५०० चौरस फूट पर्यंतच्या घरांचा प्रॉपर्टी टॅक्स होणार माफ ; ठाणे महानगरपालिकेचा निर्णय

ठाणे - मुंबई महापालिके प्रमाणेच ठाण्यात देखील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार असे वचन शिवसेनेने दिले होते. ते वचन कधी पूर्ण होणार याची सर्वच ठाणेकर नागरिक आतुरतेने वाट पाहत होते. गुरुवारी झालेल्या महासभेमध्ये सत्ताधारी शिवसेनेने हा ठराव पास करून ठाणेकरांना उशिरा का होईना, दिवाळी भेट दिली आहे. पाचशे चौरस फूट पर्यंतच्या घरांचा प्रॉपर्टी टॅक्स माफ केल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या ठाणे महानगरपालिकेवर मोठा बोजा पडणार आहे. हा निर्णय घेतल्यानंतर या ठरावाची मंजूरी राज्य सरकार आणि नगर विकास विभाग ही आवश्यक असल्याने त्यांच्या मंजुरीनंतरच या ठरावाचा फायदा ठाणेकरांना होणार आहे. यासाठी यात शासन आपली मदत करेल, असा विश्वास ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी बोलून दाखवला.कोरोनामुळे दीड वर्षानंतर पार पडलेल्या पहिल्याच ऑफलाइन महासभेमध्ये वातावरण अत्यंत खेळीमेळीचे असल्याचे पाहायला मिळाले. सर्वच पक्षांनी एकत्र येत ठाणेकरांना दिलासा देणारा हा प्रस्ताव मंजूर केला व तो पुढील मंजुरीसाठी नगरविकास खाते आणि शासनाकडे पाठवल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला तर याचा खूप मोठा आर्थिक फटका ठाणे महानगरपालिकेला बसणार आहे व त्यातून शासनाने आपल्याला मदत करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आहे. अशावेळी हा निर्णय घेणे शिवसेनेला गरजेचे होते. हा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेच्या अनेकदा महासभेत अडचणीत आले होते. आता हा निर्णय घेऊन निवडणुका पूर्वी वचनपूर्ती केल्याचा शिवसेना आता दावा करत आहे. या विषयाबाबत मनसे आणि भाजपा अनेकदा आक्रमक झाली होती. त्यांनी शिवसेनेच्या विरोधात आंदोलने देखील केली होती. वचनपूर्ती न केल्याचा अनेकदा आरोप होता. यामुळे शिवसेनेची मोठी नाचक्की झाली होती. आयुक्त या निर्णयाच्या विरोधात होते. कारण यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटणार आहे, असे असले तरी निवडणुकीपूर्वी हा निर्णय सत्ताधाऱ्यांना घ्यावा लागलेला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget