राष्ट्रवादीला दुसरा झटका, अजित पवारांची १००० कोटींची संपत्ती जप्त होणार ; आयकर विभागाची नोटीस

मुंबई -  दोन दिवसात राष्ट्रवादीला दोन जबरदस्त झटके बसले आहेत. मध्यरात्री राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्यानंतर आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १००० कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे.  आहे.

१) जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री,बाजार मूल्य: सुमारे ६०० कोटी

२)  साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट बाजार मूल्य: सुमारे २० कोटी

३) पार्थ पवार यांचे निर्मल ऑफिस बाजार मूल्य: सुमारे २५ कोटी

४) निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट बाजार मूल्य: सुमारे २५० कोटी

५) महाराष्ट्रात २७ वेगवेगळ्या ठिकाणी जमीन बाजार मूल्य: सुमारे ५०० कोटी

अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर आहेत. गेल्या महिन्यात आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. यावेळी १८४ कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती. आयकर विभागाने ७ ऑक्टोबरपासून ७० हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मालकीच्या अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही छापा मारला होता. तसेच पवारांच्या बहिणींच्या मालकीच्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली होती.दरम्यान, मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. ७ ऑक्टोबर रोजी हे छापे मारण्यात आले होते. या छापेमारीत बेहिशोबी मालमत्ता आणि काळा पैसा जप्त करण्यात आल्याचे म्हटले आहे. या दोन्ही समूहाकडे १८४ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले होते. ज्या दिवशी अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी छापेमारी करण्यात आली होती, त्यावेळी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आपल्या तिन्ही बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. कोल्हापूर आणि पुण्यात अजितदादांच्या दोन बहिणी राहतात. या छापेमारीत २. १३ बेहिशोबी मालमत्ता आणि ४. ३२ कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. बनवावट शेअर प्रीमियम, संदिग्ध असुरक्षित कर्ज, काही माध्यमातून मिळवलेला निधी, आदी विविध मार्गाने ही रक्कम जमा करण्यात आल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचा दावा पीटीआयच्या वृत्तात करण्यात आला होता. दरम्यान, मध्यरात्री ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर देशमुख यांना अटक करण्यात आली. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीला अवघ्या आठ तासात दोन मोठे झटके बसले आहेत.


 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget