माजी महापौरांसह नगरसेवकांवर गुन्हा

नवी मुंबई - नवीमुंबई महापालिके कडून नेरूळ सेक्टर १९ मधील वंडर्स पार्क येथे तयार करण्यात आलेल्या सायकल ट्रॅक, चालण्यासाठी असणाऱ्या मार्गिकेचे विनापरवानगी बेकायदा उद्घाटन केल्याप्रकरणी माजी महापौर सागर नाईक यांच्यावर तसेच नेरूळ भागातील तीन माजी नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात नेरूळ पोलिसांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने नेरूळ सेक्टर १९मधील वंडर्स पार्क आवारात सायकल ट्रॅक व चालण्यासाठी मार्गिका तयार करण्यात आली होती. सोमवारी सकाळी या सायकल ट्रॅक व चालण्यासाठी असणाऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी माजी महापौर सागर नाईक यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार, या कार्यक्रमासाठी माजी महापौरांसह माजी नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र यावेळी नेरूळ भागात राहणाऱ्या छाया खेमाणी व सुमित्रा पवार यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आक्षेप घेतला. तसेच, उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी स्थानिक पोलिस स्थानक व नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी घेतली आहे का? अशी त्यांनी विचारणा केली. यामुळे केमाणी व पवार यांच्यासोबत उद्घाटनासाठी जमलेले माजी नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली.यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांच्यातील वाद मिटविला. मात्र, त्यानंतर सायकल ट्रॅक व मार्गिका उद्घाटन कार्यक्रमाच्या आयोजकांनी स्थानिक पोलिस अथवा महापालिकेची परवानगी न घेता, कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आढळून आले. तसेच, आयोजकांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवून सरकारने लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, सुरेखा इथापे, नेत्रा शिर्के यांच्यासह सुरेश शेट्टी, रामप्रसाद तिवारी, अतुल पांडे, दिनेश पासेरिया, व्ही. एल. शंकर, शंतनू पंडित, टी. एन. बन्सल व इतर कार्यकर्त्यांविरोधात सरकारने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दखल केला आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget