१०० कोटी लसीकरणाचा जल्लोष

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना महामारीचे संकट देशावर आले तेव्हा सर्वच शासकीय यंत्रणा गोंधळात पडल्या होत्या.  या भयाण विषाणूला आळा कसा घालायचा, त्याचा संसर्ग रोखायचा कसा? असे विविध प्रश्न तज्ज्ञ मंडळींसमोर उभे ठाकले होते. जगभरात पसरलेल्या या विषाणूवर परिणामकारक असे औषधही अख्या जगात उपलब्ध नव्हते. हा विषाणू युरोपच्या अनेक देशांमध्ये हाहाकार माजवून आपल्या देशात आला आणि सगळेच गोंधळून गेले. या भीषण संकटाचा धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनी तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांची महत्त्वाची बैठक बोलवून कोरोनाला रोखण्याचा एक ॲॅक्शन प्लान तयार केला. कोरोनाला रोखण्यासाठी नवी लस शोधून काढायला जगभरातील शास्त्रज्ञ कसोशीने प्रयोगाला लागले.त्यातच पंतप्रधान मोदींनीही आपल्या संशोधकांना, औषध कंपन्यांना लस विकसित करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यातच सर्वप्रथम पुण्याच्या अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटला यश प्राप्त झाले. त्यानंतर हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीलाही कोरोना विरोधी लस विकसित करण्यात यश मिळाले. आता कोरोनाला रोखायचे असेल आणि देशभरातल्या नागरिकांमधील प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर लसीकरणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, हे जाणून मोदींनी या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात लस उत्पादनाचे आदेश दिले. त्यासाठी आवश्यक असणारी सरकार पातळीवरील सर्व मदत त्यांना दिली. मुख्य म्हणजे लस उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाली  आता संपूर्ण देशवासीयांचे लसीकरण कसे करायचे?हि बाब अतिशय कठीण होती. मोदींनी या कामात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच अन्य आरोग्यसेवकांना पुढे येण्याची हाक दिली आणि सर्वांनीच या महान कार्यात स्वत:ला झोकून दिले.त्यात कित्येक डॉक्टर आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू हि झाला परंतु न डगमगता त्यांनी करोनाशी लढण्यासाठी एकजुटीने सरसावले. खरेतर, भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात नागरिकांचे लसीकरण करताना या आरोग्य सेवकांनी दिवसरात्र झटून काम केल्याने कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताने एक ऐतिहासिक  यश मिळाले.देशात लसीकरणाच्या आकड्याने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि एकच जल्लोष झाला. जगभरांतून देशाचे आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले जात आहे. भारताने १०० कोटींचा टप्पा पार केला असताना अन्य देशात मात्र अजूनही ५० कोटीही लसीकरण पूर्ण झालेले नाही. अमेरिकेत फक्त ४१.०१ कोटी  लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ ब्राजिलमध्ये २६.०२ कोटींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या धामधुमीत साजरा केला .अत्यंत जलद गतीने लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा गाठणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. गेल्या १०० वर्षांत आलेल्या सर्वात मोठ्या महामारीशी दोन हात करण्यासाठी देश मजबूत स्थतीत आहे. या निमित्ताने लाल किल्ल्यावर सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकावत या क्षणाला ऐतिहासिक महत्त्व देण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. मोदींनी देशभरातील आरोग्यसेवकांचे, नागरिकांचे आभार मानले आणि कौतुकही केले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही देशाला लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि समर्थ नेतृत्वाचे हे फळ आहे, याबाबत दुमत नाही. आता उर्वरित नागरिकांचे लसीकरण होणे बाकी असून ते उद्दिष्टही सहज साध्य होणार आहे. १३० कोटींची लेखसंख्या असलेल्या देशाने १०० कोटी लसीकरणाचा एकदा पार केल्याने जल्लोष तर होणारच. 


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget