शिवबंधन तोडत सुभाष साबणे भाजपमध्ये करणार प्रवेश

नांदेड - भाजपाने शिवसेनेला झटका दिला आहे. भाजपने शिवसेनेच्या माजी आमदाराला गळाला लाऊन उमेदवारीही जाहीर केली. नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा कोविडनंतर १० एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेसह महाविकासआघाडीसाठी हा झटका मानला जात आहे. काँग्रेसने देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलालाच संधी दिली आहे. जगदीश अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आता त्यांना भाजपच्या वतीने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे निवडणूक रिंगणात असतील. त्यामुळे देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सुभाष साबणे म्हणाले, 'मी आजही शिवसैनिक आहे,४ ऑक्टोबरनंतर जो काही निर्णय आहे तो होईल. माझ्या शिवसैनिकाचा अपमान झाला. पोलिसांनी बुटासह तुडवले. अशोक चव्हाण यांनी बॅनरवर माझ्या नेत्याचा कधीच फोटो छापला नव्हता. बॅनरवर महाविकासआघाडीच्या नेत्याचे फोटो राहावेत. माझ्या मतदारसंघात येताना महाविकासआघाडीचे नेते म्हणून आघाडीतील घटक पक्षाला सोबत घेऊन आले पाहिजे. तुम्ही पक्षाचा कार्यक्रम राबवायला नको हीच आमची भूमिका होती. त्यामुळेच आम्ही काळे झेंडे दाखवत होतो. तर पोलिसांनी पकडून बुटासह कार्यकर्त्यांना मारले.' देशाच्या पंतप्रधानाला देखील काळे झेंडे दाखवले जातात. बिलोली तालुक्यातील हा प्रकार घडला. मला वाईट वाटले. म्हणून मी हा निर्णय घेतला. १९८४ पासून मी शिवसैनिक आहे. ज्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार होती त्या दिवशी आम्ही विधानसभेत मोडतोड केली होती. त्यामुळे १ वर्षासाठी आम्ही निलंबित झालो. ते दिवसही आम्ही पाहिले, असे मत सुभाष साबणे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांवर झालेल्या कारवाईवर सुभाष साबणे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, शिवसेनेच्या चांगल्या वाईट दिवसांमध्ये आम्ही शिवसेनेसोबत होतो. पण आज मुख्यमंत्री आमचे आहेत, तरी आमच्या कार्यकर्त्यांना बुटासह मारले जाते. याचे वाईट वाटले, खंत वाटली. माझ्या पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर माझी नाराजी नाही. फक्त नांदेड जिल्ह्याचे जे नेतृत्व आहे त्या अशोक चव्हाण यांना आमचा विरोध आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget