बँक गैरव्यवहार प्रकरण ; 'भूषण स्टील'ची मालमत्ता जप्त

मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भूषण पॉवर अँड स्टील लि. (बीपीएसएल) या कंपनीची १९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामध्ये मुंबईतील निवासी इमारतीचा समावेश आहे. ४७ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याचे हे प्रकरण आहे.'बीपीएसएल' ही प्रामुख्याने कच्च्या लोखंडाला पक्के करण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्याखेरीज कंपनीचे काही लहान स्वरूपाचे ऊर्जाप्रकल्पही आहेत. या उद्योग विस्तारासाठी कंपनीने विविध २३ बँकांकडून कर्ज घेतले होते. अशा ४७ हजार २०४ कोटी रुपयांच्या कर्जाचा भरणा न करता कंपनीने या रकमेचा गैरवापर केला. अशा प्रकारे सर्वात आधी सन २०१५मध्ये पंजाब नॅशनल बँकेने कंपनीचे कर्जखाते बुडित खात्यात टाकले होते. त्याप्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला होता. सीबीआय तपासाच्याच आधारे पैशांच्या गैरवापरप्रकरणी (मनी लॉन्ड्रिंग) ईडीने तपास सुरू केला. 'ईडी'तील सूत्रांनी सांगितले की, 'भूषण पॉवर अँड स्टील लि.ने ज्या कारणांसाठी कर्ज घेतले त्या रकमेचा गैरवापर केला. तसेच हे कर्ज घेण्यासाठी बनावट दस्तावेजही सादर केले होते. एकप्रकारे फसवणुकीद्वारे रकमेचा गैरवापर केला. त्यामुळेच कारवाई केली जात आहे.'या कारवाई अंतर्गत 'ईडी'ने कंपनीचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय सिंगल यांच्या मालकीतील निवासी इमारत जप्त केली. वरळीतील पूनम चेंबर्ससमोरील अॅट्रिया मॉलजवळील सीजे हाऊस येथे ही इमारत आहे. त्याचे बाजारातील मूल्य १९०.६२ कोटी रुपये आहे. ही इमारत खरेदी करण्यासाठी कर्जाऊ रकमेचा गैरवापर केला. अॅश्युरिटी रिअल इस्टेट एलएलपी या कंपनीमार्फत ही इमारत खरेदी करण्यात आली. या प्रकरणात 'ईडी'ने आतापर्यंत २५ आरोपींविरुद्ध तपास सुरू केला. या २५ आरोपींची ४,२२९.५४ कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. आता १९० कोटींच्या जप्तीसह हा आकडा ४,४२०.१६ कोटी रुपये झाला आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget