जबरदस्त मराठी थ्रिलर 'ग्रे'चा ट्रेलर लॉन्च

मुंबई - अभिनेता वैभव तत्ववादी लवकरचं 'ग्रे' नामक एक रहस्यमय थरारक चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहे. स्पृहा जोशी आणि अभिषेक जावकर यांनी लिहिलेला ‘ग्रे’ हा चित्रपट अभिषेक जावकर यांनीच दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला.

दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' चित्रपटात वैभव 'सिद्धांत' नामक एका युवकाची भूमिका साकारत आहे. ग्रे ”ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बादल्याच्या बदल्याची कथा आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित, अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबरला झी प्रीमियरवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget