्ट्र बंद'प्रकरणी जनहित याचिका दाखल

ठाणे - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला भाजपकडून आक्षेप घेत या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्यातील सत्तेमध्ये असलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेला महाराष्ट्र बंदमुळे सामान्य नागरिक, व्यापारी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याप्रकरणी या विरोधात भाजपकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुजय पत्की यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून या प्रकरणी न्याय मागितला आहे.

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी आणि उद्योजकांना फटका बसला आहे. सण-उत्सवाच्या निमित्ताने घराबाहेर पडणारे नागरिक आणि उद्योजकांना आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदमुळे सक्तीने घरामध्ये बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा व्यापारी व उद्योगांवर मोठा परिणाम झाला. अनेक अत्यावश्यक दुकाने आणि सेवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. ठाण्यात प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकांना शिवसैनिकांनी मारहाण केली. तर मुंबईत बेस्टच्या बसगाड्या फोडण्यात आल्या. यामुळे समान्य नागरिकांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने हिंसाचार आणि मोर्चांदरम्यान अनेक ठिकाणी नियमभंग झाला. या प्रकारामुळे भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या सूचनेनुसार मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याचे उपाध्यक्ष सुजय पत्की यांनी स्पष्ट केले. सुजय पत्की यांच्यावतीने न्यायालयाचे वकील अॅड. प्रीतेश बुरड यांनी ही याचिका दाखल केली आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget