नवी मुंबईत तब्बल १२५ कोटींच हेरॉईन जप्त

नवी मुंबई - प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली. या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून तब्बल १२५ कोटींच हेरॉईन जप्त करण्यात ले  आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने (DRI) ही मोठी कारवाई केली आहे. न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून २५ किलोहून अधिक हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान एका व्यवसायिकाला अटक करण्यात आली असून ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यापुर्वी अमंतलीपदार्थ विरोधी पथकाच्या मुंबईमधील तुकडीने सात किलो हेरॉईननसहीत दोन जणांना ताब्यात घेतले. मुंबईमधील डोंगरी भागामध्ये ही कारवाई करण्यात आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये १५ कोटी रुपये इतकी होती.कोर्डेलिया क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कार्यक्रम आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चौघांसह आठ जणांना अटक केल्यानंतर एनसीबीचे धाडसत्र सुरु आहे. यामध्ये आधी पवईतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. अंकित कुमार असे पवईमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडेही अंमलीपदार्थ आढळून आले आहेत. मंगळवार रात्रीपासून एनसीबीकडून वांद्रे, जुहू आणि गोरेगाव परिसरात ठिकठिकाणी छापे घालण्यात येत आहेत.एनसीबीने यापूर्वी रविवारी रात्रीपासून सोमवारी (४ ऑक्टोबर) पहाटेपर्यंत वेगवेगळ्या वेळी वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला या ठिकाणी छापेमारी करत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त दिले होते. यामार्फत कोणाच्या माध्यमातून आणि कशापद्धतीने हे अंमली पदार्थ पुरवले जातात या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती एनसीबीच्या हाती लागली असून त्यानुसार सध्या छापेमारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.



Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget