कंगनाचा पद्मश्री काढून घ्या - नवाब मलिक

मुंबई - अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध नोंदवला आहे. लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है, असे सांगत कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. १८५७ पासून या देशात स्वातंत्र्याचे आंदोलन सुरू झाले. त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. गांधींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले. त्यानंतर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काही तरी बोलत आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री मागे घेतला जावा. या अभिनेत्रीने कोरोडो भारतवासियांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांना अटक करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. यावेळी त्यांनी मागच्या सरकारमधील एका मंत्र्यावरही गंभीर आरोप केला. फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याने मंदिराच्या जमिनीचा घोटाळा केला होता. त्याचे पुरावे मी लवकरच देणार आहे. भाजपवाले कसे घोटाळे करत होते हे राज्यातील जनतेला दिसेल, असे  त्यांनी सांगितले. त्यांनी ईडीच्या छापेमारीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. वक्फ बोर्डावर छापे पडले नाही. वक्फ बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर छापे पडले आहेत. त्याचे आम्ही स्वागत करतो. पुण्यातील एक ट्रस्ट आहे. ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्टवर कारवाई झाली. त्यात पुण्यात एमआयडीसीत पाच हेक्टर ५१ आर जमीन अॅक्विजेशन करून ऑफिसरकडे पैसे जमा केले. इम्तियाज हुसैन शेख आणि इतर ट्रस्टींनी त्यांना ७ कोटीच्या ७६ लाख ९८ हजार २५० रुपये ताब्याचे पैसे दिले. मात्र कागदपत्रानुसार ९ कोटी ६४ लाख ४२ हजार ५०० रुपये हे अॅक्विजेशनचे पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे जमा होते. एका बनावट कागदपत्राद्वारे ही रक्कम आपल्या अकाउंटमध्ये घेतले. त्यानंतर वक्फ बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर जी एनओसी त्यांनी दाखल केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी पुण्याचे ज्वॉइंट सीईओ खुसरो यांच्या माध्यमातून १३ ऑगस्ट २०२१ रोजी पुण्याच्या बंड गार्डनमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर पाच लोकांना अटक झाली. त्यात चांद रमजान मुलानी, इम्तियाज महम्मद हुसैन शेख, अॅड कलिम सय्यद, राजगुरू आणि कांबळे आदींना अटक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ईडीच्या कारवायांना मलिक घाबरणार नाही. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget