अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोर्टाचे वॉरंट जारी ;१६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

मुंबई - मनी लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर न झाल्याबद्दल न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एम. नारळीकर यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्जाच्या सुनावणीदरम्यान भारतीय दंड संहितेच्या कलम १७४ नुसार देशमुखांविरुद्ध हे वॉरंट जारी केले. कोर्टाने देशमुख यांना १६ नोव्हेंबर या दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी आणि त्याच्या मुलीने किंवा त्याच्यावतीने वकीलाने ईडीचे समन्स स्वीकारल्याची वस्तुस्थिती पाहता, त्याच्यावर प्रथमदर्शनी खटला चालवला जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.संचालनालयाने गेल्या आठवड्यात महानगर न्यायालयात अर्ज दाखल करून देशमुख यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १७४ (लोकसेवकाच्या आदेशाचे पालन न करणे) अंतर्गत कारवाई केली होती. अनेक वेळा समन्स देऊनही देशमुख मनी लाँडरिंगच्या प्रकरणांमध्ये ईडीसमोर हजर झाले नाहीत.यामुळे कारवाई करण्याची मागणी केली होती.या कलमाअंतर्गत एक महिन्यापर्यंत कारावास, किंवा ५०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.देशमुख यांचे दोन सहकारी, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे.दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.या दोघांशिवाय, सचित वाझे यालाही या प्रकरणात नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात तपास यंत्रणेने आरोपी बनवले आहे. मात्र, आरोपपत्रात देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव आरोपी म्हणून देण्यात आलेले नाही.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget