एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मंत्रालयावर धडकण्याआधीच सोमय्या, पडळकरांची धरपकड

मुंबई - एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी आज एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन आजही सुरूच आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. मात्र, हा मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी सोमय्या आणि पडळकरांना ताब्यात घेतले. त्यामुळे एसटी कर्मचारी प्रचंड संतापले असून आमदार निवास परिसरात संतापाचे वातावरण पसरले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा न निघाल्याने आजही कर्मचारी संपावर आहेत. त्यात आता भाजपने उडी घेतल्याने या आंदोलनाला हवा मिळाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात आज मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. सोमय्या आणि पडळकर हे आमदार निवासातून बाहेर पडले आणि मोर्चात सामील झाले. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ठाकरे सरकार हाय हाय, एसटीचे विलनीकरण झालेच पाहिजे अशा घोषणा द्यायला कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. यावेळी शेकडोच्या संख्येने एसटीचे कर्मचारी उपस्थित होते.  यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या आणि पडळकर आमदार निवासातून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यामुळे आंदोलक आणखीनच संतप्त झाले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आणखीनच गोंधळ निर्माण झाला होता.

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला वेळ नाही. आम्ही मंत्रालयाच्या दिशेने निघालो आहोत. पण आम्हाला अटक करत आहेत. अनेक वेळा तुरुंगात जाऊ, पण एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ. कितीही वेळा अटक करा. आम्ही कामगारांना न्याय मिळवून देऊ, असे सोमय्या म्हणाले. गोपीचंद पडळकर यांनी सामान्य कामगारांसाठी आंदोलन उभे केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या पाहत आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन कामगारांना भेटावे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget