लेहमध्ये सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे अनावरण

लेह - महात्मा गांधीजींच्या १५२ व्या जयंतीचा मुहूर्त साधून लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचे अनावरण करण्यात आले. लेहमध्ये २००० फूट उंचावर ठेवण्यात आलेल्या या ध्वजाची लांबी तब्बल २२५ फूट आहे. तर ध्वजाची रुंदी १५० फूट इतकी आहे. हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचे वजन १ हजार किलो इतके आहे. ५७ इंजिनिअर रेजिमेंटच्या १५० जवानांनी मिळून हा ध्वज २००० फूट उंचीच्या टेकडीवर नेला. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचे अनावरण झाले. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे देखील उपस्थित होते. गांधीजी म्हणाले होते की, आपला राष्ट्रध्वज म्हणजे एकता आणि मानवतेचे प्रतीक आहे. या देशातल्या प्रत्येकाने या प्रतीकाचा स्वीकार केला आहे. हे आपल्या देशाच्या महानतेचे प्रतीक आहे. यापुढील वर्षांमध्ये लेहमधला हा ध्वज आपल्या जवानांसाठी उत्साहाचे देखील एक प्रतीक असेल, असे माथूर म्हणाले. देशाचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी खादीच्या ध्वजाचा व्हिडीओ ट्वीट करून त्यावर संदेश लिहिला आहे. देशासाठी हा प्रचंड अभिमानाचा क्षण आहे, कारण गांधीजींच्या जयंतीच्या दिवशीच जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण लेह-लडाखमध्ये झाले. देशाचा सन्मान करणाऱ्या या कृतीला मी सलाम करतो, असे ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget